Skip to main content

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २

लेखक माहितगार यांनी बुधवार, 09/04/2025 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात.

व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 06/04/2025 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
हां तर प्रश्न अतिषय सरळ, साधा आणि सोपा आहे - व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ? एक खरी बुध्दी म्हणजे काय ? (भाषांतर हा एक नाजुक प्रकार आहे . कारण वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेल्या शब्द आणि अर्थ ह्यांचे मॅपिंग हे १:१ असेलच असे काही नाही. अर्थात कोणत्याही एका भाषेतील शब्द अन्य कोणत्याही भाषेत अनुवादित करता येतीलच असे नाही. अर्थात इंटेलिजन्सला बुध्दी असे अनुवादित करणे हे तितकेसे योग्य नाही. पण तुर्तास ते असो.) आता आपण आपल्या आजुबाजुला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उदय उत्कर्ष पहात आहोत. चॅट जी.पी.टी.

व्याकरण , बुध्दी , चैतन्य ||ॐ||

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 04/04/2025 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
सिध्दांत : व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, व्याकरण नाही रे , भाषा , भाषा हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे. हां इट्स इंटरेस्टिंग , Language is a structured system of communication that consists of grammar and vocabulary. अर्थात भाषा हा अक्षरे , शब्द , वाक्ये, एकुणच शब्द सञ्चय आणि त्याला अर्थ जोडणारे व्याकरणाचे नियम ह्यांचा समुच्चय आहे . आणि ह्यातही शब्द सञ्चय म्हणजे क

पुणे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 21/03/2025 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
१. बाणेश्वर गुहा मंदिर बाणेर गाव, बाणेर हिंदू लोककथेनुसार, ही गुहा पांडवांसाठी लपण्याची जागा होती. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर ८ व्या शतकात राष्ट्रकुटांच्या काळात बांधले गेले होते. हे गुहा मंदिर पुण्यातील सर्वोत्तम प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जे भगवान शिव यांना समर्पित आहे. https://maps.app.goo.gl/B7J4R9P3pxg1mNyk9 २. पाताळेश्वर गुहा मंदिर या मंदिराची खासियत म्हणजे ते पूर्णपणे बेसाल्ट खडकापासून कोरलेले आहे. ८ व्या शतकात बांधलेले, या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे.

अंतराळ स्थानक बघण्याचा सोहळा आणि लखलखत्या तार्‍यांची मांदियाळी!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 12/03/2025 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.

दोसतार चे निमित्त

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/03/2025 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
काल अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला. तो कुठल्याशा गावात एका अभिवाचन स्पर्धेचा परिक्षक म्हणून तिथे गेला होता. तेथे एका मुलाने (वय वर्षे १४) माझ्या दोसतार कादम्बरीतील एक उतारा अभिवाचनासाठी निवडला होता. मित्राला सध्या सम्पर्कात नसल्याने दोसतार बद्दल काहीच माहिती नव्हती. पण पुस्तकातील उतारा धमाल वाटल्याने त्याने त्या मुलाच्या पालकांकडे चौकशी केली. त्याच्या पालकानी पुस्तक दाखवल्यावर त्याने थेट मला फोन लावला.त्या मुलाच्या पालकाना माझ्याशी बोलायचे होते. त्या मुलाला कोणीतरी दोसतार पुस्तक भेट म्हणूण दिले होते.

लातूरच्या पानगांवमध्ये आकाश दर्शन व विद्यार्थ्यांसोबत संवाद

लेखक मार्गी यांनी सोमवार, 03/03/2025 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान प्रसाराची "सुदिशा" नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच!

साधो यह तन ठाठ तँबूरे का - कबीर

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 26/02/2025 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
साधो यह तन ठाठ तँबूरे का काल एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे कबीरांची एक अप्रतिम रचना सादर केली गेली - "साधो यह तन ठाठ तँबूरे का" . ऐकता क्षणी मनाला भावली ही रचना !

श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 26/02/2025 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
१. अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन - https://www.misalpav.com/node/44374 २. श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन - https://www.misalpav.com/node/44416 ३. श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार - https://www.misalpav.com/node/46057 ४.

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/02/2025 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर ✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक ✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" ✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग ✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़" ✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी ✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण! ✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान ✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.