Skip to main content

इंदिरा गांधी जन्मशताब्दी

लेखक गॅरी ट्रुमन यांनी रविवार, 19/11/2017 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जन्मशताब्दी आहे.त्याबद्दल त्यांना अभिवादन. 1 या निमित्ताने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात लिहितो. एक भारतीय म्हणून मला वाटते की त्यांची कारकिर्द भारतासाठी संमीश्र होती. म्हणजे त्यांनी देशासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या आणि काही वाईट गोष्टीही. चांगल्या गोष्टींपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी देशाला एक कणखर नेतृत्व दिले.

आनंददायी इहलोक

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 17/11/2017 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
आनंददायी इहलोक: यनावाला प्रश्न:- प्रत्येक जीवा एक जन्म । जो प्रथम तोचि अंतिम । नाही कोणाही पुनर्जन्म । ऐसा तुमचा विचार ॥१॥ सत्य जर तो मानियेला । अल्पसा काळ आयुष्याला । मग आनंद तो कसला। क्षणभंगुर जीवनी ?

अठ्ठावीस लक्ष रुपये

लेखक यनावाला यांनी शनिवार, 04/11/2017 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला "पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:- मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत.

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान

लेखक यनावाला यांनी शनिवार, 07/10/2017 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्‍यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?" " दत्त मंदिरात जात आहे." " पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे." " अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा !

डिसेंबर महिन्यामध्ये कुटुंबाबरोबर कुठे जाता येईल फिरायला ?

लेखक ज्ञानेश यांनी गुरुवार, 21/09/2017 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हा माझा पहिलाच प्रश्न / लेख मिपा वर. जरा माहिती हवी होती. डिसेंबर महिन्यामध्ये कुटुंबाबरोबर २-३ दिवस कुठेतरी चांगला वेळ घालवायचा मानस आहे. जवळ पास २०-२५ लोकांचे कुटुंब आहे. माझा विचार असा होता कि कोकणा मध्ये कुठे तरी जायचे फिरायला? तुम्हाला काय वाटते? कि दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाऊ ? आणि कोकणा मध्ये एखादे ठिकाण जिथं संपूर्ण कुटुंब मज्जा करू शकते, राहायची सोय वैगरे अशी काही माहिती असेल तर ती पण सुचवा. मी नासिक मध्ये राहत असल्याने नासिक पासून सोयीस्कर पडेल असे सुचवा ! लिहिताना काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मनावर घेणार नाहीत ह्याच खत्री आहे. मिपाकराचे मन मोठे आहे.

मुंबई नेव्हर सेटल्स

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 03/09/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2017/09/mumbai-spirit-monsoon.html "काहीही म्हण हं, मुंबई नेव्हर स्टॉप्स" "काहीही म्हण हं, मुंबईच्या स्पिरिटला तोड नाही" "काहीही म्हण हं, अशा वेळी माणुसकी दिसते" असे संवाद गेले दोन दिवस ऐकायला येतायत, आणि प्रश्न पडतायत की, हे 'काहीही' जे आहे ते कधी म्हणायचं?, 'अशी वेळ' नसते तेंव्हा कुठे जातं हे 'स्पिरिट'? आणि शुड मुंबई नेव्हर स्टॉप? सोशल मिडिया वरच्या असंख्य संदेशांनी डोकं भंडावून सोडलं होतं.

मिपावर अजून काय हवे?

लेखक दशानन यांनी मंगळवार, 29/08/2017 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही अनुभव पाठीशी आहेत संकेतस्थळ चालवायचे. त्याचा उपयोग करून काही गोष्टी / चर्चा आपण करू या उद्देशाने हा धागा आहे. १. लेखन विभागाची मुद्देसूद मांडणी. अनेकगोष्टीची सरळमिसळ झाली आहे, त्याला व्यवस्थित नीट फाटे फोडावेत. २. नवीन प्रतिसाद अनेकवेळा १-२-३ अनुक्रमणिका असलेले धागे मिपाला नवे नाही आहेत, पण कोणीतरी अश्याच धाग्यावर पहिल्या पानावरील धाग्यावर प्रतिसाद दिला, आणि त्याच धाग्यावर शेवटी नवे १०-२० नवे प्रतिसाद असतील... तेव्हा जर सदस्य नव्या प्रतिसादावर टिचकी मारेल तो सरळ पहिल्या पानावरील नवीन उप प्रतिसादाकडे जाईल. आणि पुढील नवीन प्रतिसाद पुढील पानावर असतील तर ?

Artificial स्टिम सेल

लेखक दीपक११७७ यांनी रविवार, 20/08/2017 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एक ओळखीच्या नातेवाईकाने हा खालील मेसेज मला पाठवला तो वाचल्यावर नेमककाहीच उमगल नाही म्हणुन तज्ञाकडून मार्गदर्शनासाठी इथे देत आहे Following message I received माझा ह्या खालील मेसेजवर विश्वास नाही पण नेमका काय प्रकार आहे हे जाणुन घ्याचे आहे Artificial steam cell बद्दलं ( APPELA STEM Cell ) APPELA लेते समय कृपया निचे दी गयी बातों का ध्यान रखिये। 1⃣ हमारी जीभ के निचे मस्तिष्क के मज्जा संस्था के ६६६६ द्वार होते है। जीभ के नीचे से APPELAलेने से सेल 25 सेकेंड्स में मस्तिष्क तक पहुँच जाते है और वहाॅ से हमारे पुरे शरीर में जहा कहीं भी

मराठी मालिका चर्चा - वाहता धागा

लेखक अत्रे यांनी मंगळवार, 15/08/2017 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
या धाग्याचा उद्देश नुकत्याच पाहिलेल्या नव्या/जुन्या मराठी मालिका/त्यांचे एपिसोड्स यावर मत व्यक्त करणे/चर्चा करणे. चांगल्या मालिकांची ओळख करून देणे, भरकटलेल्या मालिकांवर विनोद करणे असा आहे.

"काय करता येईल?"

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 12/08/2017 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही महिन्यांपासून जिथे मिपाकर आहेत असे WhatsApp,फेसबुक समुहांवर एक वाक्य हमखास ऐकू येतं,"पूर्वीचं मिपा राहिलं नाही आता!" याच विषयावर काही मिपाकरांशी बोलताना तीन मुख्य मुद्दे समोर आले ते असे. १.