मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संततधार

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
त्या कुंद पहाटे झडली संततधार मेघात विखुरले मन माझे चौफेर आषाढघनांचे धुके; नाचरे मोर उंचावुन माना शोधे चंद्र चकोर सागर भरती लाटेवर फेस विभोर रेतीवर रांगे ओघळात हिंदोळ अंधारनभाचे ओणवले झाकोळ वार्‍यात मातला अश्वबळाचा जोर चहुओर सैल मग का मनभर हा घोळ थेंबात थेंब दुथडीत अवखळे लोळ झिंगूनहि नाही कुठे लागला मेळ मृगजळ्स्वप्नांचा भातुकलीत समेळ .....................अज्ञात

वाचने 1514 वाचनखूण प्रतिक्रिया 3

गणेशा 02/08/2011 - 19:35
अप्रतिम कविता .. आवडली एकदम. आषाढघन शब्द वाचुन खुप छान वाटले.. असेच लिहित रहा... वाचत आहे...

चित्रा 07/08/2011 - 04:22
चित्रदर्शी कविता. पहिली दोन कडवी अधिक आवडली.