Skip to main content

लेख

"हपापाचो माल गपापा"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 19/09/2008 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
ते दूसऱ्या महायुद्धाचे दिवस होते.आपला देश पण त्याने पोळून गेला होता.खायला अन्न नाही तांदूळ, गहू,साखर, केरोसीन सर्व आवश्यक वस्तू रेशनींगवर मिळायच्या आणि जादा हवा असल्यास काळ्या बाजारात मिळायचं.त्याला "ब्लॅक" मधे म्हणण्याचा जास्त प्रघात होता. वेगुर्ला मार्केटच्या समोर एक किराण्या मालाचं दुकान होतं.वखार वजा किराण्या मालाचं ते दुकान होतं.त्या दुकानाच्या मालकाचं नाव होतं दादा कुळकर.आपण त्याना दादा म्हणुया. दादा एक ठुसक्या उंचीची, काळी कुट्ट रंगाची, बेळगावला अशा वर्णनाच्याव्यक्तीला"वड्डर" म्हणून संभोधतील,अशी, आणि कर्कश आवाजाची व्यक्ती होती. दुकानाच्या गल्ल्यावर बसल्यावर पैशाच्या पेटीतल्या मोडीला

पुरस्कार (लघुकथा )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 19/09/2008 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
'दुहेरी फायदा' ही लघुकथा आवडल्या बद्दल धन्यवाद !! ------------------------------------------------------------------------- पुरस्कार पुलावरुन धडधड करत राजधानी एक्सप्रेस निघून गेली. रोजच्या प्रमाणेच आजही भिकू जागा झाला. तो पळत पळत गल्लीत असलेल्या सार्वजनिक नळावर गेला. हात, पाय, तोंड धुतलं. बायको मुलं अजून झोपलेली होती. त्याने समोरच्या हॉटेलातून चहा आणि गरमागरम भजी आणली आणि चहा बरोबर तो भजी खाऊ लागला.
Taxonomy upgrade extras

सुंदर चित्रं पहायला मला बरं वाटतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 18/09/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं,मी निलकंठ केळकरांकडे माझ्या इनकमटॅक्सच्या काही कामा करता गेलो होतो.त्यांच्या ऑफिसात तशी बरीच गर्दी होती.मला जवळ बोलावून ते मला म्हणाले, "तुम्ही घरात जाऊन बसा.ह्या सर्व कस्टमरांची सोय लावून मग मी आत येतो.आमाची संध्या नागपूरहून थोडे दिवस माहेरपणासाठी आली आहे.तिच्याशी थोड्या गप्पा मारा.

साताजन्माचा वनवास..!

लेखक पारोळेकर यांनी गुरुवार, 18/09/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
साताजन्माचा वनवास..! मला वाटत होतं... ती माझीच होईल, या जन्मात ती डोळ्यासमोरून निघून गेली... मी राहिलो तिला पाहत! थांबविण्याचा प्रयत्न करू किती ते होण्यासारखं नव्हतं कारण, तिच्या गळ्यात दुसऱ्या कुणाचं 'मंगळसूत्र' होतं! मी मनात म्हटलं, 'तू ह्या नाही तर... पुढच्या जन्मात माझीच होशील..! ' पण, मन माझं खट्याळ! मला म्हणालं, 'तू नुसता बघतच राहशील..!

अग्निप्रलय ?

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 18/09/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
Explosion ही घटना मागच्या आठवड्यात घडली. दादरकडे जाणार्‍या बसमध्ये दोन मध्यमवयीन महिला चढल्या आणि स्त्रियांच्या राखीव जागेवर जाऊन बसल्या. त्यातली एक काठापदराचे लुगडे नेसलेली, कपाळाला रुपयाएवढा कुंकवाचा टिळा लावलेली अशिक्षित बाई होती. आपण त्यांना मावशी म्हणू. तर दुसरी हल्ली प्रचलित असलेल्या पोषाखातली पांढरपेशा वर्गातली चांगली सुशिक्षित दिसत होती. त्यांना ताई म्हणू.

माटुंग्याचे वामनकाका

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 17/09/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
ते आमच्या वडीलांचे काका, आम्ही त्याना, "माटुंग्याचे आजोबा" म्हणायचो. नावाप्रमाणे वामनकाका उंचीने "वामनमुर्ती"च होते.शिक्षण एव्हडं तेव्हडंच त्यामुळे उपजीवीकेचं सोपं साधन म्हणजे "आचारी" होणं.संध्याकाळी पाच वाजल्यावर खांद्यावर सफेत झोळी जिच्यात किलो दोन किलोच्या दोन चार भाज्या, कोथिंबीर, मिरची, नारळ, वगैरे मसाला पुरेल एव्हड्या आकाराची असायची.सुरवातीला होता तो तिचा सफेद रंग आता सुरण,अळू,आणि असल्याच काही भाज्यांमुळे त्या झोळीचं सफेदपण जाऊन रंगी बेरंगीपणा आला होता. पायात चांबड्याची पट्या पट्याची चप्पल डोक्यावर "गांधी "टोपी,डोळ्यावर गांधी टाइप गोलाकृती आणि कानावर काड्या ओडून बसवतात तसा काळा चष्मा

वयम् मोठम् खोटम्!

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/09/2008 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक विचीत्र प्राणी आहे. जे आपल्यापाशी नाही त्यासाठी झुरत असतो. ईतरांचे सोडा, पण आपल्यापाशी जे आहे त्याचे कौतूक त्याला स्वत:लाच नसते. कुणीतरी नमूद करून ठेवलेच आहे. आपल्या सर्व मित्रांची मुले आज्ञाधारक आणि हुशार असतात. समोरच्या बसस्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांसाठी पटापट एकाच नंबरच्या दोन दोन बसेस येतात. आपल्या बाजूला मात्र हवी असलेली बस एक तास वाट पहायला लावून येते, आणि आपल्या पुढल्या माणसाला आंत घेतल्यावर कंडक्टर आपल्यावर खेकसतो "दरवाजा छोडो". एकूण आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळतच नाही.