Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 08/01/2025 - 10:01
हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/sachin-pilgaonkar-share-post-on-guru-dutt-memory-his-last-wish/articleshow/123022146.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines वर.
  • Log in or register to post comments
  • 23847 views

प्रतिक्रिया

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 08/08/2025 - 12:37

In reply to भाजपचे नेते जेव्हा निवडणूक by आग्या१९९०

Permalink

निवडणूक आयोगाने तोंड उघडले तर

निवडणूक आयोगाने तोंड उघडले तर आपण उघडे पडू ह्या भीतीने त्यांना आयोगाची बाजू घ्यावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 08/08/2025 - 13:05

In reply to निवडणुक by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

आक्षेप

अगदी याच प्रकारच्या त्रुटी सुधारण्यासाठी एस.आय.आर राबविले जात असेल तर मग त्याविषयीही ते आक्षेप घेतात ते का?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 08/08/2025 - 13:50

In reply to आक्षेप by चंद्रसूर्यकुमार

Permalink

अगदी याच प्रकारच्या त्रुटी

अगदी याच प्रकारच्या त्रुटी सुधारण्यासाठी एस.आय.आर राबविले जात असेल तर मग त्याविषयीही ते आक्षेप घेतात ते का? हा सेल्फ गोल होतोय हे लक्षात आणून देतो. बाकी निवडणूक आयोगाने एस. आय.आर. राबवण्यापूर्वी शपथपत्र करावे, जसे राहुल गांधींना सांगितले अगदी तसेच.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 08/08/2025 - 14:03

In reply to अगदी याच प्रकारच्या त्रुटी by आग्या१९९०

Permalink

सेल्फ गोल

मी पण म्हणतो की रागांचा हा सेल्फ गोल आहे. ते एस.आय.आर ला विरोध करत आहेत. त्याचे कारण ते डुप्लिकेट/मृत/अभारतीय मतदार बिहारमध्ये काँग्रेसला मत देतात म्हणून ती नावे हटवायला रागांचा विरोध आहे असे का म्हणू नये? मतदारयाद्यांमध्ये त्रुटी आहेत हे नक्कीच. इथल्याच एका सदस्याने लोकसभा निवडणुकांपूर्वी लिहिताना मागच्या वर्षी एके ठिकाणी लिहिले होते की त्यांचे नाव दोन ठिकाणच्या मतदारयादीत आहे असे आठवते. त्या त्रुटी दुरूस्त करायलाच हव्यात. तो मुद्दा रागा लावून धरत असतील तर त्यांना या मुद्द्यापुरता पूर्ण पाठिंबा.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 08/08/2025 - 14:23

In reply to सेल्फ गोल by चंद्रसूर्यकुमार

Permalink

मतदार यादी अद्ययावत करण्यास

मतदार यादी अद्ययावत करण्यास विरोध नाही. घाईघाईत निवडलेली वेळ, आणि कागदपत्रांची मागणी ह्या विरोध आहे. सुधारीत मतदार यादी निर्दोष असेल ह्याची खात्री काय? Rigging केले जाणार ह्याची भीती व्यक्त केली जात आहे. यादी तपासेपर्यंत निवडणुका होऊन जाणार. निवडणूक आयोग पुढे असेच अडेलतट्टूपणा करणार. नंतर कितीही बोंबा मारून उपयोग होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Fri, 08/08/2025 - 13:56

In reply to निवडणुक by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

आता एव्हडा अभ्यास करुन

आता एव्हडा अभ्यास करुन निवड्नुक आयोगाला ऊघडा पाडलाच आहे तर जे काय आफेडेविट मागता आहेत ते सही करुन त्यांच्या तोंडावर मारुन कारवाइ करायला भाग पाडावे. पुढे निवड्नुक आयोग कचाट्यात सापडला की सुप्रीम कोर्टात अर्ज करुन हे प्रकरण तडीस न्यावे. तशिही यांच्याकडे वकीलांची फोउज आहेच. सिब्बल किंवा सिंघवी . काय म्हणता. बरोबर की नाही? तसे नसेल तर मग “शब्द बापुडे केवळ वारा“
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 08/08/2025 - 14:10

In reply to आता एव्हडा अभ्यास करुन by सुक्या

Permalink

शपथपत्र हा ट्रॅप आहे. त्याचा

शपथपत्र हा ट्रॅप आहे. त्याचा वापर चौकशी लांबवण्याकरता होऊ शकतो. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पुरवलेली कागदपत्रे ही इलेक्ट्रॉनिकली रीडेबल नव्हती, त्यामुळे त्यात फेरफार केला असा १००% कांगावा केला जाणार. पुढे काय होणार हे सांगायची गरज नाही. साधी गोष्ट आहे निवडणूक आयोगाने त्यांच्याकडील मतदार यादीशी पडताळून बघावे. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक फॉरमॅट मध्ये असल्याने फार वेळ लागणार नाही. निवडणूक रोखेच्यावेळी SBI ने असेच नाटक केले होते. सुप्रीम कोर्टाने दरडवल्यावर कसे सगळे रेकॉर्ड आठवड्यात उपलब्ध झाले? डिजिटलचा डांगोरा पिटायचा अंगाशी आले की कागदी रेकॉर्डचा आग्रह करून वेळकाढूपणा करायचा. फट्टू आहेत .
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Fri, 08/08/2025 - 14:20

In reply to शपथपत्र हा ट्रॅप आहे. त्याचा by आग्या१९९०

Permalink

ह्या ह्या ह्या

ह्या ह्या ह्या मी म्हनालो ना “शब्द बापुडे केवळ वारा“ पळवाट आधीच शोधुन ठेवलीय
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 08/08/2025 - 14:28

In reply to ह्या ह्या ह्या by सुक्या

Permalink

पळवाट आधीच शोधुन ठेवलीय

पळवाट आधीच शोधुन ठेवलीय ठीक आहे निवडणूक आयोगाने शपथपत्र करून , निवडणुकीचे प्रत्येक बूथचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या तपासण्यास द्याव्यात. आहे का तयार निवडणूक आयोग?
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Fri, 08/08/2025 - 14:44

In reply to पळवाट आधीच शोधुन ठेवलीय by आग्या१९९०

Permalink

तेच म्हण्तोय मी.

