मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

" तू "

अरूण गंगाधर कोर्डे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
येताच तू, किनारा शब्दात व्यक्त होतो बेभान लाट होते वारा अनर्थ करतो पदरावरी तुझ्या ग फुलती फुले अनेक संध्येस धुंदी येते गंधात स्पर्श फिरतो डोळ्यातले तुझे ते निः शब्द भाव भोळे उर्मीत भावनांच्या ओठात शब्द घसरे चढतो असाच कैफ जाणीव भ्रष्ट होते लहरीत भावनांच्या मजसी भुरळ पडते तो काळही थबकतो अंधार पेट घेतो लाजूनी सागरही ओहोटीत मंद हसतो.

वाचने 1331 वाचनखूण प्रतिक्रिया 4

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 27/05/2017 - 12:32
डोळ्यातले तुझे ते निः शब्द भाव भोळे उर्मीत भावनांच्या ओठात शब्द घसरे
अहाहा...! जियो. -दिलीप बिरुटे