Skip to main content

शुक्राची चांदणी

लेखक चक्कर_बंडा यांनी बुधवार, 11/10/2023 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी बाहेर शेतात झोपणं म्हणजे एक पर्वणीचं असायची. उत्तर-दक्षिण उभी पसरलेली शेतं आणि दक्षिण टोकाला, उत्तरेकडे तोंड करून असलेली घरांची वस्ती, घरांसमोर, वस्तीतील वापराचा पुर्व-पश्चिम जाणारा कच्चा माती-फुफाट्याचा रस्ता व रस्त्याच्या पलीकडे ज्याच्या त्याच्या वाटणीची शेतं. या शेतांच्या कडेने सोडलेल्या व साफ केलेल्या जागेत एखाद्या जुनाट पटकुरानं झाकलेली अंथरूण-पांघरुणे दिवसभर उन्हात धूळ खात पडून असत.

संगीत प्र(या)वास

लेखक कुमार जावडेकर यांनी बुधवार, 04/10/2023 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.

आर्थिक नियोजनामागील विचार!

लेखक राघव यांनी शनिवार, 23/09/2023 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः ह्या लेखामागील हेतू हा गुंतवणूक कशी, कुठे आणि किती करावी हे ठरवण्याकरता नाही. त्यासाठी अनेक तज्ञ मंडळींनी मिपावर अगोदरच लिहून झालेले आहे. तेवढा माझा स्वतःचा अभ्यासही नाही. पण मला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय शिकलो इतपतच लिहावेसे वाटले. आणिकही अनेक उत्तम विचार असतील हे मी नाकारत नाही. --- आजच एक धागा बघीतला की आर्थिक नियोजन कसे करावे. कधी विचारचक्रात पडलो आणि भूतकाळात गेलो ते माझे मलाच समजले नाही. एक वेळ अशी होती की अगदीच मोजके पैसे शिल्लक असत, ज्यात गुंतवणूक कशी करावी हेच सुचत नसे.

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

लेखक पराग१२२६३ यांनी बुधवार, 06/09/2023 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 01/09/2023 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" -- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन" -- पण मी

माणसाच्या क्षमतेची गरूडझेप!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 26/08/2023 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
✪ चांद्रयान ३ च्या उपलब्धीसंदर्भात युट्युबवर मुलाखत ✪ भारत देश म्हणून खूप मोठी उपलब्धी ✪ हजारो प्रक्रियांवर अचूक कार्यवाही आणि अनेक दशकांची मेहनत ✪ डोळ्यांनी साथ सोडली तरी जिद्द न सोडणा-या मुलाखतकार वेदिकाताई ✪ Visually impaired असूनही उच्च शिक्षण घेऊन समाजात योगदान ✪ ISRO आणि अशा जिद्दी व्यक्तींकडून खूप काही घेण्यासारखं सर्वांना नमस्कार. सध्या आपण सगळे चांद्रयान- ३ ला मिळालेलं यश बघतो आहोत आणि वैज्ञानिकांचं कौतुक करतो आहोत. चांद्रयान- ३ ने गाठलेली मजल ही खूप मोठी गोष्ट आहे.

ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!!

लेखक स्मिता दत्ता यांनी सोमवार, 21/08/2023 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!! ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी करायची खूप वर्षांपासून इच्छा होती. एक तर महाराष्ट्राचं टोक असलेला चंद्रपूर जिल्हा पहावा असं मनात होतच त्याचबरोबर ते जंगल, तिथले जनजीवन सारं पाहयाची इच्छा होती त्यामुळे जेव्हा माझी मैत्रीण विनयाने ताडोबा च्या सफारीचं आयोजन संदीप आणि रसिका करतायेत तू येणार का विचारल्यावर लगेच नाव दिलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवासाची तयारी केली आणि नागपूरला जायला निघालो. संध्याकाळी साडेपाचची ट्रेन सकाळी नऊच्या दरम्यान नागपूरला पोचणार होती आणि तिथून दोन तीन तासाचा ताडोबाचा रस्ता. ट्रेन साडेपाच वाजता पुण्याहून निघाली.

माझी ट्रेन माझी प्रेयसी (३)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 15/08/2023 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ इथे .. नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या शुभेच्छा ! अजून चार दिवसांनी या धाग्याच्या मागच्या भागाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु आजच्या दिनाचे औचित्य साधून हा नवा भाग चालू करत आहे. नव्या वाचकांसाठी : सन 2017 मध्ये चालू झालेले हे सदर रेल्वेविषयक कुठलीही माहिती व अनुभव लिहिण्यासाठी आहे.

कथा स्मशानातील लग्नाची

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 05/08/2023 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
तो जहाल नास्तिक होता चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता. अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा. देवी देवतांची आणि संत महात्म्याची निंदा केल्यामुळे त्याला कधी-कधी मारही खावा लागायचा. पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते. त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले. परिणाम वयाची पस्तीशी उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही. शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी, त्याच्या अटींवर लग्न करायला तयार झाली. पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख दहा लाख द्यावे लागले. त्याने लग्नाची जय्यत तयारी सुरू केली.