तेच म्हण्तोय मी. लावा की दवा सुप्रीम कोर्टात. सिब्बल आहे की. निवड्णुक आयोग काय सुप्रीम कोर्टाच्या वर आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 08/08/2025 - 15:03

In reply to तेच म्हण्तोय मी. by सुक्या

Permalink

निवड्णुक आयोग काय सुप्रीम

निवड्णुक आयोग काय सुप्रीम कोर्टाच्या वर आहे का? निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था असल्याने सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध करू शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 08/08/2025 - 16:46

In reply to शपथपत्र हा ट्रॅप आहे. त्याचा by आग्या१९९०

Permalink

अभ्यासपूर्ण प्रतिसाद आज्ञा!

अभ्यासपूर्ण प्रतिसाद आज्ञा! अर्थात ह्याचे उत्तर नसणारच इथल्या भाजप समर्थकांकडे, वयक्तिक खालच्या पातळीवरील टीकेसाठी तयार रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 08/08/2025 - 17:06

In reply to अभ्यासपूर्ण प्रतिसाद आज्ञा! by अमरेंद्र बाहुबली

Permalink

वयक्तिक खालच्या पातळीवरील

वयक्तिक खालच्या पातळीवरील टीकेसाठी तयार रहा. शक्यता कमी आहे. सध्या त्यांना निवडणूक आयोग आणि त्याचा बचाव करणारे सरकार ह्या दोघांसाठी जीभ व्यस्त ठेवावी लागणार आहे. दुभंगलेल्या जिभेला इथे येणे परवडणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 08/08/2025 - 17:10

In reply to वयक्तिक खालच्या पातळीवरील by आग्या१९९०

Permalink

सध्या त्यांना निवडणूक आयोग

सध्या त्यांना निवडणूक आयोग आणि त्याचा बचाव करणारे सरकार ह्या दोघांसाठी जीभ व्यस्त ठेवावी लागणार आहे. आणी बाजूच्या गल्लीत हत्ती पळवनाऱ्या टोळीचेही समर्थन करायचेय. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 08/09/2025 - 17:05

In reply to सध्या त्यांना निवडणूक आयोग by अमरेंद्र बाहुबली

Permalink

आरती साठे...

आणि आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या जरी असल्या तरी त्यांचा अभ्यास, पात्रता, वगैरे सगळं पाहूनच न्यायमूर्तीसाठी शिफारस केल्या गेली याचंही समर्थन करायचं आहे. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 08/08/2025 - 08:33

Permalink

ट्रंपला हाणला.

ट्रंपला हाणला. https://youtu.be/rWbWl_Khl0s?si=0nsCc_B3TdqfKcBK
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 08/08/2025 - 13:08

Permalink

इंडी अघाडीच्या बैठकीत ठाकरे

इंडी अघाडीच्या बैठकीत ठाकरे ना सहाव्या रांगेत ( शेवटच्या) बसवले गेले. या वरून आठवले की शिवाजी मराज जेंव्हा आग्र्याला गेले होते तेंव्हा त्याना असेच मागे बसवले गेले होते. त्यावर क्रोधीत होऊन महाराजानी भर दरबारात ओरडून सांगितले होते आणि दरबाराचा त्याग केला होता.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 08/08/2025 - 13:20

In reply to इंडी अघाडीच्या बैठकीत ठाकरे by विजुभाऊ

Permalink

असे कसे

नाही. सध्या फॅशन आहे. बोलावले नाही तरी जायचे. मागे उभे केले तरी हात पकडू पकडू फोटो टाकायचे मिटिंगांचे. "यू आर अ‍ॅक्टीव्ह ऑन एक्स हं, ह्या ह्या ह्या" अशा गंभीर आंतरराष्ट्रीय संवादांचे व्हिडीओ टाकण्याची फॅशन तर फार आवडली मला. त्यावर क्रोधीत होऊन महाराजानी भर दरबारात ओरडून सांगितले होते आणि दरबाराचा त्याग केला होता. तुलनेने हे फारच फॅशनेबली ऑऊटडेटेड
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/08/2025 - 17:39

In reply to असे कसे by अभ्या..

Permalink

=))

"यू आर अ‍ॅक्टीव्ह ऑन एक्स हं, ह्या ह्या ह्या" हे सध्या लै जोरात आहे.=)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 08/08/2025 - 19:11

In reply to इंडी अघाडीच्या बैठकीत ठाकरे by विजुभाऊ

Permalink

राजशी दोस्ती केल्याने इंडिया

राजशी दोस्ती केल्याने इंडिया ब्लॉक त्यांना भाव देत नसेल?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 08/11/2025 - 13:03

In reply to राजशी दोस्ती केल्याने इंडिया by कंजूस

Permalink

इंडी ब्लॉक कशाला...... राज

इंडी ब्लॉक कशाला...... राज सुद्धा त्याना भाव देत नाहीत. त्यांच्या सकाळचा भोंगा जितका देत असेल तेवढाच काय तो मोळतो भाव
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 08/08/2025 - 14:14

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 08/09/2025 - 10:02

Permalink

प्रतिज्ञापत्र?.. कशाला?

