Skip to main content

gazal

अन् फुलांचे देह ओले पेटवावे तू!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 03/07/2017 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
बागडावे वाटले की बागडावे तू... मी फुलांना पाहिले की आठवावे तू! मी पिसे पिंजून माझी बांधले घरटे पाखरा,अलवार या घरट्यात यावे तू!

ती उत्तर मागत नाही...

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 29/06/2017 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा! मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा!
काव्यरस

घराला मनांचा उबारा करु!

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 27/06/2017 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
नको तेच ते तू दुबारा करु हवा देउनी मज निखारा करु! भिजू दे मला तू मिठीशी तुझ्या पुन्हा पावसाला इशारा करु! नको मोकळे केस झटकून तू इथे चांदण्याचा पसारा करु!

नजरोंको चुराकर वो...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 21/06/2017 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
नजरोंको चुराकर वो,इस तौर से चलते हैं कुछ हमभी मचलते हैं,कुछ वो भी मचलते हैं मुमकिन है महोब्बतभी,गर चांद वो ला दो तो ये चांदके 'टुकडे' तो,बगियामें टहलते हैं जुगनूंकी तरह यादें..हमको यूं जलाती है शम्मोंको बुझाकर हम,पुरजोर पिघलते हैं
काव्यरस

और भी आसार बाकी है

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 20/06/2017 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आखरी हथियार बाकी है (और मेरी हार बाकी है ) खत्म हो जाता नही सबकुछ और भी आसार बाकी है अब जरा इनसे निपटलूं मै मुश्किले दो चार बाकी है दुष्मनोंसे हो चुका मिलना अब तिरा दीदार बाकी है लूट भी लोगे तो क्या लोगे यह पुरा संसार बाकी है डॉ. सुनील अहिरराव (हिंदीतील पहिला प्रयत्न)
काव्यरस

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 19/06/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

ती पहा पडली गझल...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 15/05/2017 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहा पडली गझल ती,जीव गेल्यासारखी दादही यावी इथे,तर..लाच देल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा,तू नको काही लिहू... जाणिवांची जाग मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती गुलाबी पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली पान-ठेल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पाय अडखळताच मी जिंदगी जल्लोष करते,बाद केल्यासारखी! काय मी जगलो जरासा!जिंदगी वेडावली लागली मागेच माझ्या,ती झमेल्यासारखी! —सत्यजित
काव्यरस

सर एक श्रावणाची बरसून काय गेली!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 15/05/2017 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर एक श्रावणाची बरसून काय गेली गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली! आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते आई मला म्हणाली,करपून साय गेली!
काव्यरस

कसे या मनाला कसे जोजवावे?

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 12/05/2017 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
कसे या मनाला कसे जोजवावे? जरा दुःखही शांत व्हावे,निजावे! कुठे भागते आपलेही खरेतर? सुखांनी सुखांना कितीदा गुणावे! किनारा कधी सांगतो का कुणाला? किती सागराने दिले हेलकावे!
काव्यरस

जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 11/05/2017 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का? बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का? शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का? फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का? आजही तो त्या विटेवर थांबला आहे त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का? —सत्यजित
काव्यरस