✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Fri, 08/01/2025 - 10:01  ·  लेख
लेख
हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/sachin-pilgaonkar-share-post-on-guru-dutt-memory-his-last-wish/articleshow/123022146.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines वर.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23846 वाचन

💬 प्रतिसाद (181)

प्रतिक्रिया

अमेरिकेचे संजय राऊत

चंद्रसूर्यकुमार
Tue, 08/05/2025 - 21:38 नवीन
Backdoor ला चर्चा नक्कीच चालू असणार.
त्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात २५ तारखेला येणार आहे ना? आपले शिष्टमंडळ तिथे जाणार नाही तर त्यांचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे- हा फरक मोठा आहे.
भारत नमत घेण्याचं कारण म्हणजे अमेरिकेला आपली जेव्हढी गरज आहे त्यापेक्षा आपल्याला त्यांची जास्त गरज आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे अमेरिकेची अडवणूक करायला काहीच नाही.
असे काही नाही. सगळ्या देशांना एकमेकांची गरज आहे आणि ते समजत नाही ते नेते मूर्ख आहेत.बाकी अडवणूक करायचेच म्हटले तर आपल्याकडेही बरेच काही आहे. एक तर सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की विविध जागतिक संघटना एकमेकांवर वचक ठेवायला वापरल्या जात आहेत. उदाहरणार्थ क्वाड ही संघटना चीनवर वचक ठेवायला तर ब्रिक्स ही संघटना अमेरिकेवर वचक ठेवायला. चीन आधीच खूप मोठा झाला आहे तो अमेरिकेला आणखी मोठा व्हायला नको असेल तर त्या खेळात अमेरिकेला आपली मदत लागेलच. आणि त्या प्रकारात भारतही मोठा व्हायला नको म्हणून अमेरिका पाकिस्तान, बांगलादेश या आपल्या शेजारी प्रदेशांमध्ये काड्या घालून आपल्याला त्रास देत आहे. अर्थात हे सगळे तर्क त्यामुळे याविषयी एकाला एक वाटेल तर दुसर्‍याला दुसरे. पण एकदम बिनतोड मुद्दा म्हणजे भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे. १३-१४ मे २०२५ रोजी म्हणजे ऑपरेशन सिंदूर तात्पुरते थांबून ३-४ दिवस झाले असताना गुरगावमध्ये ट्रम्प टॉवरमधील जवळपास ३०० फ्लॅट्स एकाच दिवसात बुक झाले होते. त्या सगळ्यांची मिळून किंमत होती ३००० कोटी+. भारतात जीवनमान उंचावत असल्याने प्रत्येक उत्पन्नाच्या ब्रॅकेटमध्ये कोट्यावधी लोक मिळतील. नुसते विद्यार्थीच म्हटले तर २०-२५ कोटी विद्यार्थी नक्कीच असतील. यापुढील काळात ऑनलाईन शि़क्षण वाढत जाणार आहे त्यामुळे ती खूप मोठी बाजारपेठ आहे. हेच इतर अनेक गोष्टींविषयी. त्यामुळे भारताला दूर लोटणे अमेरिकेलाच परवडणार नाही. तसेच भारतातून मोठ्या प्रमाणावर जेनेरीक औषधे अमेरिकेत निर्यात होतात. चॅटजीपीटी तो आकडा अमेरिकेतील एकूण जेनेरीक औषधांच्या ४०% म्हणत आहे. मग अमेरिकेची अडवणूक करण्यासारखे आपल्याकडे काहीच कसे नाही? मागे ट्रम्पतात्यांनीच मोदींना 'टफ नेगोशिएटर' म्हटले होते. आणि स्वतः तात्या मोठे बिझनेसमन असल्याने वेगवेगळी शेकडो-हजारो डील त्यांनी आतापर्यंत केली असतील हे नक्की. अशावेळेस थोडे गीव्ह अ‍ॅन्ड टेक होते हे तात्यांना कळत असूनही कळत नसल्यासारखे ते करत आहेत की काय समजत नाही. एक तर एकच नाही तर अनेक वेगवेगळी जाहीर वक्तव्ये देऊन तात्यांनी समजा मोदींना तडजोड करायची इच्छा असेल तरी तो मार्ग कठीण करून ठेवला आहे. त्याचे कारण आता मोदी तडजोड करायचे म्हणाले तरी मग मोदींनी मान तुकवली वगैरे गोष्टी बोलल्या जातील आणि राजकीय दृष्ट्या त्यांना ते परवडणार नाही. मी अमेरिकेतील वॉलमार्ट शेवटचे बघितले होते डिसेंबर २००७ मध्ये. तेव्हा अर्ध्याहून जास्त गोष्टी मेड इन चायना असायच्या. मेड इन अमेरिका गोष्टी शोधाव्या लागायच्या. आताची परिस्थिती काय हे माहित नाही पण त्या परिस्थितीत अमेरिकेच्या दृष्टीने काही सुधार झाला आहे असे वाटायला काही आधार आहे असे वाटत नाही. खुळ्यासारखे सगळ्या आयातींवर टॅरीफ लावून त्या गोष्टी आपल्याच नागरीकांसाठी तात्या महाग करत आहेत हे त्यांना समजत नाहीये का?गेल्या ४० वर्षात अमेरिकेतील मॅन्युफॅक्चरींग खूपच कमी झाले आहे. समजा मेक अमेरिका ग्रेट अगेन असे म्हणत टॅरीफ लावत सुटले आणि महाग झालेल्या मेड इन चायना आणि इतर वस्तूंना सब्स्टिट्यूट म्हणून मेड इन अमेरिका वस्तूच नसतील तर अमेरिकन लोकांनाच झक मारत त्याच आयात केलेल्या वस्तू महाग दराने खरेदी कराव्या लागणार आहेत. समजा अमेरिकेशी ट्रेड डील झाले तरी शेतीसंबंधीत (जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि दूधाचे पदार्थ) भारतात येऊ देणार नाही हे आपले धोरण झाले. तसेच तात्यांच्या सांगण्यावरून आपण रशियाकडून तेल घेणे बंद करणार नाही हे पण महत्वाचे धोरण आहे. हे तीन मुद्दे सोडले तर मग कोणत्या वस्तूवर किती टक्के टॅरीफ लावावा वगैरे मुद्द्यांवर चर्चा करायला काहीच हरकत नाही. तसेही टॅरीफ लावून आपल्याच लोकांसाठी आपण वस्तू महाग करत असतो. तसे व्हायला नको. त्यामुळे भारताने टॅरीफ कमी करावा अशी अमेरिकेची अपेक्षा असल्यास त्यात आपल्या दृष्टीनेही फार काही गैर आहे असे वाटत नाही. पण त्या बरोबरच रशियन तेलाचा वेगळाच मुद्दा जोडून आणि त्या मुद्दावर चारचार वेळा भर देऊन तात्यांनी ट्रेड डीलमध्ये प्रगती व्हायची शक्यता खूपच कमी केली आहे. मोदी स्वतःची प्रतिमा एक कणखर नेता म्हणून लोकांपुढे यावी यासाठी प्रयत्न करत असतील तर (ते खरोखरच कणखर नेता आहेत की नाही हा या चर्चेत बाह्य मुद्दा झाला) आता ट्रेड डीलच्या बदल्यात रशियन तेल घेणे बंद करणे मोदींना कसे काय परवडणार आहे? एकूणच अती बडबड करून आपल्यालाच हवे ते व्हायच्या मार्गात तात्यांनी अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. एका अर्थी तात्या हे अमेरिकेचे संजय राऊत आहेत असे बर्‍याच जणांनी सोशल मिडियावर म्हटलेले बघितले ती उपमा अगदी योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

ट्रम्पतात्या

चंद्रसूर्यकुमार
Wed, 08/06/2025 - 10:10 नवीन
ट्रम्पतात्या भारताकडून रशियन तेलाच्या खरेदीवर फुत्कार सोडत आहेत तर मग आपण (म्हणजे अमेरिका) रशियाकडून रसायने आणि खते आयात करतो त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे असा प्रश्न ए.एन.आय च्या एका पत्रकाराने त्यांना विचारल्यावर त्यांचे उत्तर होते- "याविषयी मला काहीही माहित नाही. मला तपासून बघावे लागेल". https://x.com/undefined/status/1952877566047449426?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1952877566047449426%7Ctwgr%5Eaa4635fc4a844a4f6c922e2cca0e8a65b53f7882%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftimesofindia.indiatimes.com%2Fbusiness%2Finternational-business%2Ftrade-war-trump-was-asked-about-indias-claim-on-us-importing-russian-uranium-fertilisers-heres-his-response%2Farticleshow%2F123131430.cms हा माणूस दिवसेंदिवस अधिकाधिक हास्यास्पद आणि तितकाच धोकादायकही होत चालला आहे. इतके दिवस तात्यांचा वेडाचार अमेरिकेपुरता मर्यादित होता त्यामुळे माझ्यासारख्यांचे फारसे बिघडत नव्हते. पहिल्या टर्ममध्ये तात्या आपल्यासाठी बर्‍यापैकी चांगले अध्यक्ष होते. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत डोकलाम आणि गलवान हे दोन मोठे संघर्ष चीनविरोधात झाले तरी त्यावेळी तात्यांनी एक चकार शब्द आपल्याविरोधात उच्चारला नव्हता. तसेच पहिल्या टर्ममध्ये अमेरिकेबाहेर फारसे नाक त्यांनी खुपसलेही नव्हते. त्यामुळे त्यांची दुसरी टर्मही आपल्याला अनुकूल असेल असे वाटून अमेरिकेत खुळाचार चालू असला तरी आपल्याला अनुकूल असतील तर मग आपले काय बिघडते असे म्हणत त्यांचे समर्थनही करत होतो. पण आता हा माणूस आपल्या देशालाच नाही तर पूर्ण जगाला त्रासदायक ठरायला लागला आहे. मध्यंतरी रशियाविरूध्द अणुयुध्दाविषयी पण अचाट वक्तव्य त्यांनी केले होते. अणुरेणूंमध्ये प्रचंड इगो भरलेल्या या इसमाला अमेरिकेचे अध्यक्ष या जगासाठी सगळ्यात महत्वाच्या पदावर ठेवणे धोकादायक ठरेल. हा मनुष्य लवकरात लवकर इम्पिच व्हावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

आपले परराष्ट्र धोरण माती खाते

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 11:27 नवीन
आपले परराष्ट्र धोरण माती खाते आहे, तात्याला दोष कशाला द्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आपले परराष्ट्र धोरण माती खाते

सुबोध खरे
Wed, 08/06/2025 - 12:02 नवीन
आपले परराष्ट्र धोरण माती खाते आहे, तात्याला दोष कशाला द्या? भुजबल बुवा परराष्ट्र धोरण काय आणि कसे हवे ते जरा स्पष्टपणे सांगता काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जरा आदर्श घ्या काँग्रेसच्या

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 15:08 नवीन
जरा आदर्श घ्या काँग्रेसच्या सरकारचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परराष्ट्र धोरण काय आणि कसे

सुबोध खरे
Wed, 08/06/2025 - 18:45 नवीन
परराष्ट्र धोरण काय आणि कसे हवे ते जरा स्पष्टपणे सांगता काय? काँग्रेस चा आदर्श म्हणजे नक्की काय ते सांगा कि रेनकोट घालून अंघोळ कशी करायची कि संसदेवर हल्ला झाला तेंव्हा अतिकडक महाभयंकर आणि महाकड्क अतिभयंकर खलिते पाठवायचे आणि अमेरिकेकडे रडत रडत जायचं? एकंदर राहुल गांधींचा आदर्श घ्यायचा तर मग दर निवडणुकीनंतर बँकॉक किंवा इटलीला जायचं आणि भारतावर हल्ला झाला कि चीन बरोबर गुप्त समझोता करायचा? नक्की कसं ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

संसदेवर हल्ला झाला तेंव्हा

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 18:50 नवीन
संसदेवर हल्ला झाला तेंव्हा अतिकडक महाभयंकर आणि महाकड्क अतिभयंकर खलिते पाठवायचे गुडघे टेकून अतिरेकी सोडू नये किंवा गुजरातवर ड्रोनहल्ले झाले म्हणून गांगरून जाऊन सिझफायर करू नये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गुजरातवर ड्रोनहल्ले झाले