प्रतिज्ञापत्र?.. कशाला? निवडणूक आयोगाने जर जुनी प्रतिज्ञापत्रं उघडली, तर.. पहिल्याच पानावर मोदीजी भेटतील. 2002, 2007, 2012 मध्ये शपथपूर्वक सांगितलं — "मी अविवाहित आहे." आणि काही वर्षांनी निवडणूक आयोगालाच कळवलं — "हो, माझं लग्न झालंय." मग आधीची प्रतिज्ञापत्रं काय होती? आधी खोटं, की नंतरचं खरं? की दोन्ही वेळा ‘राजकारण’च खरं? दुसऱ्या पानावर स्मृती इराणी — पहिल्या निवडणुकीत ग्रॅज्युएट, पुढच्या निवडणुकीत १२वी पास. वा! असे रिव्हर्स एज्युकेशन फक्त भारतीय राजकारणातच शक्य आहे. ही फक्त झलक आहे. अशी ‘सत्य वचन’ं असलेली बरीच प्रतिज्ञापत्रं सरकारी फाईलमध्ये धूळ खात पडली आहेत. आणि कारवाई? अहो, त्या फाईलवरचा पिनही आजवर निघालेली नाही. मग प्रश्न सरळ आहे.. निवडणूक आयोगाने आजवर अशा खोट्या प्रतिज्ञापत्रांवर काय कारवाई केली? सत्तेत असलेल्यांवर कधी गुन्हा दाखल झाला का? कधी अपात्र ठरवलं का? उत्तर — शून्य. प्रभा मीद्दडी https://www.facebook.com/share/159wbZsm1VU/
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Sat, 08/09/2025 - 22:34

In reply to प्रतिज्ञापत्र?.. कशाला? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

खरं तर हे इतके खणखणीत मुद्दे

खरं तर हे इतके खणखणीत मुद्दे आहेत, यावर कोणीच कसं न्यायालयात गेलं नसावं?
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Sat, 08/09/2025 - 22:39

In reply to प्रतिज्ञापत्र?.. कशाला? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

<सत्तेत असलेल्यांवर कधी

<सत्तेत असलेल्यांवर कधी गुन्हा दाखल झाला का? कधी अपात्र ठरवलं का?> हो, किमान एकदा तरी असं झालं होतं. त्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. अर्थात १९७१ च्या युद्धानंतर बिघडलेली आर्थिक घडी, देशांतर्गत वाढता असंतोष आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू झालेली सरकारविरोधी आंदोलनं हीसुद्धा कारणं असू शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 08:25

In reply to प्रतिज्ञापत्र?.. कशाला? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अविवाहित

2002, 2007, 2012 मध्ये शपथपूर्वक सांगितलं — "मी अविवाहित आहे."
किती खोटं बोलाल? २०१४ पूर्वी उमेदवारी अर्ज कागदावर द्यायचे त्यात सगळे कॉलम भरणे सक्तीचे नव्हते. त्यात वैवाहिक स्टेटस हा एक कॉलम होता. एखादा कॉलम भरणे सक्तीचे नसेल तर तो मोकळा ठेवायचा ऑप्शन असतो हे वेगळे सांगायला हवे का? त्याप्रमाणे मोदींनी तो कॉलम मोकळा सोडला. त्याचा अर्थ मी अविवाहीत आहे असे मोदींनी शपथेवर सांगितले असे म्हणायला आबांचीच तल्लख बुद्धी हवी.पण २०१४ मध्ये (आणि नंतरही) उमेदवारी अर्ज त्यांच्या सॉफ्टवेअरवरून भरायचा होता त्यात सगळे कॉलम भरणे सक्तीचे होते. तेव्हा मोदींनी विवाहित ही माहिती भरली. खोटं बोलणार आणि रेटून रेटून बोलणार हा तुम्हा मंडळींचा खाक्या असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sat, 08/09/2025 - 11:17

Permalink

राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रक

राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रक दिले तर त्याचा उपयोग मूळ मुद्दा भरकटवून राहुल गांधींना अडचणीत आणण्यासाठी केला जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न केला जाणार. तसे झाले तर त्यास राहुल गांधीच जबाबदार आहेत. राहुल गांधीच्या टीमने भरपूर परिश्रम घेऊन मतदार यादीतील चुका शोधून काढल्या, ह्यात निवडणूक आयोगाचा १००% हलगर्जीपणा उघडकीस आला. परंतु अतिविश्वासात राहुल गांधींनी त्याचा संबंध निवडून आलेल्या उमेदवाराच्या विजयाशी केला, जो ते खात्रीने सिद्ध करू शकत नाही.मतदार यादीतील ह्या मतदारांनी कशावरून विजयी उमेदवारालाच मतदान केले? ह्यातील सगळ्यांनी मतदान केले ह्याची आकडेवारी कुठे आहे? मतदान चोरीला गेले हे कसे सिद्ध करणार? प्रतिज्ञापत्र जरी केले तरी हे मुद्दे त्यातून गाळावे लागणार ह्याची राहुल गांधींना जाणीव आहे. हे मुद्दे वगळले तर सत्ताधारी पक्ष, गोदी मीडिया आणि निवडणूक आयोग ह्याच मुद्यावर राहुल गांधींना घेरणार. राहुल गांधी अभ्यासू, मेहनती आणि प्रामाणिक आहेत परंतु तितकेच भोळे आणि उतावीळ असल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी पडते. आपण विश्वगुरू नाही की आपल्या चुका आणि प्रतिमा सांभाळायला पक्ष, मातृ संस्था, मिडिया धावून येतील , ह्या वस्तुस्थितीचा राहुल गांधींनी विचार करूनच पाऊले उचलावीत.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 08/09/2025 - 18:42

In reply to राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रक by आग्या१९९०

Permalink

आरोप करताना किंवा दावा

आरोप करताना किंवा दावा लावताना एकच विवक्षित मुद्दा आणि योग्य पुरावे द्यावेत. हे बरोबरच. >>परंतु अतिविश्वासात राहुल गांधींनी त्याचा संबंध निवडून आलेल्या उमेदवाराच्या विजयाशी केला, जो ते खात्रीने सिद्ध करू शकत नाही.मतदार यादीतील ह्या मतदारांनी कशावरून विजयी उमेदवारालाच मतदान केले?>> बरोबर. पसरट दावे करू नयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/10/2025 - 10:47

In reply to राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रक by आग्या१९९०

Permalink

मनकी की बाते.

