मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

वार्तालाप : (4) आत्महत्या एक तमोगुण

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात: स्वयें आत्महत्या करणे तो तमोगुणl (2.6.10) तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जगणे असंभव वाटून निराश झालेला व्यक्ति आत्महत्या करतो. भारतात पाउणे दोन कोटी लोक दर वर्षी आत्महत्या करतात. त्यात 80 टक्के साक्षर असतात. 15 ते 40 वय गटात सर्वात जास्त लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचा निर्णय करणार्‍याचा असला तरीही काही आत्महत्या करणारे दुसर्‍यांवर दोष लावतात. मी मरणार पण दुसर्‍यालाही ही शांतिने जगू देणार नाही ही तमोगुणी वृती.

प्रपोज डे: लघु कथा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सदू, घरी येणार होतास ना! "जमणार नाही काका". का बरे? "काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज केले." वा! छान, पुढे काय ... "तिच्या सोबत डॉगी होता." (त्याने फोन ठेवला)

(मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!)

साहित्य संपादक ·
लेखनविषय:
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! - चालचलाऊ गीता, जयकृष्ण केशव उपाध्ये
विडंबन.. मराठी वाङमयामधील एक विशेष प्रकार. एखाद्या लोकप्रिय रचनेचे (बहुतेकदा विनोदी अथवा उपहासात्मक) अनुकरण, अशी विडंबनाची साधारण व्याख्या करता येईल. मराठी लेखनात दर्जेदार विडंबनाची दीर्घ परंपरा आहे.

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

चित्रगुप्त ·
लेखनप्रकार
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही.

Kooman The Night Rider (कुमान द‌ नाईट रायडर)

अनुस्वार ·
लेखनविषय:
कटाक्ष: मल्याळम इंग्रजी उपनामांसाहित २ तास ३३ मिनिटे गुन्हा, थरार, रहस्य अमेझॉन प्राईम . ओळख- ही गोष्ट आहे गिरीशंकर या केरळ पोलीस दलातील CPO (सिविल पोलीस ऑफिसर) ची. एका विशिष्ट कारणामुळे गिरीशंकर प्रचंड स्वाभिमानी, अहंकारी आणि अत्यंत चालाख पोलीस अधिकारी असतो.

खंडाळ्याच्या घाटासाठी...

पराग१२२६३ ·
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.

शरत्काल

नूतन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद माणिक वर्माच्या गोड आवाजात हे गाणं ऐकताना मन हरवून गेलं पण पुन्हा पुन्हा शरदाचं चांदणं शब्दाशी घुटमळत राहिलं. 'शरदाचं चांदणं' हा वाक्प्रचार आपण सहसा विशेष गोष्टींसाठीच वापरतो. त्याच्या उच्चारानेदेखील मन आनंदात न्हाऊन निघतं. अशा या शरद ऋतू विषयी मला उत्सुकता वाटली आणि त्या अनुषंगाने काही काही वाचत गेले.

मेरे प्यारे दुश्मन

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ, First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही.

पंचगंगातिरीचा दिपोत्सव

पराग१२२६३ ·
पंचगंगा घाट पहाटे तीन वाजता कोल्हापुरामधला पंचगंगेचा घाट गाठला. त्यावेळी घाटावर लोकांची बरीच गर्दी दिसत होती. सगळ्यात आधी पंचगंगेवरच्या ऐतिहासिक शिवाजी पुलावरून घाट पाहिला, तर अजून लोकांनी तिथं लावलेल्या पणत्यांची संख्या तशी कमीच दिसत होती. इकडे पुलावरून लेसर शो घाटाच्या दिशेने सुरू होता.

रंगभूमीवरची पहाट

जे.पी.मॉर्गन ·
लेखनप्रकार
पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते. त्याचप्रमाणे, चौथरा तोच - पण रस्त्याच्या कडेला असेल तर आम्ही त्याला कट्टा म्हणतो, झाडाखाली असेल तर पार आणि समोर नारळ फोडून धूप लावला की आमच्यासाठी तो होतो "रंगमंच"! बाकी ते तुमचे लाइट्स, मायक्रोफोन, विंगा वगैरे सगळे लाड आहेत. ते नसले म्हणून "प्रयोग" थांबत नाही. माझी मराठी लोकं पण जरा वेडीच. ह्यांना थ्री-डी अ‍ॅनिमेशनचं अप्रूप नाही की कुठल्या स्टीरिओफोनिक सराउंड साऊंडचं कौतुक नाही.