सुबोध खरे
Wed, 08/06/2025 - 18:58 नवीन
गुजरातवर ड्रोनहल्ले झाले म्हणून गांगरून जाऊन सिझफायर करू नये भुजबळ बुवा याला काही पुरावा? कि आपला नेहमी सारखं च फुक्या मारणं आणि विचार न करता कळफलक बडवणं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गुजरातवर ड्रोन हल्ले झाले

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 19:03 नवीन
गुजरातवर ड्रोन हल्ले झाले ह्याचाही पुरावा मीच आणून द्यायचा व्हय? मग तुमच्या हातातल्या लाखाच्या आयफोनचा काय उपयोग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गुजरातवर ड्रोन हल्ले झाले,

सुबोध खरे
Wed, 08/06/2025 - 19:16 नवीन
गुजरातवर ड्रोन हल्ले झाले, ड्रोन हल्ले सीमेवरच्या सर्वच राज्यात झाले पण त्यामुळे सीझ फायर झालं ह्याचा काही पुरावा आहे ? कि असं च आपलं (नेहमीसारखं विचार न करता) कळफलक बडवणं? बाकी आकाश क्षेपणास्त्रे, आकाशतीर प्रणाली, बोफोर्स एल ७० तोफा, तंगूश्का आणि त्याचा वापर याबद्दल एकदा कळफलक बडवून गुगलून पहा. (S ४०० चा ड्रोन साठी वापर झालेला नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ड्रोन हल्ले सीमेवरच्या सर्वच

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 19:53 नवीन
ड्रोन हल्ले सीमेवरच्या सर्वच राज्यात झाले पण त्यामुळे सीझ फायर झालं ह्याचा काही पुरावा आहे ? जे लोक विमान पाडले गेले हे लपवून ठेवतात, अतिरेक्यांचे खोटे फोटो दाखवतात, अतिरेकी कुठून आले कुठे गेले हे देशापासून लपवून ठेवतात. पुलवामावेळी rdx कुठून आले ते लपवून ठेवतात, सत्यपाल मलिक त्यावर काही बोलू लागले तर इडी सोडून त्याना त्रास देतात ते लोक सिझफायरचे कारण देशाला सांगतील असे तुम्हाला वाटते? इतके भोळे तुम्ही कधीपासून झालात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नाही नाही .. असे काही झालेच

सुक्या
Wed, 08/06/2025 - 20:46 नवीन
नाही नाही .. असे काही झालेच नाही. सगळे खोटे बोलत आहेत. सगळे पुरावे खोटे आहेत. आमचे राहुल म्हणाले ना .. सगले खोटे आहे .. मग सगळे सगळे खोटे आहे. बाकी मोदी फट्टूस आहेत. पाकीस्तान ने ड्रोन पाठवले तेव्हा सगळे भयभीत झाले. बंकरात लपुन बसले. म्हणुन सिझ्फायर झाले. बाकी आकाश, आकाशतीर, बोफोर्स, तंगूश्का हे सब झुट है. (कशाला त्यांच्या नादी लागता. "व्हिलेज ईडीयट" काय असते ते माहीत आहे तुम्हाला. उगा आपले श्रम वाया घालवु नका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मला वाटलं भुजबळ नव्या अवतारात

सुबोध खरे
गुरुवार, 08/07/2025 - 10:14 नवीन
मला वाटलं भुजबळ नव्या अवतारात सुधारले असतील पण कसलं काय? जुनी दारू नव्या वेष्टणासहितच आहे. खांद्याच्या वरच्या अवयवांचा वापरच करायचा नाही असं ठरवलंच असेल तर कोण काय करू शकतं? सोडूनच द्यायचं आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

तुमच्या दृष्टीने सुधारणेचा

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/07/2025 - 11:01 नवीन
तुमच्या दृष्टीने सुधारणेचा अर्थ काय? अंधभक्ती करणे म्हणजे सुधारणा? आणी वस्तुस्थिती दाखवून सरकारवर टीका करणे म्हणजे असुधारणा? खांद्याच्या वरच्या अवयवांचा वापरच करायचा नाही असं ठरवलंच असेल तर कोण काय करू शकतं? मिपावरील महान डॉक्टर हत्ती धाग्यावर काय म्हणतात पहा. सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं. :- :- डॉक्टर सुबोध खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एवढा पैसा असून जे लोक

