जोकर.. DC चित्रपट विश्वातील सुपरहिरो इतकंच प्रचंड लोकप्रिय पात्र. किंबहुना, आजवरच्या सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी एक. अत्यंत विक्षिप्त, विदूषकाच्या मुखवट्याआडून थंडपणे गुन्हे करणारा, अंगावर काटा आणणारा खलनायक हिथ लेजर यांनी डार्क नाईट चित्रपटातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन कल्पनेपलिकडे लोकप्रिय करून ठेवला आहे.
टॉड फिलिप्सने दिग्दर्शित केलेला "जोकर" हा चित्रपट याच जोकरचे पूर्व कथानक, म्हणजेच आर्थर फ्लेचर याची विकृत क्रूरकर्मा जोकर बनण्यापुर्वीची कथा आहे.
आर्थर फ्लेचर हा एक साधा सरळ मध्यवयीन इसम. गॉथम शहरात, आपल्या आईबरोबर अगदी बेताच्या परिस्थितीत दिवस काढणारा.