Skip to main content

ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 01/08/2025 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywo… वर.

वाचने 25892
प्रतिक्रिया 181

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कोणा टीव्हीवाल्याने त्या आदित्य श्रीवास्तवलाच गाठले.
आणि तीन महिने झाले तरी कोणीही टिव्हीवाला ऑपरेशन सिंदूरमधील त्या तथाकथित पडलेल्या विमानांमधील वैमानिकांच्या घरी जाऊ शकलेला नाही इतकेच काय तर 'हो मी विमान पडताना बघितले' असे म्हणणार्‍या एकाही माणसापर्यंत जाऊ शकलेला नाही :)

कोणा टीव्हीवाल्याने त्या आदित्य श्रीवास्तवलाच गाठले. तर त्याने सांगितले की २०१६ मध्ये तो लखनौत होता, नोकरीच्या निमित्ताने २०१८ मध्ये मुंबईत आणि २०२१ मध्ये बंगलोरला गेला अडवणूक आयोगाच्या बचावासाठी अभ्यासू लोक येणार हे मी वर म्हटलेच होते. परंतु ते अडवणूक आयोगाला अडचणीत आणत आहेत. एक प्रकारे अडवणूक आयोगाची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आणण्याचे काम करत आहेत. वर उल्लेख केलेल्या व्यक्तीचे एकाच मतदारसंघातील दोन वेगवेगळ्या बुथवर नाव दिसत आहे. पत्ताही सारखाच आहे. ह्याला जबाबदार कोण? भारतात पहिले वोटर आयडी कार्ड ३२ वर्षापूर्वी दिले गेले. आज दिसणाऱ्या मतदार यादीतील चुका होऊ नये म्हणून एपिक नंबर दिला गेला होता. इतक्या वर्षात डिजिटल क्रांती होऊनही सदोष मतदार याद्या होऊच कशा शकतात?

In reply to by आग्या१९९०

मतदारयाद्या पूर्ण निर्दोष आहेत असा दावा कोणी केल्याचे ऐकिवात नाही, निदान मी तरी नाही. कसा करणार? मिपावरीलच एक सन्माननीय सदस्य पब्लिक फोरमवर त्यांचे नाव दोन ठिकाणी आहे असे अभिमानाने सांगत असतील तर असा दावा करणार्‍याला तोंडावर पाडायला ते एक उदाहरण निदान मिपावर तरी पुरेसे आहे. अनेक ठिकाणी लोक स्थलांतरीत झाले तरी नावे जुन्या ठिकाणीच राहतात किंवा दोन्ही ठिकाणी असतात, मृत व्यक्तींची नावे मतदारयाद्यांमधून काढली जात नाहीत, मुळात भारताचे नागरीकच नाहीत त्यांची नावेही मतदारयाद्यांमध्ये असतात हे जगजाहीर आहे. म्हणूनच जर रागा सदोष मतदारयाद्यांचा प्रश्न पुढे आणत असतील तर त्याला विरोध करायचे कारणच नाही. मात्र त्यांनी आताच हा प्रश्न उपस्थित करणे आणि बिहारमधील एस.आय.आर यांच्यात काहीतरी कार्यकारणभाव आहे असे मला वाटते. जर का बांगलादेशी घुसखोर, मृत मतदार (म्हणजे त्यांच्या नावावर मत देणारे वेगळेच कोणीतरी) जर इंडी आघाडीचे मतदार असतील तर त्यांची नावे मतदारयादीतून काढली जात असतील म्हणून रागा पिसाळणे सहजशक्य आहे. मग काहीतरी करून निवडणुक आयोगावरच प्रश्नचिन्ह उभे करा. दुसरे म्हणजे असे घोळांचे प्रमाण किती असेल? नक्की टक्केवारी सांगता येणार नाही पण बंगाल, आसामसारख्या राज्यात भरपूर बांगलादेशी भरलेले- इतके की ते मतदारसंघातील निकाल प्रभावित करू शकतील आणि इतर राज्यांमध्ये त्यामानाने कमी बांगलादेशी तसेच महानगरांमध्ये परत बरेच बांगलादेशी याची कल्पना करता येते. तिसरे म्हणजे जे काही दोष मतदारयाद्यांमध्ये आहेत ते दुरूस्त व्हायलाच हवेत. तो मुद्दा पुढे आणल्याबद्दल रागांचे धन्यवाद. पण त्यामुळेच भाजप जिंकतो असे म्हणण्यासाठी मुळात ज्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी आहेत ते लोक एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान करतात आणि ते मतदान भाजपलाच करतात हे सिध्द करायला हवे ना. या निमित्ताने आणखी डिजिटायझेशन होऊन आधार कार्डावरील पत्ता बदलला की मग मतदारयादीतील नाव आपोआप नव्या ठिकाणी जाईल अशाप्रकारचे काहीतरी केले जाईल अशी अपेक्षा. पण मुळात आधार कार्डावरील पत्ताच बदलला नाही तर काय करणार? तो प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