सुबोध खरे
गुरुवार, 08/07/2025 - 11:43 नवीन
एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत हा आपला प्रतिसाद कुणाबद्दल आहे आणि त्याचा अर्थ काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ट्रंम्पचं करावं काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/06/2025 - 10:54 नवीन
ट्रम्प तात्याला आपण ज्या पद्धतीने पायघड्या घालत होतो ते आता तरी कपाळावर हात मारुन घेणेच होते. अर्थात सध्याच्या सरकारला तसे परराष्ट्रीय धोरण नावाची काही व्यवस्थाच उरली नाही असे वाटायला लागले आहे. जगातला आता एखादा तरी देश उरला असेल की नाही जिथे आपण गेलो नाही. पण एकही देश वेळ पडते तेव्हा मदतीला आला नाही, हेही आपण पाहिलं. ट्र्म्प माय फ्रांड ने पुन्हा काल चोवीस तासात भारतावरील आयात शुल्कात वाढविण्याची धमकी दिली. आपण नेहमीप्रमाणे गुळमीळीत उत्तर दिलं. अमेरिकेची आयातशुल्कवाढ ही अन्यायकारक असून अमेरिका आणि युरोपीय महासंघ रशियाशी व्यापार करीत असल्याकडे आपण निर्देश केले. याला म्हणतात मुहतोड जवाब ( अहाहा, वावा, क्या बात है ) रशियाने मात्र, सार्वभौम देशांना त्यांच्या हितानुसार कोणासोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्य करायचे याची निवड करण्याचा अधिकार आहे अशा शब्दात रशियाने समर्थन केले. माय फ्रांड डोलांडच्या नादात आपण रशियाशी दूर दूर आणि अधिक दूर जात होतो. अर्थात धोरण परराष्ट्रीय धोरणाची वाताहत होते असे वाटत असतांना त्यात अनपेक्षित तसे काही वाटत नाही. जम्मु-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं काल निधन झालं. निष्ठावान राजकारणी ते सत्ताधा-यांवरच टीकाकार अशी त्यांची भूमिका राहिली. पुलवामा हल्ला सरकारी उदासीनतेचा परिणाम होता अशी टीका त्यांनी केली होती. शेतकरी आंदोलनास उघड पाठींबा दिला आणि सद्य सरकारवर टीका केली. गोव्यातील राज्यसरकारवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. समाजवादी विचारसरणीचे विद्यार्थी, पण पुढे भारतीय क्रांती दल, कॉंग्रेस, जनता दल, भाजप असा त्यांचा प्रवास राहिला. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचही काल निधन झालं. तीन वेळा मुख्यमंत्री आठवेळा खासदार राहिले. आदिवासींच्या हक्कासाठी लढ्णारा नेता ही त्यांची ओळख होती. सत्यपाल मलिक आणि शिबू सोरेने यांना समस्त मिपाकरांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ह्या आधीच्या सरकारांनी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 11:29 नवीन
ह्या आधीच्या सरकारांनी रशियाशी मैत्री ठेऊनही अमेरिकेला सांभाळले होते, आता मुळात सरकारच अश्या लोकांच्या हातात गेले आहे की ज्यांना लोकशाही, परराष्ट्र धोरण अंधश्रद्धा वाटतात. उगाच नाही “गोबरयुग” ह्या शब्दाचा उदय झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रशियाने मात्र, सार्वभौम

आग्या१९९०
Wed, 08/06/2025 - 11:35 नवीन
रशियाने मात्र, सार्वभौम देशांना त्यांच्या हितानुसार कोणासोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्य करायचे याची निवड करण्याचा अधिकार आहे अशा शब्दात रशियाने समर्थन केले. एक्झॅक्टली हे आपल्या सरकारने अमेरिकेला सांगायला हवे होते. अमेरिकेने रशियाकडून काहीही आयात करो वा न करो, आमच्यात लुडबुड करू नका असे ठणकावून सांगायला हवे होते. अमेरिका मोठ्या प्रमाणात व्यापार तूट असल्याचा कांगावा करत आहे त्याला भारत प्रत्युत्तर का देत नाही हेच समजत नाही. आपला देश इतका घाबरट कधीच नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला देश इतका घाबरट कधीच

