मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

gazal

मेरे हर दर्द को मेहसूस किया है मैंने.. ..

Swapnaa ·
लेखनविषय:
काव्यरस
ग़ज़ल मेरे हर दर्द को मेहसूस किया है मैंने, ना पूछ कीसीको क़्या पाया हे मैंने मेरे इतनि सी हँसी को झूठा नक़ाब पहनाया हे मैंने, ना समज कहीं गवाया है मैंने मेरे चंद अश्कों का सौदा करलिया है मैंने, तन्हाई में जीना सीख लिया है मैंने मेरे टूटें भरोसें के कातिल को जाना है मैंने, उफ़ तक करना भुला दिया है मैंने मेरे हिस्सें की छाँव छोड़ दी है मैंने, धुप के थपेड़ों कों पीना शुरू किया है मैंने मेरे ख़यालों की नैया जबसे ठानी है मैंने, कलम के सहारें चलते रेहना है मैंने मेरे हौंसलें कों बुलंद किया है मैंने, गिर के भी फिर से ख़ुद को संभाला है मैंने कवी - स्वप्ना

(कद्रूंना झोडा)

ज्ञानोबाचे पैजार ·
लेखनविषय:
पेरणा कद्रू एके तुझा बाप कद्रू दुणे बहिणी दोन कद्रू त्रिक भाउ तुझा , हरामखोर चिंधी चोर कद्रू चोक वेणीत सुतळी, कद्रू पाचा अनवाणी चाल, कद्रू सक साडीवर ठिगळ, साता कद्रू हसू ओशाळ मंडई मधे फेकलेली भाजी कद्रू आठा पिशवित टाकू वडापावचा कागद सुध्दा नव्वे कद्रू रद्दीत विकू जटाळलेले केस आणि कळकटलेले कृष्णवदन अधन मधन दातांनाही कद्रू दाहे कर मंजन सर्वाना होळीच्या अगाउ शुभेच्छा! पालथागडू

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित... ·
लेखनविषय:
हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे... सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे? अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे? किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे! बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू... विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे! उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे! नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे! मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते... असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे! —सत्यजित

मांडतो आहे नव्याने...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे! सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!

भरवू नकात आता...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
भरवू नकात आता बाजार आरश्यांचा येथे कुणी न उरला खरिदार आरश्यांचा! अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!

फुंकिले मी प्राण माझे...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले! हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले! चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले? पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले! सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले! काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले! जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले! —सत्यजित

कधी मध्यम,कधी पंचम...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला! मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला! असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!

...नवल!

सत्यजित... ·
लेखनविषय:
नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल!

झाली...पहाट झाली!

सत्यजित... ·
लेखनविषय:
रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली! फांदीवरुन कानी येतात सूर काही मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली! गेला चुकून ताफा येथून राजशाही इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!

ये,बैस ना जराशी...

सत्यजित... ·
लेखनविषय:
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची दररोज येत नाही ही रात चांदण्याची! हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची! कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे कवळून जा उराशी तादात चांदण्याची! येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती घेवून रात ये तू दारात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! —सत्यजित