Skip to main content

कविता माझी

वादळ

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 02/04/2018 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ उरी फुटते रात्र उठे अंधारी प्राणात पेटे वादळ क्षितीजाचे रंग असुरी शुभ्र चांदण्या जाळून काळोख पसरे चहुकडे प्रकाशाच्या तुकड्यासाठी एक छाया तडफडे पानांच्या हिरव्या देहातून हुंकारते वाऱ्याचे काळीज घायाळ त्या सुरांभोवती श्वासांचा हलतो आवाज मंद शुक्राचा भास भुलते चंद्राची वाट निद्रेत आज फुलांच्या उसळते दु:खाची लाट
काव्यरस

गणपत वाणी, सतत मागणी

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 02/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

शून्याची महती

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 16/03/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
शून्याची महती भारी या भूवरी शून्यावरी शून्य बैसे शून्यापरी शून्यात असे दुनिया सारी शून्यात देखता शून्य भासे शून्य शून्यात हासे शून्यात अनन्य अर्थ असे शून्यासम दुजा कुणी नसे शून्यात बेरीज शून्य शून्यात वजा शून्य शून्य गुणिले शून्य शून्य भागिले शून्य धन्य धन्य तो शून्य ज्याने शोधिला ते त्याचे पुण्य शून्यात सुरु सारे शून्यात मिळे सारे का वाढावी उगा रे ? दुःखाचे हे पसारे उगा धावीशी तू अनन्य जाण कर्म मर्म शून्य सुरुवात तुझी शून्य अंतही तो शून्य तिमिरतेज जो खाई परमात्मा तोही शून्य धन्य धन्य केवळ शून्य दुजा नसे कुणी अन्य सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस

कशी वाटली आमची दहा बाय दहा ?

लेखक खिलजि यांनी सोमवार, 12/03/2018 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
कशी वाटली आमची दहा बाय दहा आनंद ओसंडून चाललाय पहा शेजारी शेजारी मांडलीय चूल छोटी सासू लाटतेय चपाती भाजतेय सून मोठी धाकटीने घातलाय कपड्याना पीळ मधली करतेय पोरांचा सांभाळ छोटंसं घर त्याचं इनमीन चार वासं इवल्याश्या घरात राहतात बाराजण कसं ? महालाला लाजवेल अशी घराची शोभा महादेव प्रसन्न हस्ते जागोजागी उभा घराला घरपण माणसांनीच येते भुई चालेल कमी पण लागते घट्ट नाते सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस

प्रेम रंग

लेखक तृप्ति २३ यांनी सोमवार, 12/03/2018 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम रंग ही कविता  प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

लग्नानंतरची गुरुकिल्ली

लेखक खिलजि यांनी सोमवार, 05/03/2018 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊल टाकता घरात , उघडावे ते कपाट , बदलावे सारे कपडे , राहुनी गप मुकाट चहा झाला तरीही , प्यावासा वाटला तरीही कप गुमान धुवून घ्यावा , देईल तेव्हढाच प्यावा इथे तिथे बघावे नंतर , ठेवुनी एक माफक अंतर हळूच जेवणाबद्दल पुसावे येता आवाज तो करडा , होईल तेव्हाच खावे चालेल थोडे कमी असले मीठ , चालेल थोडा असला कमी मसाला आवाज ना करता गप्प उठावे , हलकेच टाकावे बेसिनला काडीची चव नसली , तरीही गोडवे खुशाल गावे हलकेच आठवूनी जेवण ऑफिसातले , दात कोरत बसावे येता भांड्याचा आवाज फार , हळूच बंद करावे दार , बेडरूमचे मुलांना जवळ घ्यावे , आणि त्यांच्या अभ्यासात रममाण व्हावे थोडे दटावावे अभ्यासावरूनी
काव्यरस

मुलांची हरवत चाललेली आई

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 01/03/2018 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
अगं असशील गं तू लोकांसाठी नावारूपाला आलेली बाई पण माझी तू फक्त आई आहेस मी लहान असताना तू किती प्रेम करायचीस हवं नको ते सारं बघायचीस मी कर्तासवरता झालो नि तू दूर दूर गेलीस इतकी कि आज तुला माझी हाकही ऐकू येत नाही मी ओरडतो, घशाला कोरड पडते बेचैन होतो , आतून बाहेरून फक्त एकच आवाज असतो " आई, आई नि फक्त आई " तू प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत गेलीस एकावर एक पुरस्कार मिळवत गेलीस प्रत्येक पुरस्कारासाठी वेळ देत गेलीस पण मी तुला मनापासून दिलेले पुरस्कार विसरलीस देवाची बरोबरी फक्त तूच करू शकतेस तो आहे कि नाही?
काव्यरस

झेब्र्याचा जन्म

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 01/03/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाघ शिकारीस निघाला शोधत शोधत शिकार तो कुराणाशी गेला डौलदार अजस्त्र तो, डोळे शिकारीकडे गाढवांचा कळप तेथे चरण्यासी आला हेरली एक बाकदार, सुंदर, नाजूक गाढवीण त्याने असेल फर्लागभर अंतरावर घेऊन पावित्रा मारणार उडी इतक्यात नजरभेट झाली त्या सुंदर गाढविणीच्या नजरेने केली, शिकाऱ्यावरच कडी अन शिकारी खुद्द शिकार झाला तारीख ठरवली गेली लग्नसोहळ्याची घेतल्या आणाभाका शिकार न करण्याच्या यथेच्छ जोड्याने चरण्याच्या मंगला समयी लग्न लागले सोहळ्यास सारे जंगल लोटले सर्व सुखांत ते तृणभक्षक आता भय नसे कुणाचे वाघच आपला रक्षक मंगलाष्टक म्हंटली गेली कालांतराने गाढवीण व्यायली द
काव्यरस

प्रेमळ दूध

लेखक खिलजि यांनी बुधवार, 28/02/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचं प्रेम दुधासारखे सफेद होते मस्त पैकी उतू जात होते आनंदाची साय जाऊन जाऊन भांडण एवढे वाढते कि त्याचे घट्ट दही होते विचारांची पकड सैल होतं जाते रंगवलेलं काय वेगळंच पण घडत मात्र दुसरंच असते आता प्रेम, प्रेम नसते , तर त्याच ताक झालेलं असते हेवेदावे मांडले जातात , वादावर वाद घातले जातात भावना घुसळून घुसळून वर येतात " शिल्लक राहिलेल्या आठवणी " प्रेम आता प्रेम नसतं, तर बनतं त्याचं लोणी असंच काही काळ साठवलं जातं "मी कशाला जाऊ ?
काव्यरस

॥ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही ॥

लेखक खिलजि यांनी सोमवार, 26/02/2018 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही मस्त आलिशान घर होतं दिमतीला गाडी न नोकर होते अन मी सारखी तुझ्यामागं पळत होते ॥ लग्नही असंच पळून केलं पण तुझं घर बघताच, मन पार गळून गेलं जणू सुरु झालं नाही तोवरच संपलं एवढयाश्या घरातच सारं सुरु झालं जिथे चूल होती तिथेच मोरी होती आपल्याच घरात मुतायची चोरी होती चहा झाला कि हात लांब करून दिला जमीन जशी पावला पावलांसाठी भिकारी होती ॥ जोरात बोललं तर शेजारून यायचं उत्तर भांडं पडलं तरी शेजारी जमायचे सत्तर घर पार भरून जायचं प्रश्न सदैव पडला , आता पुढचं आयुष्य कसं उडायचं ?
काव्यरस