Skip to main content

ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 01/08/2025 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywo… वर.

वाचने 25892
प्रतिक्रिया 181

प्रतिक्रिया

जे महागुरू शोले सिनेमाचे दिग्दर्शन करू शकतात. संजीव कुमारला त्यांची सही घरी येऊन घ्यावीशी वाटते. त्यांच्याबद्दल काय बोलावे. त्याना सगल्या विषयातले सगळे काही समजते. इतकेच काय तर त्यानी ते शोधून काढलेले असते.

ट्रंप त्यात्यानी जे टेरीइफ लावले आहे त्याचा परिणाम म्हणजे आपले एक्स्पोर्ट कमी होईल असे वाटते. पण सरकार त्यावर ठाम आहे. बहुतेक सरकारच्या हातात काही कळीचे मुद्दे असावेत. चीन ने रेअर अर्थ मटेरीयल चे हत्यार ट्रेड डील साठी वापरले. भारताकडे कोणते हत्यार आहे हे अजून उघड व्हायचे आहे

'महागुरु आणि विश्वगुरु' या चालू वर्तमानकाळातील अद्भुत,साहसी आणि मनोरंजनात्मक कल्पना आहेत. 'महागुरु आणि विश्वगुरु' हे केवळ शब्द नाहीत, ही एक जैविक प्रक्रियाही नाही. थेट 'परमेश्वराची विशेष 'कलाकृती' आहे, असे मानल्या जाते. परमेश्वराच्या कलाकृतीची चिकित्सा म्हणजे पाप असते. विषय संपला. डिस्क्लेमर : वरील संपूर्ण प्रतिसाद काल्पनिक आहे, प्रतिसादाचा जिवित अथवा मृत व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

मद्रासमध्ये सिनेकलाकार राजकारणात जाऊन स्मारकं उभारली गेली. इकडे कुणी तसा प्रयत्न केला नाही. उलट राजकारणीही कलाकार झाले नाहीत. नैतर महाग्रू स्मारक झाले असते.

ट्रम्प ह्यांना काही समजत नाही, लोकप्रियतेसाठी ते सर्व करत आहेत असे सुरूवातीला अनेकजण म्हणत होते. 'येतील नंतर लायनीवर' असे वाटले होते. पण ह्यांचे सध्याचे निर्णय पाहता सगळे काही विचारपूर्वक चालु आहे आणि ट्रम्प ह्यांना सल्ले देणारे बोलवते धनी पडद्याआड आहेत असे दिसतय. “We have just concluded a Deal with the Country of Pakistan, whereby Pakistan and the United States will work together on developing their massive Oil Reserves,” Trump wrote. “We are in the process of choosing the Oil Company that will lead this Partnership. Who knows, maybe they’ll be selling Oil to India some day!” हा एवढा आत्मविश्वास येतोय कुठुन? आणी भारताबद्दल असे कुत्सित बोलायचे कारण काय? https://www.dawn.com/news/1927725 आपले परराष्ट्र धोरण काहीतरी चुकतय ? की पाकिस्ताच्या राजकीय नेत्यांनी पडद्यामागे खेळी करुन मोठी बाजी मारलीय?

अंबानीला कदाचीत ऑइल पार्टनर करणार असतील ट्रम्प. तसे झाले तर आपले सरकार आपण छान रांगतो हे दाखवून देईल.

कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स) च्या युगात पालकांपुढे कोणती आव्हाने आहेत याविषयी अभिनेत्री सोहा अली खानने बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे. ते आजच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या होमपेजवर https://timesofindia.indiatimes.com/videos/spotlight/soha-ali-khan-open… वर बघता येईल.

उपराष्ट्रपती कोणाला करणार? शरद पवारांना करता येईल काय? ते होतील काय? आणि त्यातून फुली गोळाचा मोठाच खेळ होईल.

In reply to by कंजूस

अभिजीत बिचुकलेंचे राष्ट्रपतीपदाचे तिकिट दोनदा कापले गेले होते. तेव्हा फार वाईट वाटले होते. राष्ट्रपती नाही तरी त्यांना उपराष्ट्रपती तरी केले जावे अशी फार इच्छा आहे. bichukale

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आपले ह्यांना भयंकर अनुमोदन. ईतके दिवस प्रयत्न करत आहेत. काहीतरी मिळावे त्यांना. त्यात ते डॉ. पण आहेत. त्यांनी पी एच डी कशात केली आहे ते एकदा समजाउन सांगितले होते. पण मल ते काही समजले नाही. पुन्हा सांगता का असे विचारल्यावर अंगावर आले होते. जर डॉ साहेबांना राष्ट्रपतीच व्हायचे असेल तर मी उपराष्ट्रपती या पदासाठी श्री डॉली चायवाला यांचे नाव सुचवतो. अगदी तळागाळातला माणुस आहे. जसे प्रतिभा पाटील यांना केवळ मराठी आहे म्हणुन पाठिंबा दिला होता तसे यांना पण देउ.

