मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कण अमृताचे......

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही अमृत कणांचे आता, विष मी बनवत नाही

वाचने 5620 वाचनखूण प्रतिक्रिया 16

कर्नलतपस्वी Fri, 09/23/2022 - 13:57
अमृत द्रव पदार्थ पण जेव्हा हाच शब्द म्हणून दुसर्‍या शब्दात बरोबर येतो त्या अनुषंगानेच त्याचा अर्थ घेतला जातो. जसे क्षण अमृताचा तसाच वापरला आहे. अर्थात हे स्पष्टीकरण माझे ,कुठलाच आधार नाही. तशीही माझी भाषासमृद्धी गरिबीच्या रेषेखालील. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

In reply to by प्राची अश्विनी

कर्नलतपस्वी Fri, 09/23/2022 - 16:08
@प्राची अश्विनी, गलेमा मधे शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमीत्त लिहीलेला लेख जरूर वाचा,कदाचित आवडेल व मला नवीन माहीती कळेल . https://misalpav.com/node/50662/backlinks 😀 *** 🙏