'चौकीदार चोर है' हे जवळ जवळ देशभर मान्य होत चाललं आहे. मागील लोकसभेच्या निवडणूकीत ढकलपास झालेलं सरकार थोडक्यात वाचलं, तेव्हाच काही शंका यायला लागल्या होत्या. पण लोकांचं लक्ष तातडीने 'डायवर्ट' करणे यात भाजपाची पगारी मिडिया भारी पडते. व्यवस्थेविरुद्ध कोणत्याही मुद्द्याने पकड घेतली की नवे विषय आलेले आपल्याला बघायला मिळतील. निवडणूकीच्या काळात माध्यमं आणि निवडणूक आयोगाची फ्री हॅंड मोकळीक यांनी ढकलपास होण्यास सद्य सरकारला हातभार लावला. परवाच्या, पत्रकार परिषदेतील भाजपसोबत निवडणूक आयोग चोरीत सामील असल्याच्या आरोपाचं मुद्याचं तसं कोणाला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. आता पुढील काळात व्यक्तीगत चारित्र्य हनन, न्यायालयात कोणत्या तरी गुन्ह्यात अडकविणे, असे सर्व प्रयोग चालू राहतील. यावरुन आठवण झाली. अशोका विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक सब्यसाची दास यांच्या २०१९ मधील निवडणुका आणि भाजपच्या अटीतटीच्या जागांवर झालेल्या लढतींमधील विजयावर शंका उपस्थित करणाऱ्या शोधनिबंधावर गदारोळ झाला होता. 'जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये लोकशाहीची पीछेहाट' या निबंधात “भाजप ज्या जागांवर निवडणुकी आधी सत्तेत होती आणि त्यातील ज्या जागांवर अतितटीची लढाई होती त्या जागांवर भाजपनं अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली" कशी केली त्याचं तपशीलवार मुद्दे आणि संदर्भ देत शोधनिबंध सादर केला होता. पुढे, विद्यापीठानं दास यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं. संप आंदोलने झाली. गुप्तचर विभागानेही भेटी दिल्या आणि प्रकरण शांत झाले. सत्तेची मस्ती कोणत्याही पक्षाला येऊ शकते भाजपा त्याला अपवाद असण्याचे काही कारण नाही. पण लोकशाही व्यवस्थेच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी आपलं पावित्र्य जपणे आवश्यक आहे. आता इस. ७१२ पासून ते २०१४ पर्यंत असं पावित्र्य जपलं होतं का ? असा कांगावा करुन सध्याचं पाप लपवता येऊ शकतं यातही काही शंका नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 08/10/2025 - 10:59

In reply to मनकी की बाते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

माझ्या मते निवडणूक आयोग मी

माझ्या मते निवडणूक आयोग मी इतर सरकारी संस्थेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ द्यायला हवी की “आम्ही भाजपसाठी कुठलीही फेरफार, घपला, तसेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष गैरप्रकार करणार नाही व देशाप्रती व भारतीय घटनेप्रती प्रमाणिक राहू.” अशी शपथ दिली तर निदान नैतिक लाज वाटून तरी आयोगातील लोक प्रामाणिकपणे काम करतील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/10/2025 - 11:55

In reply to माझ्या मते निवडणूक आयोग मी by अमरेंद्र बाहुबली

Permalink

चोरीची सुरुवात....

भाजप आणि त्यांच्या पक्षीय कुटुंबाला लाज शरम नैतिकता वगैरे काही नाही. खरं तर, चोरीची सुरुवात झाली ती 'आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या नेमणुकीच्या समितीतून सरन्यायाधीश हटवून केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करणे' तिथून झाली. कॅन्टीनमध्ये बसलेले, संसदीय समितीच्या मिटिंगमध्ये बसलेले असे मिळून दीडशे खासदार फटक्यात निलंबित केले आणि ते विधयेक घाई घाईने मंजूर केले. संघानं यंव केल आणि त्यंव केलं. पन्ना प्रमुखांनी रात्रंदिवस यंव केलं आणि त्यंव केल, समर्पितांनी सतरंजी उचलल्या आणि यंव केलं आणि त्यंव केलं. उपाशी तापाशी काम केलं आणि यश मिळालं. या सगळ्या भाकडकथा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सोयीचं सगळं करायला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 08/10/2025 - 12:10

In reply to चोरीची सुरुवात.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

संघानं यंव केल आणि त्यंव केलं

संघानं यंव केल आणि त्यंव केलं. पन्ना प्रमुखांनी रात्रंदिवस यंव केलं आणि त्यंव केल, समर्पितांनी सतरंजी उचलल्या आणि यंव केलं आणि त्यंव केलं. उपाशी तापाशी काम केलं आणि यश मिळालं. या सगळ्या भाकडकथा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सोयीचं सगळं करायला. +१
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 12:11

