पौर्णिमा..
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का?
हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का?
बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे
मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का?
पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी,
होऊन धार मजला, तू चिंब करशील का?
दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला
होऊन रातराणी श्वासात उरशील का?
भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया
ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का?
दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे
ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का?
हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे
घेऊन ते उराशी साकार करशील का?
- प्राजु
वाचने
3968
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
लय
मस्तच
दिधले मला
सुंदर ! आता
छान...
मस्त
वा प्राजु!
करशील
भन्नाट
कविता
कविता आवडली.
आवडली कविता
सुन्दर!
सुंदर्,अतिसुंदर
In reply to सुंदर्,अतिसुंदर by श्रीकृष्ण सामंत
सुंदर कविता !
मस्त!
पौर्णिमा, रातराणी, वृत्तभंग/रसभंग
In reply to पौर्णिमा, रातराणी, वृत्तभंग/रसभंग by बेसनलाडू
+१ हेच म्हणतो.
छान!
हो मार डाला
आभार!
छान
मस्त कविता..