मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

आज्याची शिकवन

ब्रिटिश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी तवा सातवीत आसन मी माजे दोन चुलतभाउ सादारन यकाच वयाच आमी तवापासुन आज्याच्या बीड्या चोरुन पीवाचो. त्याची पन यक झम्मड हाय आजा म्हन्जे गावचा सरपंच. पन लई पेताड. सकाली उटला क आंगोल धवाचे आदी भट्टी वर हजर न दुपारचा जेवला क बेड्यान (सुद मराटीत - बैलांचा गोठा) झोपाचा आनी संद्याकाली उतरली क गावचे कामाला लागाचा. म्हन्जे तेला भेटाचा आसन तर संद्याकालीच. पन गावान धाक जबरा. यकदा क आवाज टीपवला क कोनाची टाप नाय सामनी यवाची तर क झाल्त , आमाला रोज बीड्या लागाच्या आनी खीच्यान पैस कुटल ? रोज दुपारच्या टायमाला आमी सगले आज्याची वाट बगाचू.

माझं आजोळ आजगांव

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं आजोळ आजगांवचं.वेंगुर्ल्यापासून आजगांव साधारण दहा मैलांच्या आंत.आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी आजोळी जात असू.पहाटे उठून आई वाटेत खाण्यासाठी डब्बा द्यायची.उकडलेल्या बटाट्याची भाजी,पुऱ्या,लसणीची खोबरं घालून चटणी,थोडी वेलची पिवळी केळी.आणि फिर्कीच्या तांब्यात विहीरीचं थंडगार पाणी,असा थाट असायचा. पहाटे पहाटे निघताना हवा थंड असायची.त्यामुळे सुरवातीचा प्रवास झपाट्याने व्हायचा. वेंगुर्ल्याच्या बाजारातून वाट काढत निघताना जरा अड्चण यायची,कारण इतक्या पहाटे आजूबाजूच्या गांवातून बरेचशी मंडळी विक्रीसाठी माल घेऊन येत असल्याने चांगली जागा मिळण्य़ासाठी चूरशीत असायची. बाजारातली चहाची दूकाने अगोदरच उघडले

अथ काकापुराण.

रामदास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली "हे आणि रीटायर?" "करेला और निमचढा. " "बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात ." बोलता बोलता जीभ चावली खरी .... पण पुतण्या टिर्‍या बडवत तासभर हसत होता.

कर्णपर्व!

सौरभ वैशंपायन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कर्णानं अलगद मान वळवण्याचा प्रतत्न केला, पण वेदनेची एक असह्य कळ शरीरात उठली. अर्जुनानं सोडलेल्या बाणनं आपलं काम चोख बजावलं होतं. रथाच रुतलेलं चाक वर काढण्यात गुंतलेल्या कर्णाच्या डाव्या खांद्यातुन घुसुन तो बाण मानेतुन बाहेर आला होता. अर्जुनाला थांबायला सांगितल्या नंतर सुध्दा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन त्याने बाण मारला होता. "तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" हा एकच प्रश्न कर्णाला त्याही अवस्थेत सतावत होता. "धर्म?मी खरच चुकलो धर्म?" पुन्हा कर्णानं मान हलवली मात्र संपूर्ण शरीरच वेदनांच मोहोळ बनल. कर्णाच्या मांडी पासुन ते कानच्या पाळी पर्यंत कर्णाला अनेक जखमा झाल्या होत्या.

"भेजा म्हणजे रे काय?.... भाऊ"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या दिवशी मी सहज म्हणून टी.आय.एफ.आर मधे ( टाटा इनस्टीट्युट ऑफ फंडामेन्टल रिसर्च मधे) सकाळीच गेलो होतो.जुने मित्र भेटतील गप्पा सप्पा होतील आणि वेळ थोडा मजेत जाईल ही एक ईच्छा ठेवून गेलो होतो. तसे बरेच लोक भेटले म्हणा."हाय,हलो" बऱ्याच लोकांशी झालं आणि सह्ज म्हणून लायब्ररीत डोकावून पाहिलं.

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

सौरभ वैशंपायन ·
लेखनप्रकार
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

जो भी बिछडें है, कब मिले है फराज़....

मनिष ·
लेखनप्रकार
आज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ 'सईद अहमद शाह' ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे - पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता.

"खेळ खेळूया सारे आपण"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं. मला म्हणाले, "संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही." मी म्हणालो, "भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला मी तुम्हाला वाचून दाखवीन." भाऊसाहेब म्हणाले, "आज मला तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गमतीदार गोष्ट सांगायची आहे. ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तो गृहस्थ अलिकडेच मला एका दुकानात भेटला होता.प्रथम मी त्याला ओळखलं नाही.सहाजी