In reply to चोरीची सुरुवात.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

कॉलेजिअम

'आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या नेमणुकीच्या समितीतून सरन्यायाधीश हटवून केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करणे'
वा रे वा. न्यायाधीश लोक आपली नियुक्ती आपल्याच कॉलेजिअमकडून करून घेतात. त्यात इतरांना काहीही 'से' नसतो. पण न्यायाधीशांना मात्र प्रत्येक नियुक्तीमध्ये आपला सहभाग असावा असे वाटते. चित भी मेरी पट भी मेरा की काहीतरी बोलतात ना तसे कसे चालेल? जोपर्यंत कॉलेजिअम पध्दत आहे तोपर्यंत न्यायाधीशांना कोणत्याही प्रकारच्या नियुक्तीत अजिबात सहभागी करून घेतले जाऊ नये. जर मधे नाक खुपसायला आले तर कायदा करून न्यायाधीशांना तिथून हटवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 08/10/2025 - 12:12

In reply to कॉलेजिअम by चंद्रसूर्यकुमार

Permalink

म्हणजे आपल्या सोयीने निवडणुका

म्हणजे आपल्या सोयीने निवडणुका मॅनेज करता येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 12:42

In reply to म्हणजे आपल्या सोयीने निवडणुका by अमरेंद्र बाहुबली

Permalink

:)

एकंदरीत ईव्हीम हॅक केल्याचा दावा तोंडावर आपटला म्हणून आता नवीन टुमणं सुरू झालेले दिसते. हळूहळू करून रागा कसे खोटे बोलले आहेत हे पुढे येतच आहे. म्हणूनच ते स्वतःच्या सहीने तो दावा करून तक्रार देत नाहीयेत. कारण असे जाणीवपूर्वक खोटे बोललेले पकडले गेले तर कायदेशीर कारवाई होऊ शकेल. एकूणच राफेल, चौकीदार चोर है, ईव्हीएम हॅक केली अशा गोष्टींच्या अभूतपूर्व यशानंतर आणखी एक दैदिप्यमान विजय राहुल गांधींना मिळणार आहे असे दिसते. चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sat, 08/09/2025 - 12:05

Permalink

राहुल गांधी अभ्यासू, मेहनती आणि प्रामाणिक आहेत परंतु तितकेच भोळे

राहुल गांधी अभ्यासू, मेहनती आणि प्रामाणिक आहेत परंतु तितकेच भोळे जोक ऑफ द मिलेनियम. राहूल गांधीनी अजीबात ॲफिडेव्हीट देऊ नये. बाकीचे चतूर आहेत त्यानां गोत्यात आणतील. सरळ सुप्रीम कोर्टात केस करावी. निवडणूका रद्द करण्यासाठी केस करून आपल्या आजी बरोबर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यावा. आणि उतावीळ असल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी पडते. हे मात्र खरंय बर का..... मला एक इंग्लिश कवीता आठवते, "The Pied Piper of Hamelin" -Robert Browining. The story is often interpreted as a cautionary tale about broken promises.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sat, 08/09/2025 - 12:31

In reply to राहुल गांधी अभ्यासू, मेहनती आणि प्रामाणिक आहेत परंतु तितकेच भोळे by कर्नलतपस्वी

Permalink

मला एक इंग्लिश कवीता आठवते,

मला एक इंग्लिश कवीता आठवते, मला तर शालेय पाठ्यपुस्तकातील " The Man Who Knew Too Much " ह्या धड्याची आठवण येते.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 08/09/2025 - 12:27

Permalink

आयला! निवडणूक आयोग घाबरलेले

Image removed. आयला! निवडणूक आयोग घाबरलेले दिसतेय, वेबसाईट बंद करून पळ काढलाय. चोराच्या मनात चांदणे!
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 12:33