In reply to by कंजूस

>>> उपराष्ट्रपती कोणाला करणार ? कंजूस काका, गोबरयुगात कोणतीही गोष्ट तशी अशक्य नाही. पक्ष, निष्ठा, तत्वे, न्याय वगैरे या गोष्टी राजकारणात तशा चारित्र्याच्या राहिल्या नाहीत. आपण पहाटे डोळे उघडले की, आश्चर्य वाटावा असा शपथविधी पाहिला. आपण गुहाटीला गद्दारांचा चोरलेले पक्ष पाहिला. चोरलेली चिन्ह, पक्षांतरे, पाहिली. न्यायदेवतेची वेगवेगळी भोवळ येऊन पडावीत असे 'सर्वोच्च' निर्णय पाहिले त्यामुळे उद्या कोणीही अनपेक्षित त्या पदावर विराजमान पाहिला तर आश्चर्य अजिबात वाटणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोबरयुगात कोणतीही गोष्ट तशी अशक्य नाही. :) ज्यांना इंग्रजी बोलता येये त्याना स्वतची लाज वाटणार आहे. :)

प्रज्ज्वल रेवण्णा यास विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत शनिवारी जन्मठेपेच्या शिक्षेसह आर्थिक दंड ठोठावला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत थोरामोठ्यांनी त्याच्यासहित प्रचार केला होता. ती आठवण झाली. देशाला तीसरी क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर स्वदेशीचा मंत्र आवश्यक - प.मोदीजी. एखाद्या प्रकल्पाविरोधात बोलल्यास शहरी नक्षली ठरवणार असाल, तर अटक करूनच दाखवा,' राज ठाकरे. भारत- इंग्लंड क्रिकेट कसोटी रंगतदार अवस्थेत, इंग्लंडसमोर विक्रमी लक्ष्य गाठण्याचे आव्हान. -दिलीप बिरुटे

भारतावरील आयातशुल्कात लक्षणीय वाढ करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केले. भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरु ठेवली असून भारत नफेखोरी करीत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. माय फ्रांड डोलांड, अब की बार ट्रम्प की सरकार, असे जरी आम्ही बोललो असलो. आपल्या आगमनाप्रित्यर्थ आम्ही भले आमची गरिबी लपवत तुमचं गुजरात मधे स्वागत केलं आणि त्याची जाणीव आपल्याला नसेल आणि आपण आम्हाला कायम धमकावत असता हे काही बरं नाही, आम्ही आमच्या जुन्या मित्रांना सोडणार नाही. आम्ही आपल्या कोणत्याही शुल्क वाढीच्या धमकीला भिक घालणार नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरूटे मास्तर, एक गोष्ट लक्षात आली आहे का? भारतावर टॅरीफ लावू, भारताने रशियाकडून तेल घेऊ नये, भारत ही डेड इकॉनॉमी आहे, आम्ही भारतावर आणखी टॅरीफ लावू हे सगळे स्वतः ट्रम्प बोलत आहेत- म्हणजे अमेरिकेच्या अगदी सर्वोच्च पातळीवरून ही बडबड चालू आहे. मोदी तर त्या बडबडीकडे ढुंकूनही बघत नाहीयेत. आपल्याकडून जे काही थोडेफार उत्तर त्या बडबडीला दिले जाते आहे ते आपल्या परराष्ट्रमंत्रालयाकडून जारी केलेल्या एखाद्या प्रसिध्दीपत्रकातून किंवा एखाद्या प्रवक्त्याकडून- म्हणजे अध्यक्ष-पंतप्रधान यांच्यापेक्षा कितीतरी कनिष्ठ पातळीवर. ट्रम्पने धमकावल्यानंतर युरोपिअन युनियन व्यापार करार करायला धावले मात्र आपण तर त्या धमकावण्याची दखल सुध्दा घेत नाही आहोत, असे करू नका आमचे नुकसान होईल अशी मोदींनी आर्जवे करावी, रदबदली करावी अशी अपेक्षा तात्यांची अपेक्षा असेल तर तसे काहीही झालेले नाही. ट्रम्पतात्यांचा अगदी तीळपापड त्यातून होत असेल इतका इगो त्यांच्यात भरलेला आहे आणि त्यावर भर म्हणजे ते त्या पदावर जाऊन बसले आहेत- म्हणजे आणखी इगो. जे मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना भीक घालत नाहीत त्यांच्यापुढे तुमच्यासारखे लोक अगदी चिरकूट आहेत- खरं तर चिरकूटही नाहीत. त्यामुळे बोला किती बोलायचे ते. गेली ११ वर्षे तेच करत आहात. आणखी काही वर्षे करा. हाकानाका

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सरड्याची धाव ' टेलीप्रॉम्प्टर ' पर्यंत, अभ्यास दूरची गोष्ट. गप्प बसून राहण्याशिवाय पर्याय नाही. तोंड उघडले तर अज्ञानाचा ( अदान्याचा? ) पँडोरा बॉक्स उघडा होईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जे मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना भीक घालत नाहीत
=)) भ्क्तांना फेकाफेकीची उर्जा कुठून मिळते याचं कायम आश्चर्य वाटतं. गेली अकरा वर्षाच्या काळात दहा वेळेस अमेरिका भेटीचा आपलाच एक मोठा रेकॉर्ड असावा. परराष्ट्रीय धोरणात मैत्रीचे पर्व वगैरे. भले आपल्याला निमंत्रण दिलं नसेल शपथविधीचं. पण आपण गळ्यात पडणे, मिठ्या मारणे, अब की बार ट्रम्प की सरकार कोणतीही कसर सोडली नाही. आणि म्हणे भिक घालत नाही. चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हीहीही भाडीपातला आई, मी आणि मधला एक अजरामर सीन आठवला. . आई : काय चाललेय अनि? अनि: अग मी पबजी खेळतोय. ह्यात मारायचे असते एकमेकांना, जो शेवटी जिवंत राहतो त्याला डिनर मिळते. आई: मग, दाब ना बटन, कर काहीतरी.. अनि : अग, माझी स्ट्रॅटेजी आहे, मी किनई एका कोपर्‍यात शांत लपून झोपून जातो. सगळे एकमेकाशी लढतात अन मरुन जातात. मला काहीच करावं लागत नाही. आई: स्ट्रॅटेजी नाही, त्याला आळस म्हणतात, आळस. . . सध्या आळसाला आणि कर्तुत्वशुन्यतेलाच मास्टरस्ट्रोक म्हणतात बहुधा...

