Skip to main content

करुण

गालिब

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 14/06/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः हिंदीमध्ये काही लिहीण्याचा प्रयत्न केला होता. हि गजल नाही. कविताच आहे. गालिब ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
काव्यरस

पर्सनल अकाऊंट

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 13/06/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
खरच...?मी आहे स्वतंत्र?... की,मी मालक आहे,एका बंद खोलीचा?॥ आपल्याच भींती,आपल्याच खिडक्या... आपलीच दारे,आणी कुलुपही आपलेच... प्रश्न आहे,हे सर्व उघडण्यासाठी लागणाय्रा चावीचा। आत राहायचे,निवारा हवा म्हणुन... आणी प्रेमाची माणसे असावी म्हणुनही... पण माणसं असुनही प्रेम नसेल,तर कुठुन कौल घ्यावा विवेकाचा?। कंटाळुन,वैतागुन मी बाहेर जातो,माळरानावर हुं-दडण्यासाठी... पण पुन्हा परतण्याची ओढ का लागते?... काळ येउन ठेपलाय,हे सगळं एकदा तपशिलवार शोधण्याचा। आजकाल मी समजतो,ही खोली आपलं पर्सनल अकाउंट आहे... आणी आपला हिच्याशी...मरेपर्यंत एक बाँड आहे... खरा मार्ग आहे,तो अकाउंट एक्टिवेट ठेवण्याचा। पराग दिवेकर...
काव्यरस

चबुतरा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्यागर्द झाडीत, जुन्या चबुतऱ्यावर उन्ह पाऊस झेलीत, उभी आहे दगडी छत्री पायथ्यात विसावलेल्या कोण जाणे कुणाची महानिद्रा सांभाळीत, वखवटातात जीवनाच्या तिच्या आजुबाजुला, निर्मितीचा नंगा नाच चालू आहे अव्याहत, मरणाच्या एकटेपणावर हिरवे काळे बुळबुळीत लिंपण लावीत जीवनाने पाय रोवले आहेत छत्रीच्या माथ्यावर उडणारे पक्षी मधूनच कधी टेकतात अस्वस्थ माना वळवून शोधतात शोधतात मागे राहिलेल्या कुणाला तळात छत्रीचा कुणीतरी, नेहमीसाठी जवळ. हंबरत येवून एखादी गाय पळभर विसावते छत्रीच्या दगडी चबुतऱ्याशी घासून मान थोडी शमवते रुखरुख तो शांत आतमधे, नाही कसलीच बोच कॅमेरा रोखून कोणी प्रवासी घेतो फ़ोटो खांबाशी रेलत्या हस
काव्यरस

घाव

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 10/06/2011 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोक्स चारोळीचे धागे बनवताहेत. म्हटले आपण पण न लाजता (कोण हसतोय रे तो? आहे. आहे मला थोडीशी का होईना लाज) जे काही आहे ते प्रकाशावे. वादसंवाद करताना निर्मिती झालेली आहे त्यामुळे श्रेय अर्थातच मला नाहीये. प्रस्तावना पुरे झाली. तर सादर आहे माझे शेरोशायरीतले पहिले अपत्य. घाव तो होता जुना पण वर्मी नव्याने लागला पुसटल्या जखमांना जणू आज स्पर्श कुणाचा जाहला आली अशी कळ उरी, आली उरी कळ अशी जणू अंत मी स्वतःचा, आज जवळ पाहिला
काव्यरस

.टिंब.

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 08/06/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज संध्याकाळी ; टिंब रंगते एक होळी आडरानी पंक्चरणार्‍या टायराची रांगोळी मर्तीकेची गर्दभे येती चढवुनी कैफ गोळी येती सारी येकजात देता एक साधी हाळी चिवडा आणि अंडी उकडली ; फेकूनी द्या ती भाजी पोळी संपवुनी चखणा आणि चोखुनी नळी गडी पहुडले तर्र झोकुनी ; हाती घेवूनी रात्र काजळी उजेड फुटतो भल्या सकाळी आड भिंतीपलीकडे ओकलेली पित्तनळी उभे रहाता पाउले पकडती दिशा वेगवेगळी ओघळे ढेरी खेळती डोळे कोशिंबीर आंधळी बंद पाकीटाला ओढ एक तारखेची आगळी दुर्दम्य घायाळ आशावाद; जात नाही कधी काळी स्पर्श पहिल्या धारेचा ;चमके मुद्रा बावळी घेताना नांदते ओठावरी नवनवी लाखावळी जीवनात रंग भरे सृजनतेची