Permalink

राहुल गांधींचा खोटारडेपणा

राहुल गांधींनी सही करून रितसर तक्रार दाखल केली नाही आणि कोर्टात केस केली नाही त्यावरूनच ते खोटे आहेत हा संशय आला होता. आता तो अजून बळकट झाला आहे. कोणा टीव्हीवाल्याने त्या आदित्य श्रीवास्तवलाच गाठले. तर त्याने सांगितले की २०१६ मध्ये तो लखनौत होता, नोकरीच्या निमित्ताने २०१८ मध्ये मुंबईत आणि २०२१ मध्ये बंगलोरला गेला. बरेचसे लोक असे स्थलांतरीत झाल्यावर आपले नाव मतदारयादीतून दुसरीकडे लगेच हलवत नाहीत. पण हा आदित्य श्रीवास्तव त्याला अपवाद होता. मतदारयादीत नाव एकीकडून दुसरीकडे न्यायची एक पध्दती आहे. ते मला माहित आहे कारण मी तसे केले आहे. नव्याने मतदार म्हणून नोंदणी करायचा अर्ज करायचा आणि नाव एका मतदारसंघातून दुसरीकडे न्यायचा असे दोन वेगळे फॉर्म असतात. त्याने नक्की कोणता फॉर्म भरला होता हे माहित आहे का? मी नाव स्थलांतरीत करायचा फॉर्म भरला होता त्यामुळे माझे नाव सांगलीच्या मतदारयादीतून काढून नवी मुंबईत समाविष्ट केले गेले. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि एकीकडे नाव असेल तरी दुसरीकडे नव्याने नाव समाविष्ट करायचा अर्ज करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसे त्याने केले असेल तर (केले आहे का हे मला माहित नाही) त्याच्याविरोधात जरूर कायदेशीर कारवाई व्हावी. जर त्याने योग्य तो फॉर्म भरला असेल तरी त्याचे नाव जुन्या ठिकाणी असेल तर ते नक्की कसे झाले याची नक्कीच चौकशी करायला हवी. आणि समजा नाव चुकीने एकापेक्षा जास्त ठिकाणी असेल तरी त्याने एकापेक्षा जास्त वेळा मतदान केले आहे का? तसे झाले असेल तरच ते आकडे निवडणुक निकालांवर प्रभाव टाकतील. या सगळ्या मुद्द्यांवर काहीही न बोलता दिसले एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव की निवडणुक आयोग पक्षपाती आहे ही बोंब मारायला सगळे मोकळे. बरं आणि यात भाजपचा संबंध काय? भाजपने त्याचे नाव जास्त ठिकाणी नोंदविले? तसे असेल तर इथलेच एक सन्माननीय सदस्य मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकांच्या वेळेस मिपावरच त्यांचे नाव दोन ठिकाणी आहे असे अभिमानाने सांगत होते. मग त्यामागे उबाठा सेनेचा हात आहे असे का म्हणू नये? दुसरे म्हणजे एकाच पत्त्यावर बरेच (८० की काहीतरी) मतदार आहेत. त्याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे बरेचसे लोक एकीकडून दुसरीकडे गेले तरी त्यांचा पत्ता/मतदारसंघ वगैरे लगेच बदलत नाहीत. संबंधित पत्त्यावर कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक किंवा तत्सम नोकर्‍या करणारे लोक राहात होते. असे किंवा रोजंदारी करणारे लोक एकाच खोलीत ८-१० एकत्र राहतात हे मुंबईत तरी कित्येक ठिकाणी बघायला मिळेल. बर्‍याच ठिकाणी तर असे असते की रात्रपाळीचे लोक कामावर गेले की त्यांच्या कॉटवर सकाळी नोकरी करणारे लोक झोपतात आणि ते लोक सकाळी उठून कामावर गेले की रात्रपाळीवरून आलेले लोक तिथे झोपतात. सगळ्यांचा पत्ता एकच. आणि तिथे राहणारे असे लोक वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहतात असे नक्कीच नाही. एक गेला, दुसरा आला हे सतत चालूच असते. नवी मुंबईत आमच्या बिल्डिंगमधील शेजारच्या फ्लॅटमध्ये घरमालकाने ४ वर्षे कॉलेजातील मुलींना घर भाड्याने दिले होते. त्यावेळेस मी सोसायटीच्या कमिटीत होतो त्यामुळे कोण आली, कोण गेली याची नोंद व्हायची ते मला माहित होते. ४ वर्षात किमान २५ जणी अशा बदलून गेल्या होत्या. हे एका बिल्डिंगमध्ये झाले. त्या घराचे फोटो दाखविले गेले अशा बैठ्या घरांमध्ये त्याहूनही बरीच जास्त ये-जा असते हे अजिबात अशक्य नाही. अशा लोकांपैकी काहींनी तिथे असताना तो पत्ता निवासी पत्ता म्हणून वापरला पण तिथून दुसरीकडे गेल्यावर आधारकार्ड, मतदारयादी अशा ठिकाणी तो पत्ता बदलला नाही तर असेच एकाच पत्त्यावर कित्येक लोक आढळतील.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 12:50

In reply to राहुल गांधींचा खोटारडेपणा by चंद्रसूर्यकुमार

Permalink

संशयाचा फायदा

तर त्याने सांगितले की २०१६ मध्ये तो लखनौत होता, नोकरीच्या निमित्ताने २०१८ मध्ये मुंबईत आणि २०२१ मध्ये बंगलोरला गेला.
दुसरे म्हणजे रागाने त्या आदित्य श्रीवास्तवचे नाव तीन ठिकाणी आहे हे सांगितले आणि दाखविले त्या तीनही मतदारयाद्या लेटेस्ट होत्या असा संशयाचा फायदा देत आहे. नाहीतर २०१६ मधील लखनौची यादी, २०१८ मधील मुंबईची यादी आणि २०२१ मधील बंगलोरची यादी घेतली तर मग असे नाव तीन वेगळ्या ठिकाणी दिसेल. सहा वर्षांपूर्वीची सांगलीची मतदारयादी आणि आताची नवी मुंबईची मतदारयादी बघितली तर चंद्रसूर्यकुमार हे नावही दोन ठिकाणी दिसेल :)
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 14:42

In reply to राहुल गांधींचा खोटारडेपणा by चंद्रसूर्यकुमार

Permalink

ऑपरेशन सिंदूर

कोणा टीव्हीवाल्याने त्या आदित्य श्रीवास्तवलाच गाठले.
आणि तीन महिने झाले तरी कोणीही टिव्हीवाला ऑपरेशन सिंदूरमधील त्या तथाकथित पडलेल्या विमानांमधील वैमानिकांच्या घरी जाऊ शकलेला नाही इतकेच काय तर 'हो मी विमान पडताना बघितले' असे म्हणणार्‍या एकाही माणसापर्यंत जाऊ शकलेला नाही :)
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 08/10/2025 - 14:02

Permalink

कोणा टीव्हीवाल्याने त्या

कोणा टीव्हीवाल्याने त्या आदित्य श्रीवास्तवलाच गाठले. तर त्याने सांगितले की २०१६ मध्ये तो लखनौत होता, नोकरीच्या निमित्ताने २०१८ मध्ये मुंबईत आणि २०२१ मध्ये बंगलोरला गेला अडवणूक आयोगाच्या बचावासाठी अभ्यासू लोक येणार हे मी वर म्हटलेच होते. परंतु ते अडवणूक आयोगाला अडचणीत आणत आहेत. एक प्रकारे अडवणूक आयोगाची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आणण्याचे काम करत आहेत. वर उल्लेख केलेल्या व्यक्तीचे एकाच मतदारसंघातील दोन वेगवेगळ्या बुथवर नाव दिसत आहे. पत्ताही सारखाच आहे. ह्याला जबाबदार कोण? भारतात पहिले वोटर आयडी कार्ड ३२ वर्षापूर्वी दिले गेले. आज दिसणाऱ्या मतदार यादीतील चुका होऊ नये म्हणून एपिक नंबर दिला गेला होता. इतक्या वर्षात डिजिटल क्रांती होऊनही सदोष मतदार याद्या होऊच कशा शकतात?
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 14:39