In reply to by अभ्या..

सध्या आळसाला आणि कर्तुत्वशुन्यतेलाच मास्टरस्ट्रोक म्हणतात बहुधा...
आणि ऐसीच्या खरडफळ्यावर तो सदस्य तिथे नसताना त्याच्याविषयी गॉसिप करण्याला काय म्हणतात रे अभ्या..? एकदम कर्तबगारीच की नाही? बादवे त्या टी शर्ट्सचे काय झाले?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ऐसीच्या खरडफळ्यावर तो सदस्य तिथे नसताना त्याच्याविषयी गॉसिप करण्याला काय म्हणतात रे अभ्या..? एकदम कर्तबगारीच की नाही? या की तिकडं. सांगतो काय म्हणतात ते. . बादवे त्या टी शर्ट्सचे काय झाले? तुमचं काय होतं काय त्यात? . आणि स्पश्ट सांगतो एकदाच. इथे ज्याच्यावर लिहिताय तेच लिहा. पर्सनल जायचे नाही. वैयक्तिक काय मिटवायचे फिटवायचे असेल तर बाहेर. जिथल्या तिथे. कुणी अडवले नाही तिथे.

In reply to by अभ्या..

पर्सनल जायचे नाही.
दहशतवाद करणे वाईट आहे-- इति ओसामा बिन लादेन
तुमचं काय होतं काय त्यात?
बरंच झालं असल्या माणसाच्या मागे लागावे लागले नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बरंच झालं असल्या माणसाच्या मागे लागावे लागले नाही. बरंच झालं माझंपण.

In reply to by अभ्या..

बरंच झालं माझंपण.
हे एकदा काही कारण नसताना माझ्यावर दोषारोप करायच्या आधी बोलायचे,.. म्हणजे ३१ जानेवारी २०१८ पूर्वी त्यानंतर नाही. abhya अभ्या या माणसाने माझ्याविरूध्द विनाकारण असले काही ऐसीच्या खरडफळ्यावर लिहिले होते. ते दोन दिवसात माझ्यापर्यंत आले. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हायला. बरोबर होतं की मग. . लिस्ट वाढवायला पाहिजे आता. आणि इथंच. . आणि मुख्य म्हणजे ते आयडीवरच आहे ना? पर्सनल कोण गेलं?

In reply to by अभ्या..

आणि अशा लै ग्रुपातले, व्हाटसापावरचे, फेस्बुकाचे स्क्रीनशॉटस आहेत माझ्याकडे. पण फुकटच्या माहीतीच्या भांडाराची मातब्बरी सांगत कण्हत बसायची सवय नाही. आठ वर्षाने मोट्ठे झालाच आहात. अजून व्हा.

In reply to by अभ्या..

या माणसामुळे मिपावरील अनेक चांगले सदस्य लिहिणे बंद झाले. एकेकाळी दर्जेदार असलेल्या मिपाची रया बरीच गेली त्यात या माणसाचा हात आहे हे मालकांना अनेकदा सांगूनही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. आता मिपाची अशी रया जावी अशी त्यांचीच तशी इच्छा असेल तर इतर सदस्य बापुडे काय करणार?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

या माणसामुळे मिपावरील अनेक चांगले सदस्य लिहिणे बंद झाले. माझ्यामुळे गेली ह्याची फक्त तीन पुराव्यासहीत उदाहरणे द्या प्लीज, तुम्ही सोडून (कारण तुम्ही आहात अजून) . एकेकाळी दर्जेदार असलेल्या मिपाची रया बरीच गेली. तुम्ही नव्हतात त्या एकेकाळी. . आता मिपाची अशी रया जावी अशी त्यांचीच तशी इच्छा असेल तर इतर सदस्य बापुडे काय करणार? अ‍ॅहॅ रे सहानूभूती.. अ‍ॅहॅ रे बापुडवाणेपणा. . भारीच हं

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुमच्या आणि श्रीगुरुजींच्या आणि एकजण आहे ..त्यांच्या भाजप अजेंडा आणि राजकारणी चिखलामुळे लोक यायचे बंद झाले.. मालकांनी किती वेळा वॉर्निंग दिली पण शेपूट वाकडेच.. शेजारी एक जण उडाला तेव्हा गप झाला.. स्वतःची घाण दुसऱ्याच्या दारात टाकू नका..

In reply to by कपिलमुनी

त्यांच्या भाजप अजेंडा आणि राजकारणी चिखलामुळे लोक यायचे बंद झाले.. मालकांनी किती वेळा वॉर्निंग दिली पण शेपूट वाकडेच.. शेजारी एक जण उडाला तेव्हा गप झाला..
बरं.
स्वतःची घाण दुसऱ्याच्या दारात टाकू नका..
मी काय करावे आणि नाही हे तुम्हाला कोणी विचारले आहे का? मग कशाला उगीच मधे पचकत आहात?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

दुसऱ्यांनी लिहिले की पचकण वगैरे.. आणि तुमचे नाव नसताना शेटजीचे उडते तीर घेऊन वैयक्तिक टीका करायला काय म्हणालं ? उपटणे ?

