मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताणे-बाणे स्थल-कालाचे..

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अथांग धूसर भविष्य उडवी तुषार अविरत अधुनाचे(*) क्षणजीवी वर्तमान घडवी स्फटिक अहर्निश अतिताचे (**) उत्पत्ती अन स्थिती,लयाचे रहाट अविरत चालतसे स्थूल, सूक्ष्म, चेतन नि जडाचे पोहोरे माळुनी फिरत असे ताणे-बाणे स्थल-कालाचे तोलुनी धरिती विश्वाला जटिल,चतुर्मित रूप तयांचे गोचर केवळ गणिताला =============================== (*) अधुनाचे = वर्तमान कालाचे (**) अतिताचे = भूत काळाचे

वाचने 1671 वाचनखूण प्रतिक्रिया 5

पद्मावति 29/05/2017 - 22:10
उत्कृष्ठ!
स्फटिक अहर्निश अतिताचे
फार आवडले.

अनन्त्_यात्री 30/05/2017 - 10:09
सौरा, पद्मावति धन्यवाद!