In reply to कोणा टीव्हीवाल्याने त्या by आग्या१९९०

Permalink

रागा

मतदारयाद्या पूर्ण निर्दोष आहेत असा दावा कोणी केल्याचे ऐकिवात नाही, निदान मी तरी नाही. कसा करणार? मिपावरीलच एक सन्माननीय सदस्य पब्लिक फोरमवर त्यांचे नाव दोन ठिकाणी आहे असे अभिमानाने सांगत असतील तर असा दावा करणार्‍याला तोंडावर पाडायला ते एक उदाहरण निदान मिपावर तरी पुरेसे आहे. अनेक ठिकाणी लोक स्थलांतरीत झाले तरी नावे जुन्या ठिकाणीच राहतात किंवा दोन्ही ठिकाणी असतात, मृत व्यक्तींची नावे मतदारयाद्यांमधून काढली जात नाहीत, मुळात भारताचे नागरीकच नाहीत त्यांची नावेही मतदारयाद्यांमध्ये असतात हे जगजाहीर आहे. म्हणूनच जर रागा सदोष मतदारयाद्यांचा प्रश्न पुढे आणत असतील तर त्याला विरोध करायचे कारणच नाही. मात्र त्यांनी आताच हा प्रश्न उपस्थित करणे आणि बिहारमधील एस.आय.आर यांच्यात काहीतरी कार्यकारणभाव आहे असे मला वाटते. जर का बांगलादेशी घुसखोर, मृत मतदार (म्हणजे त्यांच्या नावावर मत देणारे वेगळेच कोणीतरी) जर इंडी आघाडीचे मतदार असतील तर त्यांची नावे मतदारयादीतून काढली जात असतील म्हणून रागा पिसाळणे सहजशक्य आहे. मग काहीतरी करून निवडणुक आयोगावरच प्रश्नचिन्ह उभे करा. दुसरे म्हणजे असे घोळांचे प्रमाण किती असेल? नक्की टक्केवारी सांगता येणार नाही पण बंगाल, आसामसारख्या राज्यात भरपूर बांगलादेशी भरलेले- इतके की ते मतदारसंघातील निकाल प्रभावित करू शकतील आणि इतर राज्यांमध्ये त्यामानाने कमी बांगलादेशी तसेच महानगरांमध्ये परत बरेच बांगलादेशी याची कल्पना करता येते. तिसरे म्हणजे जे काही दोष मतदारयाद्यांमध्ये आहेत ते दुरूस्त व्हायलाच हवेत. तो मुद्दा पुढे आणल्याबद्दल रागांचे धन्यवाद. पण त्यामुळेच भाजप जिंकतो असे म्हणण्यासाठी मुळात ज्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी आहेत ते लोक एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान करतात आणि ते मतदान भाजपलाच करतात हे सिध्द करायला हवे ना. या निमित्ताने आणखी डिजिटायझेशन होऊन आधार कार्डावरील पत्ता बदलला की मग मतदारयादीतील नाव आपोआप नव्या ठिकाणी जाईल अशाप्रकारचे काहीतरी केले जाईल अशी अपेक्षा. पण मुळात आधार कार्डावरील पत्ताच बदलला नाही तर काय करणार? तो प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 08/10/2025 - 15:22

In reply to रागा by चंद्रसूर्यकुमार

Permalink

म्हणूनच जर रागा सदोष

म्हणूनच जर रागा सदोष मतदारयाद्यांचा प्रश्न पुढे आणत असतील तर त्याला विरोध करायचे कारणच नाही. मी तेच म्हणतोय, राहुल गांधींच्या अतार्किक दाव्यांकडे दुर्लक्ष करा त्यातून काहीही साध्य होणार नाही. मात्र त्यांनी आताच हा प्रश्न उपस्थित करणे आणि बिहारमधील एस.आय.आर यांच्यात काहीतरी कार्यकारणभाव आहे असे मला वाटते. पुन्हा तेच ! राहुल गांधी हे विरोधी राजकीय पक्षाचे नेते असल्याने ते राजकीय वेळ साधणारच ना? त्याने काय फरक पडतोय? मतदार यादी निर्दोष व्हावी असे मनापासून वाटत असेल तर उलट त्यांना पाठिंबा देऊन अडवणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. या निमित्ताने आणखी डिजिटायझेशन होऊन आधार कार्डावरील पत्ता बदलला की मग मतदारयादीतील नाव आपोआप नव्या ठिकाणी जाईल अशाप्रकारचे काहीतरी केले जाईल अशी अपेक्षा. हे व्हायलाच हवे. अशक्य अजिबात नाही. अडवणूक आयोगाची फक्त इच्छा हवी. एपिक नंबर हा शोभेचा नंबर होता कामा नये. पत्ता बदलला तर व्होटर आयडी कार्ड अद्ययावत करायला हवे, आधार कार्डचा उपयोग हा व्यक्तीच्या ओळख पुराव्यापुरता मर्यादित असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 21:48

