Skip to main content

॥ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही ॥

लेखक खिलजि यांनी सोमवार, 26/02/2018 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही मस्त आलिशान घर होतं दिमतीला गाडी न नोकर होते अन मी सारखी तुझ्यामागं पळत होते ॥ लग्नही असंच पळून केलं पण तुझं घर बघताच, मन पार गळून गेलं जणू सुरु झालं नाही तोवरच संपलं एवढयाश्या घरातच सारं सुरु झालं जिथे चूल होती तिथेच मोरी होती आपल्याच घरात मुतायची चोरी होती चहा झाला कि हात लांब करून दिला जमीन जशी पावला पावलांसाठी भिकारी होती ॥ जोरात बोललं तर शेजारून यायचं उत्तर भांडं पडलं तरी शेजारी जमायचे सत्तर घर पार भरून जायचं प्रश्न सदैव पडला , आता पुढचं आयुष्य कसं उडायचं ? ॥ सकाळी शौचास तर हि गर्दी उसळलेली ते पाहून तर मी खालीच कोसळली ह्या भल्यामोठ्या लागल्या होत्या रांगा आत्ता प्रेमात अजून काय काय करायचं असतं ते सांगा ॥ मी देखील घेऊन उभी होती लोटा पोटातून खाली सरकत होता हळूहळू गोळा मोठा करू लागले मी देवाचा धावा मनोमन वाटू लागले आपल्या घरीपण संडास असावा ॥ आधी कधी वाटली नव्हती एव्हढी त्याची थोरवी पण आता मात्र वाटत होते कि हि जी आलीय ती संडासातच व्हावी बाप माझा वाटू लागला मला परमेश्वर ज्याने एवढं सुखात ठेवलं होतं अन दिलं होतं आलिशान घर ॥ सिद्धेश्वर विलास पाटणकर ( पूर्वप्रकाशित पण समयोचित कविता )
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1564
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

:D पुन्हा वाचायला तेवढीच मजा आली....!

सांभाळा स्वत:ला हा न मागता दिलेला सल्ला आहे माझा. किमान पंधरा वर्ष तरी या संस्थळावर राहायचय असं तुमच्याच अन्य एका धाग्यात म्हटलेय तुम्ही.