पन्नास टक्के थेअरी
नरगुंदकरांचा मुलगा खूप वर्षानी मला भेटला.त्याचे आईवडील त्याच्याचकडे हल्ली राहायला गेले होते.म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो.घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर काही गप्पागोष्टी झाल्या.बोलता बोलता त्यांचा मुलगा म्हणाला,
"मला चांगलच लक्षात आलं की नंतर येणार्या सर्व चांगल्या गोष्टी सहजच होऊन गेलेल्या वाईट गोष्टीवर मात करतात.
वाईट गोष्ट सर्वसाधारण चांगल्या गोष्टीपेक्षां जास्त काळ टिकून राहूच शकत नाहीत.शांती आणि भरभराटीचा मी चहाता आहे.
मी "पन्नास टक्के थेअरी" मानतो.अर्धाअधीक वेळ घटना सर्वसाधाराण गोष्टीपेक्षा चांगल्या असतात.आणि अर्ध्याअधीक वेळा त्या वाईट असतात.मला वाटतं जीवन हा एक लंबकाचा झोका आहे.
मिसळपाव