दारि तुझ्या बैसुनी आहे
होवुन दारिची शिळा
का तरी ना भेटला मज
तु शामसुंदर घननिळा
जातोस तु लिला कराया
गोपिकांच्या सोबती
फोडीसी हंडे दह्याचे
गोपाळ घेउन संगती
जातो कधी समजेच ना
तुज पाहाया मी थांबलो
देउनी सर्वस्व माझे
तव पायरी वरी राहीलो
नाही मी अर्जुन अथवा
नाही मीराबाई रे
अरे मी वेडा पिसा
आलो तुझीया पायी रे
आज मजला भेट थोडा
तुज पाहण्याची संधी दे
वसुनी या नयनात
मजला जन्मांतरीची शांति दे
ये त्वरेने आज आता
जीवज्योत संपत आहे
ह्या तुझ्या भक्ताकडे
बघ काळ थोडा राहीलाहे
थांबलो आहे इथे मी
पाहण्या तुझीया लीळा
दारात ये आता तरी
हे शामसुंदर घननिळा………
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1266
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह ! सुरेखच !
वाह ! सुरेखच !
छान लय असलेली कविता.
सखोल भावपूर्ण.
आवडली.
शेवटच्या कडव्यात, लीळा हा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ काय? की ल चा ळ करण्यास कवीचे स्वातंत्र्य समजावे?
स्वातंत्र्य वगैरे काही नाही
In reply to वाह ! सुरेखच ! by वेल्लाभट
स्वातंत्र्य वगैरे काही नाही हो ...... फक्त छपाई मधली चूक आहे. थांबा नीट करतो.... ;-)
छान प्रयत्न.
छान प्रयत्न.
मस्त ! :)
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield