Skip to main content

प्रतापगड ,, एक सामाजिक/ राजकीय प्रश्न

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 19/03/2020 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतापगड ,, एक सामाजिक/ राजकीय प्रश्न सद्य मिपावर श्री ओक यांची प्रतापगड संबंधीची लेखमाला चालू आहे आणि दुसरा धागा म्हणजे अनिस/ सर्वधर्म समभाव वाले इत्यादी माझा प्रश्न किंवा खालील विधान हे दोन्ही बरोबर संबंधित आहे म्हणून वेगळं धागा - २०१८ डिसेम्बरला जेव्हा मी प्रतापगड बघयलआ गेलो तेवहा वरील बुरजवरून तळाशी / मध्यभागी पठारासारख्या भगआत एक इमारत दिसलि तर ति कसली हे विचारल्यावर उत्तर मिळाले कि शिवाजी महाराजांची अफजखानाची भेट झाली ते स्थल .. त्यावर नंतर काही स्मारक किंवा माहिती केंद्र सारखे बांधले आहे.. मग म्हणले चला बघुयात..

अकुकथा

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 12/03/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरती अकुकथा म्हणून एक वेगळा विभाग सुरू करावा का? त्यात सर्वप्रकारचे अकु, कायप्पा आणि चेपू साहीत्य टाकता येईल अशी सोय असावी. तुम्हाला काय वाटते?

वाचून झाल्यानंतर …..

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 13/11/2019 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच जालावर अन्यत्र एक धागा निघाला होता की वाचून झालेल्या छापील दिवाळी अंकांचे काय करावे? चर्चेचा रोख हा अंकांचा संग्रह करावा की देऊन टाकावेत, याभोवती होता. अनेकांच्या त्यात सूचना आल्या. त्यातून या धाग्याची कल्पना मनात आली. हाच मुद्दा आपण पुस्तकांना लावून पाहू. साहित्यविश्वात अजूनही बरेच दर्जेदार साहित्य छापील स्वरूपात प्रकाशित होत आहे. ते आवडीने वाचणारे बरेच वाचकही आहेत. हे साहित्य पुस्तक, मासिक अथवा वार्षिक नियतकालिक या स्वरूपात प्रकाशित होते. नियतकालिकांचे आयुष्य तसे मर्यादित असते. त्या तुलनेत पुस्तके दीर्घकाळ साठवली जातात.

शिकणे आणि शिकविणे

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 16/10/2019 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण दोन प्रकारे होत असतं - औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक म्हणजे शाळा व महाविद्यालयात होणारे. ह्या प्रकारात शिस्त असते आणि ते आखीव पद्धतीने दिले जाते. पण याची एक मर्यादाही असते. ती म्हणजे " ऐका, पाठ करा आणि परीक्षेत उतरवा" या त्रिसूत्रीवर ते चालते. त्यात निरीक्षण आणि चौकसपणा यांना फारसे स्थान नसते. हे शिक्षण ठराविक वयोमर्यादेत होते. याउलट अनौपचारिक शिक्षणाचे आहे. ते समाजात वावरताना सतत होऊ शकते. त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही; किंबहुना ते आयुष्यभर चालू राहते. ते घेण्यासाठी इच्छाशक्ती हा एकच गुण पुरेसा असतो. आता या धाग्याचा हेतू सांगतो. समाजात आपला अनेकांशी कामानिमित्त संपर्क येतो.

चला चहा पिऊयात

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 16/09/2019 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
रेड लेबल चहाच्या जाहिरातीवर मिपा वर चर्चा झाली आहे का? माझंव ३ पैशाचे मत असे, मूळ मुद्दा / आशय हा समाजातील , मनुष्यस्वभातील थिटेपणा दाखवून देण्याचा होता आणि तो प्रभावी पणे मांडला हि गेला या जाहिरातीचे आहे (पिके चित्रपटाचा ) हे मनोहर असले तरी अनेक लोक नाराज झाले होते/ आहेत ..

बाजू.. एक घेणं..

