अजुनी दूर किनारे
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about अजुनी दूर किनारे
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
उरलेत भाव काही
संपलेत शब्द सारे
संपला प्रवास केव्हाच
अजुनी दूर किनारे
जेथे मैफीली सुरांच्या
होत्या कधी काळी
सजली तिथे आता
जखमांची मांदीयाळी
भिजलेला श्रावणगंध
वाहती अजूनी वारे ...
संपला प्रवास केव्हाच
अजूनी दूर किनारे ...
वाटेतल्या फुलांनो
रोखा श्वास तुमचे
विपरीत अर्थ आहेत
तुमच्या स्पंदनांचे
क्षण शेवटाचा उशाशी
तरीही गंध का रे?
संपला प्रवास केव्हाच
अजूनी दूर किनारे
कवी : निशांत तेंडोलकर ..
