Skip to main content

देहदशा

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 22/08/2011 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांवर मुकेच नांव तुझे पापणीत दडल्या आठवणी हृदयात रमलरत गहन तळे कांठावर गहिवरते पाणी वाटेत मावळे देहदशा भेटे स्वप्नी तरिही कोणी रंध्रांत घोर आणीबाणी दाटून दग्ध वाग्विलासिनी रममाण रमण तन मन ध्यानी जन्मात जन्म झाले आणी पायांत शृंखला जडलेल्या चाललो एकला अनवाणी ...................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 949
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया