नमस्कार.
मिपा पाहा आज कसं सजलंय. :)
आज मिपा उघडलं आणि मिसळपावच्या मुख्य पानावर नीलकांत यांच्या लग्नाचं निमंत्रण दिसलं. मिसळपावाचं चित्र जाऊन आज तोरण, सनई चौघडे , प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असे चित्र निमंत्रण वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले आणि लक्षात आलं मिपा मालकाच्या लग्नाची तयारी जोरदार झालेली आहे.आता पै पाहुणे यायला लागतील. पण, असा मिपा परिवार ज्यांनी उभा केला. व तो अतिशय आपुलकी व प्रेमाने जोपासला कधी अतिशय कडक पण तरीही मृदु शब्दात चोप देऊन . मिपाला आणि मिपाकरांना एक आत्मीयतेची शिस्त लावून कुटुंबाप्रमाणे जपलं. मिपासाठी वेळ दिला .असा आपला सर्वाचा लाडका नीलकांत . सनई चौघडयाच्या.