पुस्तक परिचय ~ 'जाई' : सुहास शिरवळकर भाग २
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about पुस्तक परिचय ~ 'जाई' : सुहास शिरवळकर भाग २
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
याआधीच्या भागात आपण कादंबरीची पार्श्वभूमी व इतर काही गोष्टींबद्दल चर्चा केली. भाग २ मध्ये कादंबरीचे सविस्तर कथानक व तिचा परिचय तुम्हाला करून देणार आहे.
भाग १ इथे वाचा: https://misalpav.com/node/52058
कथानक:
शाळेत असताना जाई शेखरच्या आयुष्यात वहिनी म्हणून येते. दोघांच्या वयात जेमतेम तीन साडेतीन वर्षांचे अंतर. शेखरच्या घरासमोर अगदी हाकेच्या अंतरावर तिचं घर. परिस्थितीमुळे लहान वयातच वयापेक्षा जास्त समजूतदार बनलेली, नको असलेल्या नात्यांच्या बंधनात अडकलेली आणि ती तोडू पाहणारी पण अयशस्वी अशी एक स्त्री.. दुसरीकडे आहे पोरवयीन, थोडासा अल्लड पण शाळेत हुशार असलेला शेखर.
कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.