Skip to main content

करुण

इनो संपल्या नन्तर .....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 25/02/2011 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
हे काय नशीबी आले...हे भाग्य हे असले कसले बघ निघुन गेले सारे साथी...माझे मनोगतही फ़सले मी डोळे उघडुन बघतो..तेंव्हा माझे मला कळते घ्यायला घास मोठा गेलो ...तेंव्हा दंताडच हरवुनी बसले बहर माझा लिहिता लिहिता केंव्हाच सुकोनी गेला फ़ुका कौतुक होत होते...तेही आता अंतरले उरल्या कथा ;जेवण यादी .प्रतिसाद नाही मिपावरती विखार माझा फ़ुसका ठरला...अन विचार वैभव हरले आता शिव्या उरल्या ओठी...... पोटी परी जळजळणे ईनो घेउन.जिवंत रहाणे हेच नशिबी केवळ उरले उपक्रम एकटाच राबवीत बसलो ऐसा मीच मला म्हणूवूनी थोर..

त्याच्या पासपोर्ट साईझ फोटोचा नकाशा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 24/02/2011 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्याने फेस बुकावर त्याचे नाव दाखल केले आहे पण फोटो नाही टाकला पासपोर्ट साईझ ..!! एकतर त्याच्याकडे फोटोच नाही असला तरी तो खूप जून वाटतोय खराब चेहरा थोडासा चकणा डोळा डोक्यावरचे उडालेले केस मस्त टक्कल पण तरीही नेटवर एक आकृती छापलीय गेलीय एक नकाशा उमटलाय शरीर अववयाचां ...!! बिन चेहर्याचा तो खूष आहे त्या फोटोवर बिन चेहर्याचा फोटो त्याला खरेच मस्त वाटतोय त्याचे सुख त्याचे दुख तो शब्दातून मांडू लागलाय एक निरागस कोवळेपण आभाळातील उधळलेल्या मुठभर चांदण्या नि चंद्राचा पिवळा प्रकाश मनात काहूर माजवतात तुमचे नाव पण नाही, नि फोटोचां नकाशा ..? नकाशाचा फोटो बघायला बरे वाटते बघा
काव्यरस

घुबडाच्या मागे लागले कावळे हजार ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 18/02/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून आली कावळ्याची जीवघेणी कावकाव आंधळेपणाने दिवसाच्या प्रकाशात उडणारे वाट चुकलेले घुबड झिडपिडत टकरा खात होते भिंतीला आंधळेपणाने उडत होते कावळ्याच्या नजरेतून गहाळ होण्यासाठी जीवाच्या आकांताने जीव घेउन घाबरून वळचणीला जाऊन बसत होते माणसासारखे तोंड ,नजर ,ते नाक घाबरून आपल्यातच गुंतत होते खोल काळोख्या गुहेत कावळे पंख झापडत त्याला टोचा मारायच्या प्रयत्नात ते मिट्ट मख्ख , आपल्याच नादात त्याच्या ताकदीचा अंदाज काळोखात लुप्त अदृश्य केविलवाणा ...!! मी पाहत होतो त्याची केविलवाणी धडपड जगण्यासाठी त्याची ठाम धडपड आटोकाट .... सतराशे साठ कावळे नि ते एकटे घुबड आंधळे तरी झुंझत होते
काव्यरस

' सुखाचा ठेवा -'

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 18/02/2011 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी बालपणी खेळविले, तुज खांद्यावर नाचविले तुज खेळविता मी बाळा, ना केला कधी कंटाळा तू किती जरी मज छळले- तव खेळी मन विरघळले कधि घोडा-घोडा झालो; ओझ्याचे गाढव बनलो ! तू तळहाताचा फोड, पुरविले सर्व तव लाड ठेवून 'रोज' मनी स्वार्थ , ना घालविला क्षण व्यर्थ ! कालांतरि होशिल मोठा ! सन्माना नसेल तोटा ! नोटांच्या पायघडया त्या- कुणि घाली सामोरी त्या ना विसरावे तू मजला, ही एकच आस मनाला ! कधि कुणापुढे ना झुकलो; परि आता मी रे थकलो- 'ती' इच्छा मम पुरवावी ' मज वृद्धाश्रमी न ठेवी ! ' तव खांदा मला मिळावा- मजसाठी "सुखाचा ठेवा" !
काव्यरस