आता नाही ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 08/06/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
सुचते बरेच काही, पण लिहिणे होत नाही ... दिसते बरेच काही, पण पाहणे होत नाही ... छळते तुझीच साद, सखे पण येणे होत नाही ... साठवले बरेच काही, पण देणे होत नाही ... तुझ्या घरावरून सखे , हल्ली जाणे होत नाही पूर्वीची ती युगुलगीते, आता गाणे होत नाही ... स्वच्छंद मनस्वीतेने आता जगणे होत नाही जाहलो भ्याड इतका आता मरणे होत नाही ...
काव्यरस

एक राधा, एक मीरा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 08/06/2011 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आजही यमुनातीरावर राधा कदंबाखाली उभी अगदी नेहमीसारखेच आजही प्रतिक्षा; ठाऊक आहे कान्हा गोकुळात नाही तरीही अगदी नेहमीसारखेच कसे युगान्तीत प्रेम हे अवघे निळे आभाळ काजळले अमर प्रेमाचे चमचमते थेंब ओघळलेले कदंबाच्या पानापानात ते गच्च दाटलेले राधेचे उत्तरीय त्या प्रेमात चिंब जाहलेले राधा कशी पुरती बावरलेली इतक्यात दुरून एकतारीचे सूर घुमले नितांत आर्त विरहगीत त्यामागून आले राधेचे नेत्र त्याचा उगम शोधू लागले दूरवर एका वडाखाली एक सात्विक सौंदर्य, वल्कले नेसलेले राधा धावत सुटली त्या वडाकडे त्या सौंदर्याला गाठायला अचानक ती मध्येच अडखळली, वेडावली, मुळातून हादरली अजरामर प्रेमाचा वर्षाव त्या कदंबापली
काव्यरस

कावळे ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 01/06/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ... कुणी आंधळे तर कुणी पांगळे अरे हीच मायभूमी जिने दिले मावळे ... चालती अनंत भक्त पाहण्या रूप सावळे नुकताच मेलो आहे मी, आहे पिंड कोवळे ...
काव्यरस

ताळेबंद

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 31/05/2011 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
चालले मी परी विखुरल्यात इतस्ततः जाणीवभर लहानथोर माझ्या खुणा पदोपदी जाणवताना मिळेल आठवांना उजाळा शब्द - नात्या विरहीत आपला भावबंध आगळा नसणारे मी, एक शाश्वतय, मान्यय मला मनातला ठाव माझा अशाश्वत ठरणार का ? होते खरच ना मी इथलाच भाग अविभाज्य ? पानगळीइतकचं शुल्ल्क होतं माझं अस्तित्व ? आजर्पंतच्या असण्यावर प्रश्नचिन्ह उमट्लेलं जमाखर्चाच शेवटचं पान ताळेबंद विसरलेलं
काव्यरस

नियतीचा क्रूर खेळ

लेखक स्वर भायदे यांनी मंगळवार, 24/05/2011 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
धो धो बरसणाऱ्या पावसातही मन माझं भिझत नाही... तुझ्या विरहाने मनात लागलेली आग काही केल्या विझत नाही ।। तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण... मन अजून जगतय तु आता नाहीस तरी वेड्या सारखं वागतय ।। अनेक वेळा प्रश्न विचारला मी मनाला... का विसरू शकत नाही मी तुला ? मन म्हणाल वेड्या विसरत का कुणी स्वतःला ।। प्रेमा मध्ये आपली का स्वतंत्र अस्तित्व उरली नाही ... आणि तुझी साथ मला जन्मभर का पुरली नाही ।। नियतीनी रचलेल्या चितेवर संपल का आपलं नातं मग तरीही का उरलय मनात प्रेम... कधी संपणार हा नियतीचा क्रूर खेळ ।।
काव्यरस