मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यसन...!

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मागच्या ३१ डिसेंबरला गहिवरला होतास तू.... शेवटचा पेग संपवताना डोळा मारून म्हणाला होतास तू , हा पेग आता शेवटचाच बरं का...! मागच्या ३१ डिसेंबरला कुजबुजला होतास तू डोळ्यात तिच्या पाहून कानात माझ्या बोलला होतास तू , आता पुढच्या वर्षी दुसरी बरं का...! मागच्या ३१ डिसेंबरला संकल्प केला होतास तू आता मिपावर येणे बंद 'खव'त माझ्या टपकला होतास तू , दुसरं संस्थळ शोधणार बरं का...! ३१ डिसेंबर परत आलाय मधुशाला विसरलास तू वपु घेवून बसलाहेस ’ती’ ही बहुदा बदलली आहेस तू., मिपाचं व्यसन मात्र तसंच बरंका. :-) नववर्षाच्या सर्व मिसळपावकरांना हार्दिक शुभेच्छा ! विशाल कुलकर्णी.

वाचने 1256 वाचनखूण प्रतिक्रिया 2

मदनबाण 31/12/2009 - 18:18
कोणीही काहीही करा मिपा व्यसन सुटणे शक्य नाही !!! :D (कट्टर मिपाकर) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

jaypal 31/12/2009 - 18:27
भावा १०,००० % खर आगदी मनातल बोललास. कविराज विशाल भौ "मागच्या ३१ डिसेंबरला संकल्प केला होतास तू आता मिपावर येणे बंद 'खव'त माझ्या टपकला होतास तू , दुसरं संस्थळ शोधणार बरं का...!" लै भारी मीत्रा, लै भारी. अशी किती संस्थळे आली आणि (विकली)गेली पण मिपा सम मिपाच "एकमेवाद्वितीया" *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/