In reply to म्हणूनच जर रागा सदोष by आग्या१९९०

Permalink

सुधारणा

मतदार यादी निर्दोष व्हावी असे मनापासून वाटत असेल तर उलट त्यांना पाठिंबा देऊन अडवणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
मतदार यादी निर्दोष व्हावी असे मनापासून वाटत असेल तर उलट त्यांना पाठिंबा देऊन अडवणूक निवडणुक आयोगावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 21:52

In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार

Permalink

सुधारणा

हल्ली मिपावर स्ट्राईकथ्रू फॉन्ट चालत नाही का? उलट त्यांना पाठिंबा देऊन अडवणूक हे चार शब्द स्ट्राईकथ्रू केले होते ते दिसले नाहीत. बाकी जर एस.आय.आर मुळे राहुल गांधी पिसाळले असतील आणि बांगलादेशी लोक मतदारयादीतून बाहेर जाणार म्हणून असला प्रकार चालू असेल तर आणि चालू नसेल तरीही राहुल गांधी या माणसाचे समर्थन न करताही मतदारयाद्या निर्दोष असाव्यात ही नेहमीच मागणी आहे आणि तसे मनापासून वाटतेही. पण त्याबरोबरच भारतात मतदारयादीत केवळ आणि केवळ भारताचेच नागरीक असावेत असेही वाटते. त्यामुळे तो रागा, ममता असले घाणेरडे लोक पिसाळले असतील तर त्यांना अजिबात किंमत द्यायची गरज मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Sun, 08/10/2025 - 14:09

Permalink

मतदारयाद्यात त्रुटी नक्कीच

मतदारयाद्यात त्रुटी नक्कीच आहेत. पण म्हणून त्यामुळे भाजपा जिंकतेय हे चुकीचं आहे. फार फार तर काँग्रेस समर्थकांना मानसिक समाधान मिळेल की याद्या मुळे आपण हरतोय म्हणून. माझ्या एका मित्राच एकाच मतदार संघात दोन ठिकाणी नाव आहे. एक त्याच्या स्वतःच्या गावात दुसरं त्याच्या गावापासून सात आठ किलोमीटर असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी. मतदान तो स्वतः च्या गावातच करतो. दोनदा मतदान करणं तिथं तरी शक्य नाही. आणि महत्वाचं म्हणजे तो शरद पवार समर्थक होता, सध्याला दादा समर्थक. मतदारयाद्यातील त्रुटी मात्र कमी केल्या पाहिजे. बहुतांश वेळा काना, मात्रा, उकार चुकलेले असतात. मराठीत नाव बरोबर असेल तर स्पेल्लिंग चुकलेली असते. नाव बरोबर असली तर पत्ते बरोबर नसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 08/10/2025 - 14:17

Permalink

मतदारयाद्यात त्रुटी नक्कीच

मतदारयाद्यात त्रुटी नक्कीच आहेत. पण म्हणून त्यामुळे भाजपा जिंकतेय हे चुकीचं आहे त्रुटी नव्हे ,चुका म्हणा! राहुल गांधींनी न सिद्ध करता येणार मुद्दा मांडू नये असे मी वर म्हटले आहे. मतदारयाद्यातील त्रुटी मात्र कमी केल्या पाहिजे. बहुतांश वेळा काना, मात्रा, उकार चुकलेले असतात. मराठीत नाव बरोबर असेल तर स्पेल्लिंग चुकलेली असते. नाव बरोबर असली तर पत्ते बरोबर नसतात. घर नंबर शून्य ही त्रुटी आहे की चूक आहे? कोणी बसवले ह्या आयुक्ताला त्याचीच चूक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 08/10/2025 - 14:52

In reply to मतदारयाद्यात त्रुटी नक्कीच by आग्या१९९०

Permalink

घर नंबर शून्य ही त्रुटी आहे

घर नंबर शून्य ही त्रुटी आहे की चूक आहे? कोणी बसवले ह्या आयुक्ताला त्याचीच चूक आहे. अडवणूक आयोगाच्या आयुक्ताने ह्या चुका दुरुस्त केल्या तर एका विशिष्ठ पक्षाला घपले करून जिंकणे दुरापास्त होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 21:20

In reply to घर नंबर शून्य ही त्रुटी आहे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

शून्य नंबर

रागांच्या रायबरेलीतही मतदारयादीत शून्य घर नंबर असलेले लोक आहेत असे टाईम्स नाऊच्या हिंदी चॅनेलवर दाखविले. जर शून्य घर नंबर असलेले लोक असल्यामुळे निवडणुक जिंकता येत असेल तर स्वतः रागांनी पण तशीच निवडणुक जिंकली असे म्हणायला हवे. घर नंबर शून्य असे का येत असावे याविषयी माझा अंदाज लिहित आहे. प्रत्येक ठिकाणी घरांना क्रमांक असतातच का? इमारतींमध्ये फ्लॅट्स असतात तिथे घरांना क्रमांक नक्कीच असतात. आताच माझे नाव मतदारयादीत बघितले त्यात घरक्रमांक बरोबर लिहिला आहे. पण इमारत नसेल पण बैठे घर/ बंगला वगैरे असेल तर त्या घराला मालकाने दिलेले नाव असते पण घरक्रमांक असेलच असे नाही. महसूलखात्याच्या रेकॉर्डमध्ये ते घर बांधले आहे त्याचा फार तर प्लॉट क्रमांक मिळेल पण अशा घरांना कोणता नंबर द्यायचा? अशी नावे मतदारयादीत टाकताना सिटी सर्व्हे नंबर न टाकता घर क्रमांक हा कॉलम मोकळा ठेवला तर सिस्टीम कदाचित शून्य असा क्रमांक घेत असावी. अर्थात हा माझा तर्क. तसे असेल तर घर क्रमांक शून्य असलेले लोक मोठ्या संख्येने मिळतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com