चाहूल वसंतऋतूची!!
गेले ४-५ महिने घराच्या बाहेर झाडांचे खराटे, थंड वारे, एकतर बर्फ तरी नाहीतर नुसतीच भयानक थंडी, सगळे पक्षी उष्ण देशात पळून गेलेले असं चित्र बघून नुसता कंटाळा आला होता. अशातच एक दिवस म्हणजे साधारण २०-२२ मार्चच्या आसपास एक पक्षी चोचीत काडी घेऊन उडत चाललेला दिसला. आम्हाला चाहूल लागायच्या आधी पक्ष्यांना चाहूल लागली होती वसंतऋतूच्या आगमनाची! आता ३-४ दिवसातच अजून काही पक्ष्यांची घरटं बांधण्यासाठीची लगबग दिसू लागली. गेले कित्येक दिवस हरवलेला पक्ष्यांचा आवाज सकाळी सकाळी जाग आणू लागला आणि थंडीमुळे, बाहेरच्या धुकट, आर्द्र हवेमुळे मनाला आलेली मरगळ पळून जाऊ लागली.
आता फिरायला बाहेर पडल्यावर हळूहळू झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर तांबूस कळ्या, अगदी नखाएवढी हिरवी पालवी दिसू लागली. वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागला. सूर्यदेवही जरा जास्त वेळ आकाशात रेंगाळू लागले. काही दिवसांपूर्वी स्थलांतरीत झालेले पक्षीही परतताना दिसू लागले.
जमिनीलगत निळ्या, जांभळ्या, गुलाबी रंगाची फुले दिसू लागली. जमिनीतून पातीफुलांची (डॅफोडिलची फुले)हिरवी पाती वर डोकाऊ लागली आणि ५-७ दिवसातच त्यावर फुलेही उमलून आली.
पक्ष्यांचा किलबिलाट तर दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या झुडुपांवर अनेकविध रंगाची फुले दिसत आहेत. दुकानांमध्येही वसंतांच्या स्वागतासाठी निरनिराळ्या वस्तू, अनेक प्रकारची रोपे, फुलझाडांचे बी यांची भरपूर प्रमाणात आवक झाली आहे.आता झाडांवरची पानेही वाढू लागली आहेत.

घराबाहेरच्या हिरवळीवर ससे पळत आहेत..
सर्वच जण शिशिरापर्यंतच असलेले हे वैभव लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. :)
फोटो :- मी आणि लिखाळ.
--शाल्मली.





वर्गीकरण
ओहो..
मस्तच ग शाल्मली...
लेख आणि
मस्त
व्वा.लिखाळ
फोटु बघुनच
सुंदर फोटो
आमच्याकडे
सुरेख
ए-वन क्लास
फोटो आवडले
सर्वच
धन्यवाद!
सुंदर.