Skip to main content

हास्य

क- कवितेचा

लेखक बाबुराव यांनी गुरुवार, 14/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमी येतो मिसळपाववर आन, चाळा म्हणून क्लिक करतो, लेख,कविता, आन पाककृतीवर. आवडलेल्या वळींवर फिरत राहतो कितीतरी येळ, आलटून-पालटून शांतपणे. आन बांधाबांध करतो मनातल्या प्रतिसादाची. असह्य कोंडमारा होऊन टाकता आला नाय प्रतिसाद तर, लॉगऑफ करुन, पाहत बसतो मॉनिटर कितीतरीवेळ अस्वस्थपणे.

(छंद दे)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 14/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूची सुरेख कविता 'छंद दे' वाचली आणि आमची संक्रांत आलीच!
काव्यरस

विडंबक

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 12/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरेची 'नास्तिक' ही कविता बरेच दिवस मनात ठाण मांडून होती, आणि आज अचानक अनेक दिवसांनी ....... एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा खरं तर साहित्यात भरच पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सट्ट्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची ! एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा होते निर्माण गरज कवींनी आपले काव्य पाडणे थांबवून टांकसाळीबाहेर येण्याची ! एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा शोधक नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या कविता,
काव्यरस

(ती)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता 'ती' वाचली आणि ही लगेच डोळ्यांसमोर तरळलीच! ;) ती समीप माझ्या येते, खेटुन जाते मी स्तब्ध, बावरा लगेच निसटुन जाते ती लेउन जाते 'अर्थपूर्ण' कपड्यांना जागवते हृदयी भलभलत्या स्वप्नांना ती तिच्या बॉससह गर्दित मिसळुन जाते ती ओष्ठशलाका रेखुन अलगद रेषा मस्कारा लावुन नेत्रपल्लवी भाषा ती टाटा म्हणुनी बोटे हलवुन जाते मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही ती समोर येता मुळी बोलवत नाही ती सहजच राखी हाती बांधुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना त्यांची, ती कविता, आराधना, साधना त्यांची, 'रंग्यास' विडंबन लगेच सुचवुन जाते चतुरंग
काव्यरस

पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही

लेखक चेतन यांनी शनिवार, 02/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यंकर गुर्जींचा कच्चा आणी पक्का माल वाचुन थोडासा टाइमपास करावासा वाटला पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही B) खरेच का पण आपण कंपुत सामिल झालो अजून का लेखास प्रतिसाद मिळत नाही :?
काव्यरस

व्यसन...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 31/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या ३१ डिसेंबरला गहिवरला होतास तू.... शेवटचा पेग संपवताना डोळा मारून म्हणाला होतास तू , हा पेग आता शेवटचाच बरं का...! मागच्या ३१ डिसेंबरला कुजबुजला होतास तू डोळ्यात तिच्या पाहून कानात माझ्या बोलला होतास तू , आता पुढच्या वर्षी दुसरी बरं का...! मागच्या ३१ डिसेंबरला संकल्प केला होतास तू आता मिपावर येणे बंद 'खव'त माझ्या टपकला होतास तू , दुसरं संस्थळ शोधणार बरं का...! ३१ डिसेंबर परत आलाय मधुशाला विसरलास तू वपु घेवून बसलाहेस ’ती’ ही बहुदा बदलली आहेस तू., मिपाचं व्यसन मात्र तसंच बरंका.
काव्यरस

गोरी गोरी पान (विडंबन)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 31/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: Behind every successful man there is a woman. Behind every unsuccessful man there are her parents. दुष्ट सासरा नावाचा दुष्टग्रह ज्यांच्या पत्रिकेत लग्नस्थळी ठाण मांडून बसला आहे, अशा तमाम जावयांच्या दु:खाला ही कविता नक्राश्रूपूर्ण नयनांनी समर्पित........ गोरी गोरी पान फुलासारखी छान सासर्‍या तुला एक तिरडी आण. सासर्‍याला उचलायला दारुड्यांची टोळी कशीबशी रचलेली लाकडांची मोळी मसणात बैस आता मांडुनिया ठाण सासर्‍या तुला एक तिरडी आण.. सासर्‍याच्या ताटीवर गुलाल पसरला घाई आणि गडबडीत कोळसा विसरला लायटरने पेटवू रे आता तुझा कान सासर्‍या तुला एक तिरडी आण.. सासर्‍याला जाळताना कवटी तडकली भु
काव्यरस

मिसळपाव करता करता

लेखक JAGOMOHANPYARE यांनी मंगळवार, 29/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव करता करता सांडलवंड झाली अरे पुन्हा चायनीज खाण्या बायको ही निघाली. आम्ही चार पावांचीही आस का धरावी जी मिसळ सांडे त्याची वाट का पहावी? कसा गॅस उसळकटाच्या सांडतो पखाली.. कपाटात केले कुणी बंद घुशी साती मीठतिखट सांडून झाले पहा धूळमाती उरे चायनीज, उडपी एकमेव वाली उभे स्वयंपाकघर हे झाले एक कार्यशाळा इथे फरसाण्याचा चुरा पायाने लवंडला कशी प्लेट दुर्दैवी अन घूस भाग्यशाली धुमसतात अजुनी विझल्या जिर्‍याचे धुपारे नवे खाद्य मागत उठते 'अर्धांग' हे सारे हॉटेलची बिले ही आता पहा खिसा जाळी
काव्यरस

(आवाहन) अर्थात कसं काय एडीटर बरं हाय का?

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 23/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या मिपाच्या फडात रंगलेला 'आवाहना'चा कलगीतुरा बघून आपनबी थोडी धुळवड खेळावी म्हनून मग हा तमाशाचा बार ऊडवून द्यावा म्हनतोय! प्रेरना?
काव्यरस