Skip to main content

कविता माझी

देवाचे मनोगत

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 01/06/2017 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटाच आहे मज एकटाच राहू दे काय मागणे असे ते मी तुजसी देतो रे स्तुतिसुमनांचा वर्षाव जरी करिसी मजवरी तरी संतोष बहुत मज परी जवळीक न साधी रे तू वेगळा मी वेगळा पडू नको गळी रे देवत्व कठिण आहे रे तुज पेलणार नाही रे अंतर राखणे बरे रे तुज अंतरी थारा नको रे तू मम सौंदर्यात लिप्त होउन राही रे सर्वस्व मजला वाहुनी कवटाळिशी दारिद्र्य रे सुखी होउनी संसारी राहशील तर बरे रे तू संत ना महंत ना बुद्ध ना भदंत नर नारायण जोडी एकदाच झाली रे लीला माझी पठण करी कीर्तने प्रवचने करी मज जवळी येताची होशील निर्माल्य तू रे
काव्यरस

मुलगा

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी बुधवार, 31/05/2017 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जमले सभोवताली जे सारे ओळखीचेच होते साऱ्यांच्याच शस्त्र हाती निः शस्त्र मीच होतो हत्यारे उगारली जरी उपकारकर्ता मीच होतो जगण्याची भ्रांत त्यांना जेव्हा केव्हा पडली माझीच भाकरी मी त्यांच्या पुढ्यात वाढली सारेच कसे विसरले ते जेव्हा नागडे होते माझेच वस्त्र अर्धे पांघराया शरमले होते त्यातील एक लहानगा अगदीच पोर होता वार त्यानेच केला जो माझा मुलगाच होता.
काव्यरस

गावाकडच्या मावळतीचे रंग बिलोरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 30/05/2017 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या मावळतीचे …….रंग बिलोरी प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी निवांत निळसर, कबरे करडे पाहून निवती माझे डोळे …....निब्बर शहरी प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी खेळ अ॑गणी रंगुनी जावा दावण तोडुन, आचळ सोडुन ....अचपळ गोऱ्हा .....पिऊन वारा....
काव्यरस

ताणे-बाणे स्थल-कालाचे..

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 28/05/2017 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे(*) क्षणजीवी वर्तमान घडवी स्फटिक अहर्निश अतिताचे (**) उत्पत्ती अन स्थिती,लयाचे रहाट अविरत चालतसे स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे पोहोरे माळुनी फिरत असे ताणे-बाणे स्थल-कालाचे तोलुनी धरिती विश्वाला जटिल,चतुर्मित रूप तयांचे गोचर केवळ गणिताला =============================== (*) अधुनाचे = वर्तमान कालाचे (**) अतिताचे = भूत काळाचे
काव्यरस

जपुन टाक पाउल

लेखक Vinayak sable यांनी शुक्रवार, 26/05/2017 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
"जपून टाक पाउल ... इथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेव विश्वास इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपून घे निर्णय इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन......!
काव्यरस

सांज मुकी

लेखक चांदणशेला यांनी शुक्रवार, 26/05/2017 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांज मुकी आक्रंदताना ह्रदयाची उदास वाणी पाखरांची हरवून वाट सांजकीनारी ना साजणी ओढून आसवांत रात्र अंबरात केविलवाणे दिवे या चिरेबंदी अंधारात अवचित मिटून जावे सर्वस्व उधळून तरीही झेलीत शापांचे चांदणे आयुष्याचा दाटून काळोख धूसर पडसाद जुने असुरी अनाहत दिशा गहिवरला अंतरी गुंजारव हेलावतो अतूट बंध दिठीत तेवतो जन्म तुझ्यास्तव
काव्यरस

सांगा

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 25/05/2017 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
बंधने झुगारणे माझ्याच हाती मानणे ना मानणे माझ्याच हाती कापलेले पंख किती उडणार सांगा प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा
काव्यरस

अध्यात्माची महती

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी मंगळवार, 23/05/2017 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही बरे भोगी योग नको तुमचा चौकट ज्याची असे अध्यात्माची योग, अध्यात्माचा जगी नित्य असे दणका देह भोगणारा तळमळतसे अजूनही शमली नाही वासनाही अध्यात्माची शाल का पांघरावी ? अध्यात्म अवघे बजबजले अनंती उपयोग शून्य त्याचा व्यवहारामधी कुणी म्हणे शांतीसाठी कुणी म्हणे साठीसाठी अद्यात्माचा दवा अतिउत्तम तुम्हा सांगतो ऐका गोष्ट अध्यात्माची नशा नाही उतरत सर्वदाही मदिरेच्या नशेला काळाचे बंधन अध्यात्माची नशा नुतरे कधीही देवादिक असती त्याच्या सभोवताली आम्हीच रंगविले हवे तसे रोजचीच मारामारी जगणे झाले अशक्य अध्यात्म सांभाळिता लुळे पडलो सहिष्णुता भिनली विनाकारण अंगी दाबणारा दाबी हवा तसा अध्यात्म धरूनी हो
काव्यरस

" तू "

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी मंगळवार, 23/05/2017 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
येताच तू, किनारा शब्दात व्यक्त होतो बेभान लाट होते वारा अनर्थ करतो पदरावरी तुझ्या ग फुलती फुले अनेक संध्येस धुंदी येते गंधात स्पर्श फिरतो डोळ्यातले तुझे ते निः शब्द भाव भोळे उर्मीत भावनांच्या ओठात शब्द घसरे चढतो असाच कैफ जाणीव भ्रष्ट होते लहरीत भावनांच्या मजसी भुरळ पडते तो काळही थबकतो अंधार पेट घेतो लाजूनी सागरही ओहोटीत मंद हसतो.
काव्यरस

(दे कुटाणे सोडुनी...)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 16/05/2017 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या' मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया ! एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको ***** पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी मैत्रिणी वर्गातल्या त्या झाल्या आताशा काकवा पोरे तयांची येऊनि तुज मामा म्हणाया लागली 'पास झाला' ऐकण्या हे आई तुझी आसुसली