In reply to by कपिलमुनी

वॉव. त्याला बापुडवाणे म्हणतात म्हणे...

In reply to by कपिलमुनी

तुमचे नाव नसताना शेटजीचे उडते तीर घेऊन
मोदी (तुमच्या भाषेत शेटजी) भारताचे पंतप्रधान म्हणजे पब्लिक फिगर आहेत. अशा पब्लिक फिगरविषयीच्या चर्चेत कोणीही (समर्थक / विरोधक) सामील होऊ शकतो हा अगदी कॉमन सेन्स झाला. अशा पब्लिक फिगरविषयीच्या चर्चेत काही लिहिणे आणि मिपावरील एका सदस्याने दुसऱ्याला तू असं कर आणि तसे करू नको हे सांगणे एकच? वा वा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भ्क्तांना फेकाफेकीची उर्जा कुठून मिळते याचं कायम आश्चर्य वाटतं.
जिथून गु लामांना बूट चाटायची उर्जा मिळते तिथून नक्की नाही.
गेली अकरा वर्षाच्या काळात दहा वेळेस अमेरिका भेटीचा आपलाच एक मोठा रेकॉर्ड असावा.
मोर नाचत सुंदर असला तरी नाचताना त्याचा पार्श्वभाग उघडाच असतो. रेकॉर्ड वगैरे काही नाही. मनमोहन दहा वर्षात दहा वेळेला अमेरिकेला गेले होते.
भले आपल्याला निमंत्रण दिलं नसेल शपथविधीचं. पण आपण गळ्यात पडणे, मिठ्या मारणे, अब की बार ट्रम्प की सरकार कोणतीही कसर सोडली नाही. आणि म्हणे भिक घालत नाही.
तुम्हाला आणखी काही वर्षे असाच चडफडाट करत राहावा लागणार आहे. तो करत बसा.
चालू द्या.
सेम टू यू.

बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान त्याच्या राहत्या इमारतीचे रिडेव्हलपमेन्ट होणार असल्याने नवी इमारत पूर्ण होईपर्यंत भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. त्याने चार अपार्टमेंट भाड्याने घेतली असून दरमहा साडेचोवीस लाख भाडे तो भरणार आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywo… वर

In reply to by चंद्रसूर्यकुमार

वेडारे वेडा! पुण्यात सहकार नगर भागात २ बीएचके २० हजारात सहज मिळाला असत, ४ घेतले असते तर ८० हजार लागले असते जास्तीत जास्ती. २४ लाख घालवले. खिक्क!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पुण्यात सहकार नगर भागात २ बीएचके २० हजारात सहज मिळाला असत, ४ घेतले असते तर ८० हजार लागले असते जास्तीत जास्ती.
त्यापेक्षा सांगलीत विश्रामबागेत २ बीएचके १० हजारात मिळाला असता. जत किंवा कवठे महांकाळमध्ये आणखी स्वस्तात. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद किंवा माधळमुठीमध्ये त्याहूनही स्वस्तात. फक्त जाडरबोबलादमध्ये आमिर खान पाच वर्षे राहणार हे चित्रच डोळ्यासमोर उभे राहात नाही :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

खिक्क! ह. ह. पू. वा. तिकडे धुळ्यात तर २५ हजारात अख्खा बंगला भाड्याने मिळाला असता. वर फावल्या वेळात नकली दारू बनवणे, डांबरचोरी, हायवेला ट्रका अडवून लुटणे, गांजा हेरोइन मध्य प्रदेशातून आणून स्मगल करणे, गुजरातला दारू पुरवणे, गुटख्याचा काळाबाजार असले जोडधंदेही करता आले असते. बंगल्याचे भाडेही निघाले असते वर चार पैसे गाठीशी आले असते. पण हे कळेल तर तो आमिर खान कसला?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आप्ल्याला जाडर बब्लाड माहित आहे!! प्रभू आपण कोण आहात....वरच्या ऐसीच्या लिस्त मधील एक नाव आपले आहे असं दिसतंय. पण त्यातील प्रत्येकाशी माझा कधी ना कधी इथे वाद झालेला आहे. तरी हे कबूल करीतो, की आपल्या ज्ञानाने मी थक्क झालो आहे!! जाडर बबलाद हे माझ्या आठवणीतील सर्वात रम्य गाव आहे. शब्दशः वाळवंटातील ओअ‍ॅसिस....

In reply to by असंका

आप्ल्याला जाडर बब्लाड माहित आहे!!
अरे वा.
जाडर बबलाद हे माझ्या आठवणीतील सर्वात रम्य गाव आहे. शब्दशः वाळवंटातील ओअ‍ॅसिस....
मला त्या गावाचे नुसते नावच माहित आहे. अनेकदा वाटायचे की कधीतरी जाऊन ते गाव कसे आहे ते बघावे पण कधीच तिथे जायचा योग आला नाही. मी काही वर्षे सांगलीत राहायला होतो. तिथल्या स्थानिक पेपरांमधून सांगली (आणि काही प्रमाणात कोल्हापूर) जिल्ह्यातील गावांची एकेक नंबरी नावे कळली. जादर बोबलाद हे त्यातीलच एक. बाकीची येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, कवठे पिरान, तालुक्याचे ठिकाण कवठे महांकाळ, गैबी कुडुत्री, सेनापती कापशी वगैरे.
प्रभू आपण कोण आहात.
काय राव.. ओळखलं नाही का मला? मी सत्यम. बापूंचा थोरला. अधिक माहितीसाठी https://www.youtube.com/watch?v=eS8a8qor20I हा व्हिडिओ जरूर ऐका ही विनंती.