म्हणूनच जर रागा सदोष मतदारयाद्यांचा प्रश्न पुढे आणत असतील तर त्याला विरोध करायचे कारणच नाही. मी तेच म्हणतोय, राहुल गांधींच्या अतार्किक दाव्यांकडे दुर्लक्ष करा त्यातून काहीही साध्य होणार नाही. मात्र त्यांनी आताच हा प्रश्न उपस्थित करणे आणि बिहारमधील एस.आय.आर यांच्यात काहीतरी कार्यकारणभाव आहे असे मला वाटते. पुन्हा तेच ! राहुल गांधी हे विरोधी राजकीय पक्षाचे नेते असल्याने ते राजकीय वेळ साधणारच ना? त्याने काय फरक पडतोय? मतदार यादी निर्दोष व्हावी असे मनापासून वाटत असेल तर उलट त्यांना पाठिंबा देऊन अडवणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. या निमित्ताने आणखी डिजिटायझेशन होऊन आधार कार्डावरील पत्ता बदलला की मग मतदारयादीतील नाव आपोआप नव्या ठिकाणी जाईल अशाप्रकारचे काहीतरी केले जाईल अशी अपेक्षा. हे व्हायलाच हवे. अशक्य अजिबात नाही. अडवणूक आयोगाची फक्त इच्छा हवी. एपिक नंबर हा शोभेचा नंबर होता कामा नये. पत्ता बदलला तर व्होटर आयडी कार्ड अद्ययावत करायला हवे, आधार कार्डचा उपयोग हा व्यक्तीच्या ओळख पुराव्यापुरता मर्यादित असावा.

In reply to by आग्या१९९०

मतदार यादी निर्दोष व्हावी असे मनापासून वाटत असेल तर उलट त्यांना पाठिंबा देऊन अडवणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
मतदार यादी निर्दोष व्हावी असे मनापासून वाटत असेल तर उलट त्यांना पाठिंबा देऊन अडवणूक निवडणुक आयोगावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हल्ली मिपावर स्ट्राईकथ्रू फॉन्ट चालत नाही का? उलट त्यांना पाठिंबा देऊन अडवणूक हे चार शब्द स्ट्राईकथ्रू केले होते ते दिसले नाहीत. बाकी जर एस.आय.आर मुळे राहुल गांधी पिसाळले असतील आणि बांगलादेशी लोक मतदारयादीतून बाहेर जाणार म्हणून असला प्रकार चालू असेल तर आणि चालू नसेल तरीही राहुल गांधी या माणसाचे समर्थन न करताही मतदारयाद्या निर्दोष असाव्यात ही नेहमीच मागणी आहे आणि तसे मनापासून वाटतेही. पण त्याबरोबरच भारतात मतदारयादीत केवळ आणि केवळ भारताचेच नागरीक असावेत असेही वाटते. त्यामुळे तो रागा, ममता असले घाणेरडे लोक पिसाळले असतील तर त्यांना अजिबात किंमत द्यायची गरज मला वाटत नाही.

