इच्छापत्र

लेखनविषय:
लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.

अक्षय्य तृतीया

लेखनविषय:
काव्यरस
घ्या कविता.... सोनार आठवण करुन देतात, पेपरमधे पानभर जाहीराती देतात... अलीबाबाची गुहा, सापडल्यासारखे, दागिन्यांचे फोटोज । कंगन हार कर्णफूलं कंठे तोडे नाणी कलश, चळत बिस्किटोज ।। कुणालाच आठवत नाहित । घामटलेले खाणकामगार,त्यांचे कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।। भट्टीत तापून सुलाखून । कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी, घडवतोय बारीक नक्षी फूलं।। मालक गुलजार हसतोय । पेठेत अजून एक नवे, दालन उघडतांना दिसतोय ।। #कवी नेहमीचा..... हार के जितनेवाला....बाजीगर

मिराशी

लेखनविषय:
मी नाही कुणाचा बाप मी नाही कुणाचा आजा रंग बदलतो मी वारंवार कुंपणावरचा सरडा जसा मी न कुणाचे खातो, ल्यातो तो श्रीराम आम्हांला देतो लळा जिव्हाळा नाती गोती मी वेशीवर टांगून रहातो नाही कुणाची पर्वा, आशा नाही पुसले म्हणून निराशा स्वानंदाचे टाळ घेऊन हाती जगतो मी माझीच मिराशी

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं-दुसरी बाजू

लेखनविषय:
तुझ्या कप्पाळीचे बिंब भासे मध्यान्हीचा भानू लल्लाटीच्या लाटा बघुनी 'उन्हाळी', लागते गं जानू नाही गंधार कोमलं, करपले मन नुस्ताच विषाद नाच नाचता नाचता आता धपापतो ऊर जुनेरले नाते आपुले आता कुठवरं पाळू वयमान पाऊणशे अवघे, आता तरी नको छळू प्रारब्धाचा खेळं विळ्या भोपळ्याचे नाते दिनरात अशी साथ कधी सरेल जन्मठेपेचा काळं?

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं

लेखनविषय:
काव्यरस
प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात. जुनेरलं नातं... आभाळीची चंद्रकोर शोभते तुझ्या भाळी तुझ्या पैंजण नादाने आनंदाची मांदियाळी चंद्रकोरीचा गारवा सुखावतो डोळा विचार चांदण्याचा मनी घुमतो पारवा चंद्रकोर झाली बिंब उजळल्या दाही दिशा चंचल मन शिंजीर पालवल्या नव्या आशा जसे नभी सुर्य चंद्र दिनरात अशी साथ कधी तार कधी मंद्र ताल,सुरांचे आर्त साथ कधी सरू नये जुनेरल्यां नात्यावर निरोपाची वेळं कधी येवू नये जुनेरले नाते नियतीचा खेळं एक जायं दिगंताला एक फुपाट्यातं जळं

आयुष्य

लेखनविषय:
निर्णय चुकतात, चुकू द्यावे श्रेय हुकतात, हुकू द्यावे जगता जगता आयुष्याकडून जुगारातले दान घ्यावे. बंध सुटतात,सुटू द्यावे माणसं तुटतात, तुटू द्यावे जगता जगता नात्याकडून आपुलकीचे फुल घ्यावे. मार्ग चुकतात, चुकू द्यावे रस्ते सरतात, सरु द्यावे चालता चालता रस्त्याकडून सावलीचे दान घ्यावे. प्रश्न पडतात, पडू द्यावे उत्तरं चुकतात,चुकू द्यावे सोडवता सोडवता उत्तराकडून ज्ञानाचे कण घ्यावे. ध्येय हुकतात, हुकू द्यावे अनुभव मुकतात, मुकू द्यावे जगता जगता अनुभवाकडून स्वत्वाचे भान घ्यावे. ------ अभय बापट ०५/०८/२०२३

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....

शहाळे...

लेखनविषय:
इथे शहाळे म्हणजे संसार आशी कल्पना केलीयं. वरवर कठीण पण आतमधे मधुर गोड पाणी आणी मलाईदार साय पण त्या आगोदर नियतीच्या कोयत्याचे घाव सहन करावे लागतात. माहीत नाही जमलीय का नाही&#128528 वाटले असावे कुणी जवळचे वेचण्या कवडसे उन्हाचे भेटावे कुणीतरी असे.... ऐकण्या हितगुज मनाचे स्वप्न चांदण्या रात्रीतले कधी न मी पाहीले भेटावा चंद्र कोजागिरीचा....

कण अमृताचे......

लेखनविषय:
आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही अमृत कणांचे आता, विष मी बनवत नाही
Subscribe to आयुष्य