नवी मुंबईत कोपरखैरणे येथे एका १६ वर्षांच्या वृध्द कुत्र्याला काठीने अमानुष मारहाण करणार्‍याला तिकडच्या लोकांची बदडून काढले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/uno-reverse-man-beats-elderly… लोक कसे इतके निर्दय होतात समजत नाही. बरं झालं त्या माणसाला बदडून काढले गेले. तो माणूस समजा ८० वर्षांपर्यंत राहिला तर तेव्हाही त्याला आणखी एकदा बदडण्यात यावे असे फार वाटते कारण कुत्र्यांमधील १६ वर्षे हे वय हे साधारणपणे माणसांमध्ये ८० वर्षांच्या वृध्दाइतके असते.

Trump च्या धाकदपटशाला आज मोदीने उत्तर दिले आहे. "रशियाकडून तेल घेतल्यास दंड.... "वगैरे असमर्थनीय आहे. ( इंडिया टुडे चानेल.) १. भारत सरकार जरा नमतं घेण्याचं कारण मला वाटतं की कित्येक भारतीय अमेरिकेत बी१/२ वगैरे विजावर आहेत. आणखीही कारणं असू शकतील. कांग्रेसचे धोरण काय हेसुद्धा कळले पाहिजे. विरोधी पक्ष असले तरी ते भारतातच आहेत. २. भारतातील निवडणुकांसाठी अमेरिकेची आर्थिक मदत येत होती ती केव्हापासून ते माहीत नाही पण ती आता बंद आहे. ( ती कोणी बंद केली? भारताने की अमेरिकेने?) ३. गूगल आणि मेटा कंपन्यांना भारतात वार्षिक फी आकाराला ट्रंप भाग पाडेल का?

भारत नमत घेण्याचं कारण म्हणजे अमेरिकेला आपली जेव्हढी गरज आहे त्यापेक्षा आपल्याला त्यांची जास्त गरज आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे अमेरिकेची अडवणूक करायला काहीच नाही. चीन कडे rare earth आहेत तसा हुकमी एक्का आपल्याकडे नाही. आणि महत्वाचं म्हणजे ट्रम मूर्ख माणूस दिसतोय आणि त्याला प्रचंड इगो पण आहे. कसही असला तरी आहे अमेरिकेचा अध्यक्ष. चीन सोडून जवळ जवळ सगळे देश त्याच्यासमोर वाकत आहेत. आपण अजून तरी ताठरतेने उभे आहोत. बाकी मोदी ट्रम्पच्या वक्तव्याना भीक घालत नाही म्हणणे योग्य वाटत नाही. फक्त ट्रम्प सारखं समाज मध्यमावर व्यक्त होता येत नाही कारण आदीच येडा असलेला ट्रम्प जास्तच चेकळेल. Backdoor ला चर्चा नक्कीच चालू असणार. सध्याच सरकार नक्कीच मार्ग काढेल अशी आशा आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