मतदारयाद्यात त्रुटी नक्कीच आहेत. पण म्हणून त्यामुळे भाजपा जिंकतेय हे चुकीचं आहे. फार फार तर काँग्रेस समर्थकांना मानसिक समाधान मिळेल की याद्या मुळे आपण हरतोय म्हणून. माझ्या एका मित्राच एकाच मतदार संघात दोन ठिकाणी नाव आहे. एक त्याच्या स्वतःच्या गावात दुसरं त्याच्या गावापासून सात आठ किलोमीटर असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी. मतदान तो स्वतः च्या गावातच करतो. दोनदा मतदान करणं तिथं तरी शक्य नाही. आणि महत्वाचं म्हणजे तो शरद पवार समर्थक होता, सध्याला दादा समर्थक. मतदारयाद्यातील त्रुटी मात्र कमी केल्या पाहिजे. बहुतांश वेळा काना, मात्रा, उकार चुकलेले असतात. मराठीत नाव बरोबर असेल तर स्पेल्लिंग चुकलेली असते. नाव बरोबर असली तर पत्ते बरोबर नसतात.

मतदारयाद्यात त्रुटी नक्कीच आहेत. पण म्हणून त्यामुळे भाजपा जिंकतेय हे चुकीचं आहे त्रुटी नव्हे ,चुका म्हणा! राहुल गांधींनी न सिद्ध करता येणार मुद्दा मांडू नये असे मी वर म्हटले आहे. मतदारयाद्यातील त्रुटी मात्र कमी केल्या पाहिजे. बहुतांश वेळा काना, मात्रा, उकार चुकलेले असतात. मराठीत नाव बरोबर असेल तर स्पेल्लिंग चुकलेली असते. नाव बरोबर असली तर पत्ते बरोबर नसतात. घर नंबर शून्य ही त्रुटी आहे की चूक आहे? कोणी बसवले ह्या आयुक्ताला त्याचीच चूक आहे.

In reply to by आग्या१९९०

घर नंबर शून्य ही त्रुटी आहे की चूक आहे? कोणी बसवले ह्या आयुक्ताला त्याचीच चूक आहे. अडवणूक आयोगाच्या आयुक्ताने ह्या चुका दुरुस्त केल्या तर एका विशिष्ठ पक्षाला घपले करून जिंकणे दुरापास्त होईल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रागांच्या रायबरेलीतही मतदारयादीत शून्य घर नंबर असलेले लोक आहेत असे टाईम्स नाऊच्या हिंदी चॅनेलवर दाखविले. जर शून्य घर नंबर असलेले लोक असल्यामुळे निवडणुक जिंकता येत असेल तर स्वतः रागांनी पण तशीच निवडणुक जिंकली असे म्हणायला हवे. घर नंबर शून्य असे का येत असावे याविषयी माझा अंदाज लिहित आहे. प्रत्येक ठिकाणी घरांना क्रमांक असतातच का? इमारतींमध्ये फ्लॅट्स असतात तिथे घरांना क्रमांक नक्कीच असतात. आताच माझे नाव मतदारयादीत बघितले त्यात घरक्रमांक बरोबर लिहिला आहे. पण इमारत नसेल पण बैठे घर/ बंगला वगैरे असेल तर त्या घराला मालकाने दिलेले नाव असते पण घरक्रमांक असेलच असे नाही. महसूलखात्याच्या रेकॉर्डमध्ये ते घर बांधले आहे त्याचा फार तर प्लॉट क्रमांक मिळेल पण अशा घरांना कोणता नंबर द्यायचा? अशी नावे मतदारयादीत टाकताना सिटी सर्व्हे नंबर न टाकता घर क्रमांक हा कॉलम मोकळा ठेवला तर सिस्टीम कदाचित शून्य असा क्रमांक घेत असावी. अर्थात हा माझा तर्क. तसे असेल तर घर क्रमांक शून्य असलेले लोक मोठ्या संख्येने मिळतील असे वाटते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तीच तीच गंजकी टेप वाजविणे बंद करा हो. आरोप आहे भाजपने असा फ्रॉड करून निवडणुक जिंकली. मग उत्तर द्यायला भाजप समर्थक पुढे आले तर नवल काय?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तीच तीच गंजकी टेप वाजविणे बंद करा हो तिसऱ्यांदा भाजप निवडणूक जिंकून सत्तेवर आले यामुळे विरोधक घायकुतीला आलेले आहेत. याचेच प्रतिबिंब मिपावर पडताना दिसते आहे. इंडी आघाडीच्या नेत्यांत एकवाक्यता नाही, राहुल गांधींसारखा नेता २०२९ पर्यंत आघाडीचा प्रमुख नेता राहिल्यास भाजप परत येणार यात शंका नाही, यामुळे विरोधक बावचळले आहेत. महाराष्ट्रात फडणवीसांना अतिशय खालच्या पातळीवर शिव्या देऊन झाल्या मी पुनः येईन म्हणत असताना ते पुन्हा सज्जड बहुमताने स्वबळावर आले सुद्धा. इतकेच नव्हे तर ज्या शिवसेनेने दगलबाजी केली होती ती आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात अक्षरशः दुफळी पाडून त्यांना गलितगात्र स्थितीत नेऊन ठेवले आहे. मोदींना भ्रष्टाचाराचा एकही मुद्दा चिकटवता आलेला नाही किंवा घराणेशाहीचा मुद्दा हि त्यांना चिकटत नाही. हीच स्थिती योगिंची आहे. त्यातून संसदेवर हल्ला झाला तरी काहीही न करणाऱ्या डॉ मनमोहन सिंह यांच्या तुलनेत ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदिनी पाकिस्तानला जोरदार हाणल्यामुळे सामान्य माणसांना त्यांच्या बद्दल वाटणारा आदर अधिक वाढलेला आहे अगोदर इ व्ही एम ला सगळा दोष देऊन झाला पण मग भाजप ला २४० च का मिळाले आणि इंडी आघाडीच्या जागा कशा वाढल्या? याचा ठपका इ व्ही एम वर ठेवता येत नाही अशा स्थितीत वैफल्यग्रस्त विरोधक काहीतरी करून आपला जीव रमवण्यासाठी निवडणूक आयोगाला दोष देत आहेत. आणि त्यांचे तुणतुणे मिपावरील मोरू लोक वाजवत आहेत. त्यांना तर्कशुद्ध उत्तर देणे हे गाढवापुढे गीता वाचण्यासारखे आहे.

In reply to by सुबोध खरे

त्यातून संसदेवर हल्ला झाला तरी काहीही न करणाऱ्या डॉ मनमोहन सिंह यांच्या तुलनेत संसदेवर हल्ला झाला तेव्हा डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान होते का?

In reply to by आग्या१९९०

क्षमस्व मुंबईवर दहशतवादी हल्ला लिहायचं होतं. मुद्दा लक्षात घ्या. अर्थात तो तुम्हाला लक्षात घ्यायचा नाहीये हे लोकांनी लक्षात घेतलंच आहे

In reply to by आग्या१९९०

फेक नॅरेटीव्ह बरोब्बर पकडले. मनमोहन सिंह यांनी कधीही चमकोगिरी, फोटो शूटस, मनकी बात, विनाकारण कुणाच्या गळ्यात पडणे, खोटी गर्जना करणारी, धार्मिक भावनेला हात घालणारी भाषणे कधी केली नाहीत. फक्त चांगले काम केले.

In reply to by आग्या१९९०

फेक नॅरेटीव्ह बरोब्बर पकडले. मनमोहन सिंह यांनी कधीही चमकोगिरी, फोटो शूटस, मनकी बात, विनाकारण कुणाच्या गळ्यात पडणे, खोटी गर्जना करणारी, धार्मिक भावनेला हात घालणारी भाषणे कधी केली नाहीत. फक्त चांगले काम केले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अशी नावे मतदारयादीत टाकताना सिटी सर्व्हे नंबर न टाकता घर क्रमांक हा कॉलम मोकळा ठेवला तर सिस्टीम कदाचित शून्य असा क्रमांक घेत असावी. अर्थात हा माझा तर्क. वडिलांचे/पतीचे नाव tygay, hdyka असल्या प्रकाराचे होत असतील आणि त्याची कारणे माहीत असतील तर इतके दिवस झोपले होते का नडवणुक आयोग? आधार कार्ड वरील नाव जरा कुठे वेगळे दिसले की बुथवर अडवले जाते मतदाराला. हीच काळजी मतदार यादी तयार करताना का घेत नाही? कोणी चुका दाखवल्या तर त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते.

राहुल गांधीनी विचारलेल्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर देण्यापेक्षा उलट प्रश्न करणे,चालढकल करणे ह्यात निवडणूक आयोग गुंतला आहे. आयोग प्रामाणिक असता तर "चौकशी करू. व दोषी अधिकार्यांवर कारवाई करू" असे सरळ सांगितले असते. आता आयोगाच्या बचावासाठी भाजपाचे नेते पुढे सरसावले.. देवेंद्र फडणवीस ह्यांनी उत्तरे देण्यापेक्षा 'राहुल गांधी ह्यांनी त्यांचा मेंदू तपासला पाहिजे" वगैरे बाष्कळ टीका केली. हे त्यांच्या मातृसंघटनेत जे शिकवले जाते त्याला धरूनच म्हणा: प्रतिवाद करता येत नसेल तर व्यक्तिगत टीका करा. आता निवड्णूक आयोग राहुल गांधी ह्यांना कोणत्यातरी नियमाच्या कचाट्यात पकडायचा प्रयत्न करेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ देशात लोकशाही संपवावी म्हणून भाजप प्रयत्नशील आहे. भारतचा प्रवास उलट दिशेने सुरू झाला आहे.

.

द लेडीज एंड जन्टलमन आय प्रेझण्ट टू यू माय फ्रांड ये फ्रांड ऑफ़ इंडिया अ ग्रेट अमेरिकन प्रेसिडेंट मिस्टर डोनाल्ड भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवस झालेल्या लष्करी संघर्षात आपण मध्यस्थी केली असा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. या संघर्षात पाच ते सहा विमाने पाडण्यात आली ( कोणाचे ते नै बोलले ) व्हाइट हाउसमध्ये शुक्रवारी बोलताना त्यांनी ही माहिती ३१ व्या वेळी दिली. निवडणूक आयोग इकडे शपथपत्र द्या, पुरावे द्या म्हणत असतांना राहुल गांधी यांना नोटीस देऊन मोकळे झाले आणि तिकडे न्यायालयात मात्र निवडणूक आयोग म्हणतो की, सर्वोच्च न्यायालयात बिहार प्रकरणात 'संबंधितांना पूर्वसूचना दिल्याशिवाय, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय किंवा तर्कशुद्ध नोटीस बजावल्याशिवाय बिहारमधील मसुदा मतदारयादीतून कोणत्याही मतदाराचे नाव वगळले जाणार नाही,' अशी ग्वाही आयोगाने न्यायालयाला दिली. बिहार मधे थोड़ी थोड़की नव्हे तर, ६५ लाखांहून जास्त नावे वगळण्यात आली आहेत. नावे वगळण्यात आलेल्या व्यक्ती एकतर मरण पावल्या आहेत किंव स्थलांतरित झाल्या आहेत, असा दावा आयोगाने केला आहे. अचानक वादळ आल्यासारखं मरणाचं आणि स्थलांतराचं प्रमाण वाढलं =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहा! मला वाटते नितीश बांबूचा काटा काढण्यासाठी अडवणूक आयोगाचे हे उद्योग सुरू आहेत, “ज्यांच्या जीवावर वाढा त्यांना संपवा.” ह्या भाजपी धोरणानुसार नितीश बांबूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गान परिषद, अकाली दल, शिवसेना करण्याचा घाट घातला जातोय. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न अडवणूक आयोग करतोय. लोकशाही वगैरे गेली तेल लावत.

In reply to by युयुत्सु

हा हा हा. शिकलेल्या लोकांनाही कसे भरकटवले जाउ शकते त्याचे हे उत्तम उदाहरण होते, करोना काळातले. मग थाळ्यांच्या आवाजाने करोना कसा मरतो..ह्यावरही वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठात माहिती आली. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शिकलेले लोकही कसे हुकलेले असतात ह्याचे हे उत्तम ऊदाहरण आहे. कोरोना कळात जिवाची पर्वा न करता आपले काम करणार्या लोकांविषयी क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या / घंटा वाजवुन त्यांचे मनोबल वाढवा हा त्यामागे हेतु होता. असो. ह्यावर जास्त बोलत नाही. मिपा वर हा चाउन चोथा झालेला विषय आहे. पण काही हुकलेले पुन्हा पुन्हा तीच तीच टेप वाजवत असतात. वॉट्स-अ‍ॅप विद्यापीठात सर्व् ज्ञान मिळते.

In reply to by सुक्या

कोरोना कळात जिवाची पर्वा न करता आपले काम करणार्या लोकांविषयी क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या / घंटा वाजवुन त्यांचे मनोबल वाढवा हा त्यामागे हेतु होता. मग त्याना पद्मभूषण पद्मविभूषण देऊन गौरवायला हवे होते, तेव्हा तुम्ही (म्हणज्या तुमच्या लाडक्या मोदी सरकारने) कंगना राणावत ला पुरस्कार दिले आणी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्याना काय टाळ्या नि थाळ्या? म्हणूनच बिरुटे सर आजच्या काळाला “गोबरयुग” म्हणत असावेत का?

In reply to by युयुत्सु

=)) -दिलीप बिरुटे

लोकसभा निवडणुकीतील कथित 'मतचोरी' आणि बिहारमधील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणीच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीचे खासदार सोमवारी रस्त्यावर उतरले. खासदारांना पोलिसांनी अडवले घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला, पुढे अटक आणि सुटका. राजकीय डावपेचाच्या लढाईत 'इंडिया' आघाडी घेत आहे, हळुहळु प्रसार माध्यमात बातम्या यायला लागल्या आहेत. लोकसभेत आत आणि बाहेर सत्ताधा-यांची कोंडी केली यापुढील उत्तरे काळ देईल. मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. आणि जैन समाज आणि महाराष्ट्र सरकार पुढे काय पाऊल उचलते ते कळेलच. राज ठाकरे यांच्या मराठी भाषिकांबाबतच्या काही भाषणांच्या विरोधातली याचिका फेटाळली. आणि ७४ वय वर्ष असलेले आदरणीय प.मोदी कोणत्या तरी देशाच्या दौ-यावर रवाना. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

७४ वय वर्ष असलेले आदरणीय प.मोदी कोणत्या तरी देशाच्या दौ-यावर रवाना. पिकनिक ला गेले म्हणा, कारण हाती भोपाळच येणार आहे, युद्ध झाल्यावर कुणीही आपल्या पाठीशी उभे राहत नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारने तेवढीच संधी साधून काल हे सर्व खासदार संसदेत नसताना चार विधेयके मंजूर करून घेतली. ही सरकारची नेहमीचीच कार्यपध्दती झाली आहे.

१) सध्या जखमी बचाव पथकाने नडवणूक आयोगाला वाऱ्यावर सोडले आहे. २) एखाद्याच्या डोक्यातील चिप काढणे हे टरबूजातील बिया काढण्याइतके सोपे नसते , हे भारतीय जंता पक्षाच्या एका नेत्याला कळून चुकले आहे. समाप्त.

आसीम मुनीरानी एक विनोदी भाषन केले आहे. त्यात भारत म्हणजे एक मर्सिडीज आहे तर पाकिस्तान हा एक जुनाट ट्रक आहे. आणि जुन्या ट्रकने मर्सिडीज ला धडक दिली तर नुकसान कोणाचे जास्त होईल असे विचारले आहे. त्याच भाष्णात त्यानी आणखी एक मुद्दा मांडला आहे जो जरा गंभीर आहे. ते फेल्डमार्शल म्हणतात ही जर पाकिस्तान हरायला लागला तर आम्ही अण्वस्त्रे वापरू आणि निम्मे जग नष्ट करू

Edने ब्लॉक केलेले नव्वद कोटी रु परत मिळवून दाखवावेत . दूध के धुले. तीन नामांकित सांसदीय वकील आहेत त्यांच्याकडे.

In reply to by कंजूस

Edने ब्लॉक केलेले नव्वद कोटी रु परत मिळवून दाखवावेत . दूध के धुले. मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू दानशूर होते, त्यांनी देशाला आपला आनंद महाल भेट दिला. धमक्या देऊन Electoral bond मधून पक्षासाठी पैसा गोळा केला नाही. त्यामुळे काँग्रेसला अडचणीत आणू शकता पण विकत घेऊ शकत नाही.