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 11:38 नवीन
आपला देश इतका घाबरट कधीच नव्हता. +१ कारण तेव्हा देशप्रेमी लोक सत्तेत होते अदानीप्रेमी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/06/2025 - 12:01 नवीन
आपला देश इतका घाबरट कधीच नव्हता. +१ सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

माय फ्रांड डोलांडच्या नादात

सुबोध खरे
Wed, 08/06/2025 - 12:14 नवीन
माय फ्रांड डोलांडच्या नादात आपण रशियाशी दूर दूर आणि अधिक दूर जात होतो बिरुटे मास्तर भारताने रशिया कडून S ४०० घेतले आहेत ते पण अमेरिकेच्या CAATSA ला (Countering America's Adversaries Through Sanctions Act (CAATSA) फाट्यावर मारून. हे आपण वाचले नाही का? याच S ४०० ने पाकिस्तानचे एक awacs पाडले तेसुद्धा पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर ३५० किमी वर The AK-203 is the new assault rifle being inducted into the Indian Army, replacing the older INSAS rifles. Manufactured in India under a joint venture with Russia, it's a modernized version of the Kalashnikov AK-series, known as "Sher" in India याबद्दल आपण वाचलेले दिसत नाही भारताने आपल्या तेल खरेदी पैकी ४० % पर्यंत तेल रशिया कडून घेतले हेही आपण वाचलेले दिसत नाही आजमितीला आपले ३५ % तेल रशियाकडूनच येते आहे आणि ते सुद्धा अमेरिकेला नाराज करूनच तात्यांच्या नादाला लागून गेल्या दहा वर्षात एक तरी मोठा खरेदी करार भारताने केल्याचे आपण वाचले आहे का? तात्यानी आपल्याला त्यांचे F ३५ विकायचा आटोकाट प्रयत्न करून सुद्धा भारताने त्यांना कात्रजचा घाट दाखवला आहे. श्री अजित डोवाल आज ०६ ऑगस्ट रोजी रशिया ला गेले आहेत.हे वाचलेले दिसत नाही (कदाचित रशियन व्होडका प्यायला गेले असतील आपल्या मते) केवळ द्वेष करायचा म्हणून केला तर असं होतंय पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोथरुडमधील मुलींना मारहाण

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 11:35 नवीन
कोथरुडमधील मुलींना मारहाण प्रकरण तापलं, https://marathi.abplive.com/news/pune/pune-news-kothrud-police-use-alleged-derogatory-and-abusive-language-to-girls-stop-more-than-12-hours-pune-police-cp-office-marathi-news-1374645/amp महाराष्ट्राची शेणपट्टा होण्याकडे वाटचाल जोरात सुरू आहे असे वाटतेय.
  • Log in or register to post comments

गंभीर प्रकरण

स्वधर्म
Wed, 08/06/2025 - 20:56 नवीन
पोलिसांची बाजू कितीही समजून घ्यायची म्हटली तरी एकूण प्रकार पाहता पोलीसांचे काम शेणपट्टयातील पोलिसांसारखे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माय फ्रेंड डोलांड

कपिलमुनी
Wed, 08/06/2025 - 20:46 नवीन
50 % टेरिफ भारतासाठी लावला आहे. घ्या अजून अब की बार ट्रम्प सरकार..
  • Log in or register to post comments

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/06/2025 - 22:00 नवीन
च्यायला ‘मास्टर स्ट्रोक’ लैच महागात पडलाय. गोबरयुगाची फळं तर भोगावीच लागतील. माय फ्रांड डोलांड हे काही बरोबर नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

गोबरयुगाची फळं तर भोगावीच

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 23:22 नवीन
गोबरयुगाची फळं तर भोगावीच लागतील. खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माय फ्रांड डोलांड

सुबोध खरे
गुरुवार, 08/07/2025 - 10:16 नवीन
माय फ्रांड डोलांड पवार साहेब आमचे गुरु असंही ते म्हणाले होते त्याबद्दल काय म्हणणं आहे बिरुटे मास्तर? नाही म्हणजे एकच म्हणणं धरून ठेवायचं असेल तर कसं करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Trump अजून साडेचार वर्षे आहे.