Backdoor ला चर्चा नक्कीच चालू असणार.
त्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात २५ तारखेला येणार आहे ना? आपले शिष्टमंडळ तिथे जाणार नाही तर त्यांचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे- हा फरक मोठा आहे.
भारत नमत घेण्याचं कारण म्हणजे अमेरिकेला आपली जेव्हढी गरज आहे त्यापेक्षा आपल्याला त्यांची जास्त गरज आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे अमेरिकेची अडवणूक करायला काहीच नाही.
असे काही नाही. सगळ्या देशांना एकमेकांची गरज आहे आणि ते समजत नाही ते नेते मूर्ख आहेत.बाकी अडवणूक करायचेच म्हटले तर आपल्याकडेही बरेच काही आहे. एक तर सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की विविध जागतिक संघटना एकमेकांवर वचक ठेवायला वापरल्या जात आहेत. उदाहरणार्थ क्वाड ही संघटना चीनवर वचक ठेवायला तर ब्रिक्स ही संघटना अमेरिकेवर वचक ठेवायला. चीन आधीच खूप मोठा झाला आहे तो अमेरिकेला आणखी मोठा व्हायला नको असेल तर त्या खेळात अमेरिकेला आपली मदत लागेलच. आणि त्या प्रकारात भारतही मोठा व्हायला नको म्हणून अमेरिका पाकिस्तान, बांगलादेश या आपल्या शेजारी प्रदेशांमध्ये काड्या घालून आपल्याला त्रास देत आहे. अर्थात हे सगळे तर्क त्यामुळे याविषयी एकाला एक वाटेल तर दुसर्‍याला दुसरे. पण एकदम बिनतोड मुद्दा म्हणजे भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे. १३-१४ मे २०२५ रोजी म्हणजे ऑपरेशन सिंदूर तात्पुरते थांबून ३-४ दिवस झाले असताना गुरगावमध्ये ट्रम्प टॉवरमधील जवळपास ३०० फ्लॅट्स एकाच दिवसात बुक झाले होते. त्या सगळ्यांची मिळून किंमत होती ३००० कोटी+. भारतात जीवनमान उंचावत असल्याने प्रत्येक उत्पन्नाच्या ब्रॅकेटमध्ये कोट्यावधी लोक मिळतील. नुसते विद्यार्थीच म्हटले तर २०-२५ कोटी विद्यार्थी नक्कीच असतील. यापुढील काळात ऑनलाईन शि़क्षण वाढत जाणार आहे त्यामुळे ती खूप मोठी बाजारपेठ आहे. हेच इतर अनेक गोष्टींविषयी. त्यामुळे भारताला दूर लोटणे अमेरिकेलाच परवडणार नाही. तसेच भारतातून मोठ्या प्रमाणावर जेनेरीक औषधे अमेरिकेत निर्यात होतात. चॅटजीपीटी तो आकडा अमेरिकेतील एकूण जेनेरीक औषधांच्या ४०% म्हणत आहे. मग अमेरिकेची अडवणूक करण्यासारखे आपल्याकडे काहीच कसे नाही? मागे ट्रम्पतात्यांनीच मोदींना 'टफ नेगोशिएटर' म्हटले होते. आणि स्वतः तात्या मोठे बिझनेसमन असल्याने वेगवेगळी शेकडो-हजारो डील त्यांनी आतापर्यंत केली असतील हे नक्की. अशावेळेस थोडे गीव्ह अ‍ॅन्ड टेक होते हे तात्यांना कळत असूनही कळत नसल्यासारखे ते करत आहेत की काय समजत नाही. एक तर एकच नाही तर अनेक वेगवेगळी जाहीर वक्तव्ये देऊन तात्यांनी समजा मोदींना तडजोड करायची इच्छा असेल तरी तो मार्ग कठीण करून ठेवला आहे. त्याचे कारण आता मोदी तडजोड करायचे म्हणाले तरी मग मोदींनी मान तुकवली वगैरे गोष्टी बोलल्या जातील आणि राजकीय दृष्ट्या त्यांना ते परवडणार नाही. मी अमेरिकेतील वॉलमार्ट शेवटचे बघितले होते डिसेंबर २००७ मध्ये. तेव्हा अर्ध्याहून जास्त गोष्टी मेड इन चायना असायच्या. मेड इन अमेरिका गोष्टी शोधाव्या लागायच्या. आताची परिस्थिती काय हे माहित नाही पण त्या परिस्थितीत अमेरिकेच्या दृष्टीने काही सुधार झाला आहे असे वाटायला काही आधार आहे असे वाटत नाही. खुळ्यासारखे सगळ्या आयातींवर टॅरीफ लावून त्या गोष्टी आपल्याच नागरीकांसाठी तात्या महाग करत आहेत हे त्यांना समजत नाहीये का?गेल्या ४० वर्षात अमेरिकेतील मॅन्युफॅक्चरींग खूपच कमी झाले आहे. समजा मेक अमेरिका ग्रेट अगेन असे म्हणत टॅरीफ लावत सुटले आणि महाग झालेल्या मेड इन चायना आणि इतर वस्तूंना सब्स्टिट्यूट म्हणून मेड इन अमेरिका वस्तूच नसतील तर अमेरिकन लोकांनाच झक मारत त्याच आयात केलेल्या वस्तू महाग दराने खरेदी कराव्या लागणार आहेत. समजा अमेरिकेशी ट्रेड डील झाले तरी शेतीसंबंधीत (जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि दूधाचे पदार्थ) भारतात येऊ देणार नाही हे आपले धोरण झाले. तसेच तात्यांच्या सांगण्यावरून आपण रशियाकडून तेल घेणे बंद करणार नाही हे पण महत्वाचे धोरण आहे. हे तीन मुद्दे सोडले तर मग कोणत्या वस्तूवर किती टक्के टॅरीफ लावावा वगैरे मुद्द्यांवर चर्चा करायला काहीच हरकत नाही. तसेही टॅरीफ लावून आपल्याच लोकांसाठी आपण वस्तू महाग करत असतो. तसे व्हायला नको. त्यामुळे भारताने टॅरीफ कमी करावा अशी अमेरिकेची अपेक्षा असल्यास त्यात आपल्या दृष्टीनेही फार काही गैर आहे असे वाटत नाही. पण त्या बरोबरच रशियन तेलाचा वेगळाच मुद्दा जोडून आणि त्या मुद्दावर चारचार वेळा भर देऊन तात्यांनी ट्रेड डीलमध्ये प्रगती व्हायची शक्यता खूपच कमी केली आहे. मोदी स्वतःची प्रतिमा एक कणखर नेता म्हणून लोकांपुढे यावी यासाठी प्रयत्न करत असतील तर (ते खरोखरच कणखर नेता आहेत की नाही हा या चर्चेत बाह्य मुद्दा झाला) आता ट्रेड डीलच्या बदल्यात रशियन तेल घेणे बंद करणे मोदींना कसे काय परवडणार आहे? एकूणच अती बडबड करून आपल्यालाच हवे ते व्हायच्या मार्गात तात्यांनी अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. एका अर्थी तात्या हे अमेरिकेचे संजय राऊत आहेत असे बर्‍याच जणांनी सोशल मिडियावर म्हटलेले बघितले ती उपमा अगदी योग्य आहे.

ट्रम्पतात्या भारताकडून रशियन तेलाच्या खरेदीवर फुत्कार सोडत आहेत तर मग आपण (म्हणजे अमेरिका) रशियाकडून रसायने आणि खते आयात करतो त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे असा प्रश्न ए.एन.आय च्या एका पत्रकाराने त्यांना विचारल्यावर त्यांचे उत्तर होते- "याविषयी मला काहीही माहित नाही. मला तपासून बघावे लागेल". https://x.com/undefined/status/1952877566047449426?ref_src=twsrc%5Etfw%… हा माणूस दिवसेंदिवस अधिकाधिक हास्यास्पद आणि तितकाच धोकादायकही होत चालला आहे. इतके दिवस तात्यांचा वेडाचार अमेरिकेपुरता मर्यादित होता त्यामुळे माझ्यासारख्यांचे फारसे बिघडत नव्हते. पहिल्या टर्ममध्ये तात्या आपल्यासाठी बर्‍यापैकी चांगले अध्यक्ष होते. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत डोकलाम आणि गलवान हे दोन मोठे संघर्ष चीनविरोधात झाले तरी त्यावेळी तात्यांनी एक चकार शब्द आपल्याविरोधात उच्चारला नव्हता. तसेच पहिल्या टर्ममध्ये अमेरिकेबाहेर फारसे नाक त्यांनी खुपसलेही नव्हते. त्यामुळे त्यांची दुसरी टर्मही आपल्याला अनुकूल असेल असे वाटून अमेरिकेत खुळाचार चालू असला तरी आपल्याला अनुकूल असतील तर मग आपले काय बिघडते असे म्हणत त्यांचे समर्थनही करत होतो. पण आता हा माणूस आपल्या देशालाच नाही तर पूर्ण जगाला त्रासदायक ठरायला लागला आहे. मध्यंतरी रशियाविरूध्द अणुयुध्दाविषयी पण अचाट वक्तव्य त्यांनी केले होते. अणुरेणूंमध्ये प्रचंड इगो भरलेल्या या इसमाला अमेरिकेचे अध्यक्ष या जगासाठी सगळ्यात महत्वाच्या पदावर ठेवणे धोकादायक ठरेल. हा मनुष्य लवकरात लवकर इम्पिच व्हावा असे वाटते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपले परराष्ट्र धोरण माती खाते आहे, तात्याला दोष कशाला द्या? भुजबल बुवा परराष्ट्र धोरण काय आणि कसे हवे ते जरा स्पष्टपणे सांगता काय?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परराष्ट्र धोरण काय आणि कसे हवे ते जरा स्पष्टपणे सांगता काय? काँग्रेस चा आदर्श म्हणजे नक्की काय ते सांगा कि रेनकोट घालून अंघोळ कशी करायची कि संसदेवर हल्ला झाला तेंव्हा अतिकडक महाभयंकर आणि महाकड्क अतिभयंकर खलिते पाठवायचे आणि अमेरिकेकडे रडत रडत जायचं? एकंदर राहुल गांधींचा आदर्श घ्यायचा तर मग दर निवडणुकीनंतर बँकॉक किंवा इटलीला जायचं आणि भारतावर हल्ला झाला कि चीन बरोबर गुप्त समझोता करायचा? नक्की कसं ते सांगा.

In reply to by सुबोध खरे

संसदेवर हल्ला झाला तेंव्हा अतिकडक महाभयंकर आणि महाकड्क अतिभयंकर खलिते पाठवायचे गुडघे टेकून अतिरेकी सोडू नये किंवा गुजरातवर ड्रोनहल्ले झाले म्हणून गांगरून जाऊन सिझफायर करू नये. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गुजरातवर ड्रोनहल्ले झाले म्हणून गांगरून जाऊन सिझफायर करू नये भुजबळ बुवा याला काही पुरावा? कि आपला नेहमी सारखं च फुक्या मारणं आणि विचार न करता कळफलक बडवणं?

In reply to by सुबोध खरे

गुजरातवर ड्रोन हल्ले झाले ह्याचाही पुरावा मीच आणून द्यायचा व्हय? मग तुमच्या हातातल्या लाखाच्या आयफोनचा काय उपयोग?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गुजरातवर ड्रोन हल्ले झाले, ड्रोन हल्ले सीमेवरच्या सर्वच राज्यात झाले पण त्यामुळे सीझ फायर झालं ह्याचा काही पुरावा आहे ? कि असं च आपलं (नेहमीसारखं विचार न करता) कळफलक बडवणं? बाकी आकाश क्षेपणास्त्रे, आकाशतीर प्रणाली, बोफोर्स एल ७० तोफा, तंगूश्का आणि त्याचा वापर याबद्दल एकदा कळफलक बडवून गुगलून पहा. (S ४०० चा ड्रोन साठी वापर झालेला नाही)

In reply to by सुबोध खरे

ड्रोन हल्ले सीमेवरच्या सर्वच राज्यात झाले पण त्यामुळे सीझ फायर झालं ह्याचा काही पुरावा आहे ? जे लोक विमान पाडले गेले हे लपवून ठेवतात, अतिरेक्यांचे खोटे फोटो दाखवतात, अतिरेकी कुठून आले कुठे गेले हे देशापासून लपवून ठेवतात. पुलवामावेळी rdx कुठून आले ते लपवून ठेवतात, सत्यपाल मलिक त्यावर काही बोलू लागले तर इडी सोडून त्याना त्रास देतात ते लोक सिझफायरचे कारण देशाला सांगतील असे तुम्हाला वाटते? इतके भोळे तुम्ही कधीपासून झालात?