लेखक गवि यांनी मंगळवार, 30/07/2019 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
ही बाजू घेणं किंवा ती बाजू घेणं असा बायनरी चॉईस बहुतांश वेळा नसतोच कुणाला. पण कोणतीतरी एक बाजू घेणं, आणि कोणतीच बाजू न घेणं हे दोन चॉईस मात्र बहुतांश केसेसमध्ये असतात. न्यूट्रल, डिप्लोमॅटिक, अनबायस्ड आणि मग आपापल्या बाजूनुसार सेक्युलर, फेक्युलर, सिक्युलर, कुंपणावरचे, शेपूटघालू असे बरेवाईट शब्द या उदासीन असणाऱ्या लोकांना लाभतात. याखेरीज मग सिलेक्टिव्ह निषेध, सिलेक्टिव्ह निषेध पण बाजू मात्र कोणतीही एक न धरणे, सिलेक्टिव्ह सपोर्ट, एकच बाजू एकनिष्ठपणे धरणे, व्हॉटअबाउटरी (तेव्हा कुठे होतात?) हे अनेक प्रकार अगदी रोजच्या वातावरणात मिसळलेत.

कौतुक? चुकून कधीतरी !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 18/07/2019 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी मन हा फार गूढ प्रकार आहे. कितीही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याचा थांगपत्ता लागणे कठीणच. त्याचे अनेक पैलू आपल्याला समाजव्यवहारात दिसून येतात. अनेकांबरोबरच्या संवादातून आपल्याला अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिसतात तसेच स्वतःच्या वैशिष्टयांची देखील जाणीव होते. अशा एका वैशिष्ट्याकडे या लेखात लक्ष वेधत आहे. शीर्षकात लिहिल्याप्रमाणे ते आहे - ‘दुसऱ्याचे कौतुक न करणे’ किंवा अगदी केलेच तर ते हात राखून करणे.प्रथम हे लक्षात घेऊ की ही अगदी मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे ती आपल्या सर्वांत अस्तित्वात आहे.

वरुणच्या जाण्याच्या निमित्ताने - आभासी जगातील प्रत्यक्ष कट्याचे, भेटीचे महत्व

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 13/07/2019 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
वरुणच्या जाण्याने सगळ्यांनाच दु:ख झाले आहेत. त्यांचे वय काहीच नव्हते. माणूस धडाकेबाज होता. बहूआयामी होता. असे कशामुळे झाले ते नक्की समजले नसले तरी आजारपण अन त्यातून सावरले न जाणे हे मुख्य कारण आहे. येथे जवळपास बहूतेक जण आभासी नावे घेतलेले आहेत. येथेच नाही तर चेपू, काय्यप्पा, चिवचिवाट आदी ठिकाणी असलीच किंवा इतर नावे धरून आपण वावरतो. एकमेकांशी संवाद, विसंवाद, चर्चा करतो. भांडतो, एकेरीवर येतो, शिव्याही देतो. तरी पण त्यामागे एक माणूस आहे. तोच माणूस माणूसपण जगतांना हे लिहीतो, चर्चा करतो, संवाद साधतो, प्रतिसाद देतो. सार्‍यांशी बोलतो कारण आपण आपल्या मराठीत व्यक्त होवू शकतो म्हणून.

हवामान अंदाज

लेखक Rajesh188 यांनी बुधवार, 12/06/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
हवामानाचा अंदाज हा विषय लोक विनोदी दृष्टीने बघ तात . तेव्हा मी स्वतः अनुभव ghayche ठरवले आणि सर्व हवामान विषयी अॅप डाऊन लोड केले आणि अंदाज आणि त्या जागेचा खरे वातावरण चेक केले . आणि माझ मत पक्क झालं हवामानाचा अंदाज हे किती तरी प्रमाणात चुकीचे असतात . अजुन सुद्धा हवामान हा विषय मानवी शक्तीच्या पलिकडल विषय आहे

ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 29/05/2019 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" हे अनेक अंकी दीर्घ नाटक आहे. ते जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणत नेले जाईल. त्या कालखंडाचा उपयोग गांधी घराण्याच्या पायाखाली आपले स्वत्व अंथरण्यासाठी थोडासाही विरोध कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी केला जाईल (व त्यांचा नि:प्पात केला जाईल)... आणि सरतेशेवटी अध्यक्षपदाची माळ कोण्या एकाच्या गळ्यात घातली जाईल. त्या उमेदवारीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत... १.