Skip to main content

पुस्तक परिचय --'जाई' : सुहास शिरवळकर

लेखक सुजित जाधव यांनी बुधवार, 10/04/2024 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांमधील माझा सर्वात आवडता प्रकार (genre) म्हणजे प्रेमकथा.. कॉलेजमध्ये असताना मनाला रिझवणाऱ्या, भुरळ घालणाऱ्या, एक वेगळी अनुभूती देणाऱ्या अनेक प्रेमकथा मी वाचल्या आहेत. त्या काळात मला प्रेमकथा वाचनाची एक प्रकारची नाशाच चढली होती असं म्हणायला हरकत नाही.. सुशिंची दुनियादारी, खांडेकरांची अमृतवेल, ययाती, हिरवा चाफा, मिलिंद बोकिलांची शाळा, चेतन भगत यांची टू स्टेटस्, वपुंचे पार्टनर ई., अजूनही आहेत.

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

लेखक Narmade Har यांनी मंगळवार, 02/04/2024 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

मानस- धुळवड

लेखक आर्या१२३ यांनी शुक्रवार, 29/03/2024 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
मानस - धुळवड स्थळ: गोंदवले दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस! वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप.

जेव्हा माशाचं पिलू पोहायला शिकतं!!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 28/03/2024 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा! ✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार ✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स! ✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ ✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं! ✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद ✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं सर्वांना नमस्कार. माझी नऊ वर्षांची मुलगी अद्विका- अदू नुकतीच सायकल चालवायला शिकली आणि सायकलिंगचा आनंद घ्यायला तिने सुरूवात केली! हा आनंद आपल्यासोबत शेअर करत आहे. त्या निमित्ताने मनात आलेले विचार शेअर करत आहे.

रेल्वे रिटायरिंग रूम्स

लेखक अक्षय देपोलकर यांनी शनिवार, 16/03/2024 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वेचा प्रवास म्हणजे अस्वच्छ अशी छबी पुसून काढणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अजून एक गोष्ट म्हणजे जंक्शनसारख्या ठिकाणी दिसणाऱ्या रेल्वे रिटायरिंग रूम्स.डिलक्स आणि डॉर्मिटरी प्रकारात सदर रूम उपलब्ध असतात. तीन तासापासून ते चौवीस तासापर्यंत आपल्या गरजेनुसार बुक करू शकता. फ्रेश होण्यासाठी दोन्ही प्रकारात स्वच्छ बाथरूम, टॉयलेट आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असते. डिलक्स रूम ३ तासासाठी ५०० रुपये आणि डॉर्मिटरी बेड ३ तासासाठी १८० रुपये एवढा नाममात्र दर* आहे. आपल्या गरजेनुसार (३,६,१२,२४ तास) रूम किंवा बेड बुक करू शकता.रूम बुक करताना तिकिटाचा पीएनआर नंबर आणि ओळखपत्र द्यावं लागतं.

माझी नर्मदा परिक्रमा

लेखक Narmade Har यांनी शुक्रवार, 01/03/2024 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

रेवदंड्याचं दर्शन

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 16/02/2024 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

आकाश दर्शनाची पर्वणी! तारे जमीं पर!!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 13/02/2024 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
कल्पना चावला स्पेस एकेडमीच्या विद्यार्थ्यांसोबत आकाशातल्या खजिन्याची लूट ✪ तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी रात्रभराचं आकाश दर्शन शिबिर ✪ मुलांचा आनंदमेळा आणि ता-यांचा झगमगाट ✪ “रात है या सितारों की बारात है!” ✪ मृग नक्षत्र? नव्हे, हा तर मोssssठा तारकागुच्छ! ✪ प्रकाश प्रदूषण नसलेलं अप्रतिम आकाश आणि तारकागुच्छांची उधळण ✪ कडक थंडीतही मुलांचा उत्साह, मस्ती आणि धमाल ✪ तुंग परिसरात ट्रेक आणि मुलांसाठी नवीन एक्स्पोजर ✪ नितांत रमणीय निसर्गात राहण्याचा अनुभव सर्वांना नमस्कार.

'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/01/2024 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे. . टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.

३० वर्षांपासून अखंडित....

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 26/01/2024 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.