In reply to by सुबोध खरे

नाही नाही .. असे काही झालेच नाही. सगळे खोटे बोलत आहेत. सगळे पुरावे खोटे आहेत. आमचे राहुल म्हणाले ना .. सगले खोटे आहे .. मग सगळे सगळे खोटे आहे. बाकी मोदी फट्टूस आहेत. पाकीस्तान ने ड्रोन पाठवले तेव्हा सगळे भयभीत झाले. बंकरात लपुन बसले. म्हणुन सिझ्फायर झाले. बाकी आकाश, आकाशतीर, बोफोर्स, तंगूश्का हे सब झुट है. (कशाला त्यांच्या नादी लागता. "व्हिलेज ईडीयट" काय असते ते माहीत आहे तुम्हाला. उगा आपले श्रम वाया घालवु नका)

In reply to by सुक्या

मला वाटलं भुजबळ नव्या अवतारात सुधारले असतील पण कसलं काय? जुनी दारू नव्या वेष्टणासहितच आहे. खांद्याच्या वरच्या अवयवांचा वापरच करायचा नाही असं ठरवलंच असेल तर कोण काय करू शकतं? सोडूनच द्यायचं आता

In reply to by सुबोध खरे

तुमच्या दृष्टीने सुधारणेचा अर्थ काय? अंधभक्ती करणे म्हणजे सुधारणा? आणी वस्तुस्थिती दाखवून सरकारवर टीका करणे म्हणजे असुधारणा? खांद्याच्या वरच्या अवयवांचा वापरच करायचा नाही असं ठरवलंच असेल तर कोण काय करू शकतं? मिपावरील महान डॉक्टर हत्ती धाग्यावर काय म्हणतात पहा. सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं. :- :- डॉक्टर सुबोध खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत हा आपला प्रतिसाद कुणाबद्दल आहे आणि त्याचा अर्थ काय आहे?

ट्रम्प तात्याला आपण ज्या पद्धतीने पायघड्या घालत होतो ते आता तरी कपाळावर हात मारुन घेणेच होते. अर्थात सध्याच्या सरकारला तसे परराष्ट्रीय धोरण नावाची काही व्यवस्थाच उरली नाही असे वाटायला लागले आहे. जगातला आता एखादा तरी देश उरला असेल की नाही जिथे आपण गेलो नाही. पण एकही देश वेळ पडते तेव्हा मदतीला आला नाही, हेही आपण पाहिलं. ट्र्म्प माय फ्रांड ने पुन्हा काल चोवीस तासात भारतावरील आयात शुल्कात वाढविण्याची धमकी दिली. आपण नेहमीप्रमाणे गुळमीळीत उत्तर दिलं. अमेरिकेची आयातशुल्कवाढ ही अन्यायकारक असून अमेरिका आणि युरोपीय महासंघ रशियाशी व्यापार करीत असल्याकडे आपण निर्देश केले. याला म्हणतात मुहतोड जवाब ( अहाहा, वावा, क्या बात है ) रशियाने मात्र, सार्वभौम देशांना त्यांच्या हितानुसार कोणासोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्य करायचे याची निवड करण्याचा अधिकार आहे अशा शब्दात रशियाने समर्थन केले. माय फ्रांड डोलांडच्या नादात आपण रशियाशी दूर दूर आणि अधिक दूर जात होतो. अर्थात धोरण परराष्ट्रीय धोरणाची वाताहत होते असे वाटत असतांना त्यात अनपेक्षित तसे काही वाटत नाही. जम्मु-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं काल निधन झालं. निष्ठावान राजकारणी ते सत्ताधा-यांवरच टीकाकार अशी त्यांची भूमिका राहिली. पुलवामा हल्ला सरकारी उदासीनतेचा परिणाम होता अशी टीका त्यांनी केली होती. शेतकरी आंदोलनास उघड पाठींबा दिला आणि सद्य सरकारवर टीका केली. गोव्यातील राज्यसरकारवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. समाजवादी विचारसरणीचे विद्यार्थी, पण पुढे भारतीय क्रांती दल, कॉंग्रेस, जनता दल, भाजप असा त्यांचा प्रवास राहिला. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचही काल निधन झालं. तीन वेळा मुख्यमंत्री आठवेळा खासदार राहिले. आदिवासींच्या हक्कासाठी लढ्णारा नेता ही त्यांची ओळख होती. सत्यपाल मलिक आणि शिबू सोरेने यांना समस्त मिपाकरांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्या आधीच्या सरकारांनी रशियाशी मैत्री ठेऊनही अमेरिकेला सांभाळले होते, आता मुळात सरकारच अश्या लोकांच्या हातात गेले आहे की ज्यांना लोकशाही, परराष्ट्र धोरण अंधश्रद्धा वाटतात. उगाच नाही “गोबरयुग” ह्या शब्दाचा उदय झाला आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रशियाने मात्र, सार्वभौम देशांना त्यांच्या हितानुसार कोणासोबत व्यापार आणि आर्थिक सहकार्य करायचे याची निवड करण्याचा अधिकार आहे अशा शब्दात रशियाने समर्थन केले. एक्झॅक्टली हे आपल्या सरकारने अमेरिकेला सांगायला हवे होते. अमेरिकेने रशियाकडून काहीही आयात करो वा न करो, आमच्यात लुडबुड करू नका असे ठणकावून सांगायला हवे होते. अमेरिका मोठ्या प्रमाणात व्यापार तूट असल्याचा कांगावा करत आहे त्याला भारत प्रत्युत्तर का देत नाही हेच समजत नाही. आपला देश इतका घाबरट कधीच नव्हता.

In reply to by आग्या१९९०

आपला देश इतका घाबरट कधीच नव्हता. +१ कारण तेव्हा देशप्रेमी लोक सत्तेत होते अदानीप्रेमी नाही.