मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[काल रात्री ]

निनाद · · जे न देखे रवी...
मिकाच्या उत्साहाला सलाम करून अजून 'एक काहीच्या काही भयाण' विडंबन. या भरल्या गटारात चाचपडताना | बार बार तुझ्या शोधात फिरतांना | बाकड्यावर बसून तुझी वाट पाहतांना| कळले की सारे सारे पैसे संपून गेले, काल रात्री || चोरली माझी नवी ती सारी वस्त्रे | धरली नि बदडली देहाची गात्रे | सांजवेळी स्मरली आपल्या पार्ट्यांची सत्रे , मित्र सारे की सारे बिल न देता गेले, काल रात्री || बारचे वेटरही मजबूत काळे | शर्ट चोरला पँटही नेली लंगोट आवळे| अन् इथे कुणी सोडलेले सुसाट नळे | बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले, काल रात्री || कविता जणू शब्दबंबाळ जाळे | दमूनी पाहतो, कधी संपते न कळे| किती करावे मी तरी पांढर्‍यावर काळे| निम्मी विडंबित करून थांबलो येथेच, काल रात्री ||

वाचने 1524 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अव, किती छळाचे एखाद्याला? काही मर्यादा? मायला तुम्ही तर मागेच लागले माझ्या... म्या गरीबाने काय घोड मारल वो तुमचं? ऑ ऑ ऑ? अवांतरः
बारचे वेटरही मजबूत काळे | शर्ट चोरला पँटही नेली लंगोट आवळे| अन् इथे कुणी सोडलेले सुसाट नळे | बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले, काल रात्री ||
इथं ह.ह.पू.वा. :D आणि इथे
किती करावे मी तरी पांढर्‍यावर काळे| निम्मी विडंबित करून थांबलो येथेच, काल रात्री ||
मिटर चुकल की वो!! :(

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

निनाद 29/04/2011 - 11:26
अव, किती छळाचे एखाद्याला? काही मर्यादा? मायला तुम्ही तर मागेच लागले माझ्या... म्या गरीबाने काय घोड मारल वो तुमचं? ऑ ऑ ऑ? "मिका असे थोर हळूवार कवी कसा मारे माझे घोडे उंट हत्ती? हे शब्द उगाच आपले येड*वी म्हणती विडंबनास जमीन हवी ||" शेवटच्या कडव्याचे म्हणाल तर, कविता रात्रीची आहे मिका, समजून घ्या! ;) रक्तवारूणी कमी पडल्याने असे होते कधी कधी... चालायचेच. मी कुठला आलो कवी. तुम्हीच द्या ना लाउन मिटर चांगले.