Skip to main content

कविता माझी

अत्तर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 12/09/2017 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे कितीही मळले, जुने झाले, रंग उडून गेला वीण उसवून गेली घड्या विस्कटून गेल्या तरी कधीतरी लावलेले मायेचे भरजरी अत्तर मंदपणे दरवळत राहते! . . . माणसं अशी अत्तर असती तर..! शिवकन्या

नेत्र न कोई

लेखक दिपक लोखंडे यांनी सोमवार, 11/09/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
दुःख दर्शविण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई शोभून दिसते सुंदरी अन् सुगंध देते मोगरी फरक इतकाच सखे भार तुच्छ हा उरावरी टकटक आवाज करती चाले गुलाबी परी मधुर सुगंध तिचा वाटे नभाची सरी हे दृश्य पाहण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई
काव्यरस

भेट पावसाची..

लेखक दिपक लोखंडे यांनी शुक्रवार, 08/09/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
भेट तुझी माझी पावसाची आठवण आहे बावऱ्या मनाची.. तु सजली आहेस लावून गजरा सह मोहक सुगंध देई मोगरा भुलून गेलो आहे सजनी प्रीत रंग पसरला गगणी ऐकुनी हे बोल तुझे वाटे मज वाजे बासुरी.. बघुनिया रूप तुझे घाव झाला हृदयावरी चंद्र ही निरखून पाही भेट तुझी माझी पावसाची.. – दिपक.
काव्यरस

मी शोधात आहे अशा कवितेच्या,

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 04/09/2017 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी शोधात आहे अशा कवितेच्या, तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे, असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव – हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा, थंड दुधारी कट्यारी इतका खराखुरा
काव्यरस

ऑल इस वेल बाप्पा~~~~

लेखक Swapnaa यांनी शनिवार, 26/08/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऑल इस वेल बाप्पा~~~~ बस थोडीशी माणुसकी, आपलेपणा, वेळ, दक्षता कमी पडतोय.... शहरांतल्या सगळ्यांसाठी : "काँक्रिटच्या जंगलात कमी झाली निसर्गाची छाया, २,३ बीएचके च्या भिंतींत आटली नात्यांची माया" , खेडे गांवातल्या सगळ्यांसाठी : "घरांत हवं AC, दारापुढें चार चाकी स्वछता गृहाशी, त्यांना घेणं देणं च नाही" , सध्याच्या युवांसाठी : "सगळ्यांच्या नजरेत आम्ही दोघं राजाराणी, मात्र आमच्या खोलीत रमतो स्वतःच्या च भ्रमणध्वनीत" , बालवर्गासाठी : "पटांगणावरचे नको खेळ चायनीज वस्तूंचे वेड, सणावारांना खायला भेळ कसलाच नाही ताळमेळ" , तरीही बाप्पा तू आलास की, सगळे एकदम सेंड कर
काव्यरस

महामानव

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 24/08/2017 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी धावलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी
काव्यरस

हायकूचा पहिला प्रयत्न !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 23/08/2017 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक पक्षी अंधारात बरसणाऱ्या जलधारात घरट्यात एकटाच . . . . झाडावरचं एक फूल उमलून कोमेजलेलं झाडाच्याच पायाशी ...... पाहतो शून्यात मी आजकाल नेहमी विश्व निर्मिती तिथूनच ! जुळवले शब्द काही अर्थ उमगलाच नाही तरीही अर्थपूर्ण !

"रित"

लेखक Swapnaa यांनी रविवार, 20/08/2017 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
"रित" ```````````````````````````` रित ह्या घराण्याची जुनी दुःख पंचविण्याची उगता किरणें सुर्याची भिज पुन्हां नव्याने उभी राहण्याची, रित ह्या घराण्याची जुनी .. मध्यन्हांच्या उष्मा तरीही त्यांचा गार माथा तिन्हीसांजेच्या वेळा सदा चेहऱ्यावर दिसें शीथलता, रित ह्या घराण्याची जुनी .. रात्रीच्या चांदण्यात शोधता समाधानाच्या नक्षत्रांस निजण्याची वेळ होता लक्ष पुढ्च्या खडतर प्रवासांस.... रित ह्या घराण्याची जुनी .. कवी - स्वप्ना..
काव्यरस

निघाला शिकारीला कालीयानाग

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 20/08/2017 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
घालून विळखा दोन्ही धृवांना दाबून शेपटीत हिमालयाला दहाफणांनी ओकीत विषारी आग निघालाआहे शिकारीला कालीयानाग. अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे. कारण दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच निघाला आहे शिकारीला कालीयानाग.
काव्यरस

पहिला पाऊस

लेखक तृप्ति २३ यांनी मंगळवार, 15/08/2017 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या कवितेत मी पावसाच्या थेंबांनी मन कसे बहरते ते सांगितलं आहे . ☔ पहिला पाऊस ☔ पहील्या पावसात भीजतांना आठवण तुझी होते पावसाच्या त्या सरीमधे मन माझे उमलते ☔☔☔☔☔ हाती तुझा हात घेऊन भीजावेसे वाटते दाटलेल्या त्या धुक्यांमधे रमावेसे वाटते ☔☔☔☔☔ पावसाच्या सरीने दरवळतो सुगंध मातीचा भीजतांना त्या सरीमधे विसर पडतो स्वतःचा