एक घर विकत घ्यायचे आहे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 18/02/2011 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
खरेच एक घर विकत घ्यायचेय एका कवीला कोणी देईल का घर .? छोटेशे चिमुकले सुंदर घर कोठे मिळेल का घर?
काव्यरस

<परततीचाच प्रवास>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 17/02/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास छान व्हावा छान असते स्वप्न फर्स्ट क्लास चा पास असतो [सेकन्ड चे तिकीत काढण्यापेक्षा तो परवडतो ] मस्त पट्टे ओढलेला डबा वाट पहात मी प्लॅटफॉर्म वर उभा मनात दाटून येत असतो विरक्तीचा उमाळा रात्री छान झोप घेतलेली असते मनात कामाची जाग दिसत असतात ट्रॅकवर छत्र्यांचे ताटवे ट्रॅकच्या सोबत भिम्तीवरच्या झैराती बंगाली बाबा नौकरी पावो मस्त महिने मे दस हजार कमाओ दोसती करो फिरंगनसे पेट गैस और सैक्स की दवाए इंद्री का छोटापन ...
काव्यरस

<< प्रेमदिनाच्या खस्ता >>

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 15/02/2011 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमदिनाच्या रस्त्यावर असलेले अनेक वेडे काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले गुलाबांचे झेंडे लावतांना काही तर काही असेच खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले. टुकार पाखरं मधुनच समोर येत मनाला टोचत आणि फाट्यावरती अम्हास्नि उडवत मोठे होताना लज्जा-भावनांचेही भान नसे. कॉलेजपणात नंतर आल्यावर कट्ट्यावर मुसमुसुन भरलेल्या त्या, मित्रांच्या जिवावर मारलेल्या उड्या अन मनात आठवणींनी गंधलेला सुगंध शहरभर पसरत असे. आता नव-शहरीकरण झाल्यावर व्यक्ती-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना उगाचच मन कुठेतरी ठेचकाळते काहीतरी टोचतं आणि मॉनिटर समोर बसुनही आठवणींच्या सुगंधाचा भास जाता जात नाही.
काव्यरस

दैव आज हरवले!

लेखक स्वैर परी यांनी बुधवार, 09/02/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
लोपले ते सूर माझे, संपली ती स्वप्ने कळवळले आकाश सारे, सोबत मूकपणे होते मनी काय आणि काय घडले आज मीच माझ्या अंतरीचा घेत आहे ठाव कालच्या त्या आठवणी आज जाग्या जाहल्या वेळ गेली रे निघुनी खुणा मात्र राहिल्या धूर्त होती हृदये सारी प्रेम कोठे सांडले का पशुसम वागणे अन खेळ असे हे मांडले त्रिवार पाहून घेत आहे आज तुझ्या या मंदिरा या तुझ्या दरबारी होतो सेवक तुझा मी खरा पाखरे आज झाली वैरी पंख त्यांस गवसले लागली गोडी तुझी, परी दैव आज हरवले - परी
काव्यरस

हे कवितेचे झाड....!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 09/02/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे कवितेचे झाड माझे आहे तुमचे आहे ह्याचे आहे त्याचे आहे सर्वांचे आहे सर्वत्र आपले- पणाची भावना आहे ..!! या ..!! मनसोक्त बसा चिवचिव करा चिवचीवेचे सूर होतील काही सूर बेसूर असतील हरकत नाही ...!! पण शेवटी सुरांचे एक गाणे होईल गाण्याची गझल होईल मग छान मैफल जमेल सगळेच काही गाणारे नसतात सगळेच कोणी कवी नसतात ते नसतात नि तुम्ही असता [?] त्यांच्या सुरांना साथ नसते नि तुमचे सूर गगन भेदते त्यांच्या मुळे तुम्ही मोठे एवढेच फक्त लक्षात ठेवा ..!! हे चंद्र , सूर्य , तारे ही फुले झाडे ह्या नद्या नाले आम्ही आहोत म्हणून ते आहेत त्यांचा आम्हाला आधार आहे म्हणून त्यांनी गर्व करा
काव्यरस