कंजूस
गुरुवार, 08/07/2025 - 02:10 नवीन
Trump अजून साडेचार वर्षे आहे.
  • Log in or register to post comments

साडेतीन वर्षं

सुबोध खरे
गुरुवार, 08/07/2025 - 10:17 नवीन
साडेतीन वर्षं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आपण BRICKS देशांच्या गटात

कंजूस
गुरुवार, 08/07/2025 - 02:16 नवीन
आपण BRICKS देशांच्या गटात आहोत आणि ट्रंपला यांच्यावर फार खुन्नस आहे.
  • Log in or register to post comments

सफर

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 08/07/2025 - 08:33 नवीन
वॉशिंगटन सफरचंदे झाली, हार्ले डेव्हिडसन बाईक झाल्या,महाग इंधनही आयात करुन झाले, आणखी काय पाहिजे आहे ट्रम्पास? सध्या जो काही कर लावणार आहे त्याचा फटका आय.टी. कंपन्यांनाही बसणार आहे. टेक-महिन्द्र ,विप्रो,टाटा एलेक्सी ह्यांचे बर्यापैकी उत्पन्न अमेरिकेवर अवलंबून आहे असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

तात्याला दोष देऊन काय फायदा

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/07/2025 - 08:46 नवीन
तात्याला दोष देऊन काय फायदा माई? आपले लोक ठिकाण्यावर नाहीत. नाचता येईना अंगण वाकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अमेरिकेचं भलं करेन सांगून

कंजूस
गुरुवार, 08/07/2025 - 09:03 नवीन
अमेरिकेचं भलं करेन सांगून निवडून आला आहे ट्रंप तेव्हा काही ढिशुव ढिशुव करणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अमेरिकेचा शत्रू बनणे धोकादायक

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/07/2025 - 10:09 नवीन
अमेरिकेचा शत्रू बनणे धोकादायक आहे पण मित्र बनणे जास्त घातक आहे असे आताच कुठेतरी वाचले, उगाच नाही नेहरूनी अलिप्ततावाद स्वीकारला होता, नेहरूंच्या नावाने संसदेत छाती पिटणाऱ्याना एवढी अक्कल असेल असे वाटत नाही. उगाच नाहाई डॉक. बिरुटेसर आजच्या काळाला “गोबरयुग” म्हणतात.
  • Log in or register to post comments

टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान

आग्या१९९०
गुरुवार, 08/07/2025 - 10:35 नवीन
टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान मेंदूच्या विगुकडून फार मोठ्या अपेक्षा करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान

सुबोध खरे
गुरुवार, 08/07/2025 - 10:40 नवीन
टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान मेंदूच्या विगुकडून फार मोठ्या अपेक्षा करू नये. तुम्ही तर करूच नका. नाहीतरी तुम्हाला एवढी जळजळ आहे कि प्रत्येक धाग्यावर प्रतिसादावर ती उफाळून येते तर अपेक्षा करताच कशाला? ज्यांनी त्यांना भरघोस मते देऊन निवडून आणलाय ते आनंदात आहेत. तुम्ही नका काळजी करू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

जळजळ नाही हो! वस्तुस्थिती

आग्या१९९०
गुरुवार, 08/07/2025 - 10:54 नवीन
जळजळ नाही हो! वस्तुस्थिती सांगतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/07/2025 - 11:05 नवीन
टाचणीच्या माथ्यापेक्षा लहान मेंदूच्या विगुकडून फार मोठ्या अपेक्षा करू नये. टाचणीचा माथा? त्या माथ्यावर जे करोडो बॅक्टरिया मावतील त्याच्यातील एका बॅक्टेरियाच्या माथ्यात जेवढी अक्कल असेल त्याचा १ पट अक्कलही विगुला असेल का सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अच्छा! आकारमान मोजण्याचे नॅनो

आग्या१९९०
गुरुवार, 08/07/2025 - 11:09 नवीन
अच्छा! आकारमान मोजण्याचे नॅनो पेक्षा लहान नमो युनिट असते हे आज माहित झाले. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खिक्क! नमो युनिट.

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/07/2025 - 11:12 नवीन
खिक्क! नमो युनिट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

किती ती जळजळ?

सुबोध खरे
गुरुवार, 08/07/2025 - 11:44 नवीन
किती ती जळजळ? इनो घ्या आणि बरे व्हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आम्ही निवडून दिले नाही म्हणून

आग्या१९९०
गुरुवार, 08/07/2025 - 12:06 नवीन
आम्ही निवडून दिले नाही म्हणून जळजळ नाही, त्यामुळे अनुदानित व्हॉट्सॲप विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेला नमो योजनेचा Eno घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चला सरकार अमेरिकेच्या दबावाला

आग्या१९९०
गुरुवार, 08/07/2025 - 12:30 नवीन
चला सरकार अमेरिकेच्या दबावाला झिडकारून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार हे एकदाचे मुखातून आले. मोगॅन्बो खुश हुवा.
  • Log in or register to post comments

मोगॅम्बो

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 08/07/2025 - 13:42 नवीन
मोगॅन्बो खुश हुवा.
वाटत नाही. मोदी (अनेकांच्या भाषेत शेटजी) कसे शेतकरीविरोधी आहेत हा अपप्रचार करायची संधी गेली म्हणून मोगॅम्बो नाराज झालेला आहे ही शक्यता जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

असा अपप्रचार मी कधी केल्याचे

आग्या१९९०
गुरुवार, 08/07/2025 - 14:41 नवीन
असा अपप्रचार मी कधी केल्याचे आठवत नाही, जे काही केले असेल ते सत्यकथनच केले आहे. चांगल्याला चांगले म्हणणेही कठीण झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

उत्तराखंडांत खूप पाऊस, दरडी

कंजूस
गुरुवार, 08/07/2025 - 21:03 नवीन
उत्तराखंडांत खूप पाऊस, दरडी कोसळणे, रस्ते नाहीसे होणे; इमारती माणसे,प्राणी वाहून जाणे हे आता काही वर्षे कायमची घटना झाली आहे.
  • Log in or register to post comments

पण म्हणून त्यावर तज्ज्ञ जे

रामचंद्र
गुरुवार, 08/07/2025 - 22:43 नवीन
पण म्हणून त्यावर तज्ज्ञ जे उपाय सुचवतात, ते करायची कुठल्याच सरकारची तयारी नाही. जसं माधव गाडगीळ समितीचा अहवालावर इतक्या दुर्घटना होऊनही तिथल्याच लोकांना पर्यायाने सरकारला कृती करण्याची इच्छा नाही. किमान सायलेंट व्हॅली प्रकल्प इ. बाबतीत इंदिरा गांधींनी प्रकल्प जाहीर झाल्यानंतरही तज्ज्ञांचा सल्ला मानला तरी होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

निवडणुक

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 08/07/2025 - 23:52 नवीन
राहुल गांधीनी पुराव्यासकट निवड्णुक आयोगाच्या चोरगिरीला अक्षरशः उघडे पाडले आहे. “They were stolen in five different ways: duplicate voters, fake and invalid addresses, bulk voters in a single address, invalid photos, and misuse of Form 6, which is given to first-time voters for enrolment,” Gandhi said. https://indianexpress.com/article/india/rahul-gandhi-voter-fraud-lok-sabha-election-eci-bjp-modi-10175457/ https://www.youtube.com/watch?v=TVEiACVifX4
  • Log in or register to post comments

+1

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/08/2025 - 10:20 नवीन
+1 निवडणूक आयोग सरळ सरळ भाजपला जिंकवण्यासाठी मदत करतो असे दिसते. २०२४ चे महाराष्ट्रात झालेले इलेक्शन पूर्णत फ्रॉड होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपचे नेते जेव्हा निवडणूक

आग्या१९९०
Fri, 08/08/2025 - 10:54 नवीन
भाजपचे नेते जेव्हा निवडणूक आयोगाची बाजू घेऊन बोलू लागतात तेव्हा समजायचे निवडणूक आयोग चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा