✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Sat, 03/01/2025 - 22:52  ·  लेख
लेख
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/ https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
65467 वाचन

💬 प्रतिसाद (548)

प्रतिक्रिया

अबा तुम्ही फक्त एका प्रश्नाचे

कॉमी
Tue, 03/04/2025 - 00:56 नवीन
अबा तुम्ही फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या. युक्रेनला नाटो मध्ये जावे असे का वाटते? नाटो चे कार्ड दिसायला छान आहे हे कारण आहे की आणि काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

युक्रेनला नाही. झेलेनस्कीला

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/04/2025 - 00:57 नवीन
युक्रेनला नाही. झेलेनस्कीला वाटते, ते का वाटते त्याचे त्यालाच माहीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

असे म्हणून कसे भागेल? तुम्ही

कॉमी
Tue, 03/04/2025 - 01:52 नवीन
असे म्हणून कसे भागेल? तुम्ही गुणोत्तराचा अर्धा भाग बघून उत्तर सुटले म्हणताहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही सांगा मग उरलेला अर्धा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/04/2025 - 08:18 नवीन
तुम्ही सांगा मग उरलेला अर्धा भाग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

अबा,

रामचंद्र
Tue, 03/04/2025 - 22:27 नवीन
अबा, किमान अंगकाठी आणि तोंडावळा या बाबतीत तुमच्यात आणि त्या झेलेन्स्कीत भलतंच साम्य आहे हे तुमच्या लक्षात आलंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पहिली विकेट गेली. हा फलंदाज

श्रीगुरुजी
Tue, 03/04/2025 - 12:50 नवीन
पहिली विकेट गेली. हा फलंदाज बाद होऊ नये यासाठी दोन्ही बाजूचे खेळाडू, पंच, रेफ्री, दोन्ही बाजूचे कर्णधार वगैरेंनी आटोकाट प्रयत्न करूनही शेवटी विकेट गेलीच.
  • Log in or register to post comments

जरब बसेल अशी कारवाई

रामचंद्र
Tue, 03/04/2025 - 13:09 नवीन
जरब बसेल अशी कारवाई 'आश्रयदात्यां'वर होण्याची शक्यता शून्य आहे. लोकक्षोभाचा स्फोट होण्याची वेळ येईपर्यंत प्रकरण लांबवायचं आणि मग थातुरमातुर कारवाई केल्यासारखं करून प्रकरण दडपून टाकायचं यात विद्यमान राज्यकर्ते तरबेज आहेत. मात्र या निमित्ताने या विषवल्लीची सर्वच पाळेमुळे खणून काढली गेली तर उत्तमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

युक्रेन

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/04/2025 - 12:58 नवीन
युक्रेनची 'नेटो' सभासद होण्याची ईच्छा १९९४ पासुनची आहे. सगळी माहिती https://en.wikipedia.org/wiki/Revolution_of_Dignity आहे. २०१४ पासुन, रशियाने युद्ध चालु केल्यापासुन युक्रेन धुमसतो आहे.तत्कालिन अध्यक्ष यनुकोव्हिक हे युक्रेनने रशियाच्या गटात सामिल व्हावे पण युरोपियन युनियनबरोबर मुक्त व्यापार न करण्याच्या मताचे होते. त्याविरोधात जोरदार आंदोलने झाली आणि त्यांना पायउतार व्हावे लागले. युक्रेनच्या नागरिकांमध्ये रशियाबद्दल कमालीची चीड होती आणी आहे. राजकीय हस्त़क्षेप, दमनतंत्र आणि दुसर्या देशातील पुढार्याना पैसे खायला घालुन व्यवस्था खिळ्खिळी करणे हे रशियाचे उद्योग आहेत. "झिलिन्स्की मूर्ख लेकाचा, काहीच कळत नाही त्याला' असे म्हणणे म्हणजे आपला राजकीय बुद्द्ध्यांक ट्रम्पएवढाच आहे असे मान्य करण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

माईडे, युद्ध सुरू करण्याआधी

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/04/2025 - 14:32 नवीन
माईडे, युद्ध सुरू करण्याआधी मुत्सेड्डेगिरी वगैरे काही पायऱ्या असतात, कुठलाही देश शेवटच्या पायरीतच युद्ध सुरू करतो, युक्रेन रशियाच्या गोटात जावो अथवा अमेरिकेच्या अथवा तटस्थ राहो, सर्वात महत्त्वाचे आहे युक्रेनच्या लोकांची सुरक्षितता. रशिया हा काही पुचाट देश नाही, आपल्या शेजाऱ्याशी भांडण करताना आपल्या मागे कुणीतरी ताकदवान देश उभा आहे का हे तरी त्या मूर्ख झेलेनस्कीला कळायला नको? दिला देश ढकलून रशियापुढे! आता रशिया साधं चोपणार आहे का? आजूबाजूचे बेलारूस वगैरे देश मूर्ख आहेत का? रशियन पंखाखाली गेलेले? आणी इतके करून मिळवले काय झेलेनस्कीने तर 20 टक्के भूभाग गेला नी लाखो लोक स्थलांतरित झाले हजारो मेले, ह्यामुळे झेलेनस्की "मूर्ख लेकाचाच " आहे. तात्या जे सांगताहेत तेच युक्रेनच्या हिताचे आहे, युद्ध थांबवणे, तात्या सगळ्यांसमोर राग राग करतात पण आतून मनाने फार चांगले आहेत, सिनेट सदस्यांनी हे समजून घ्यावे व तात्यांविरुद्ध उगाच काहीतरी महाभियोग वगैरे आणू नये. आणी आपण तात्यांच्या बुध्यांक हि काढू नये, तात्यांनी उगाच का दोनवेळा निवडणूक जिंकली? कमळाबाई हॅरिसला जुमानले नाही की हिलरी मावशीला शरन गेले नाही, ते हि प्रामाणिकपणे लढून आपल्यासारखे नाही ईडी सीबीआय विरोधकांवर सोडले, की पक्षात या घोटाळे माफ करतो धोरण राबवले, ना चार दोन गद्दार हाताशी धरून पक्ष फोडले ना निवडणूक आयोगाचा गैरवप करून ईव्हीएम हाताळून राज्य जिंकले, तात्यांनी जे काही केले त प्रामाणिकपणे नी समोर! त्यामुळे तात्यांचा बुध्यांक वगैरे काढू नका. तात्या इस लब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

७००००

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/04/2025 - 21:41 नवीन
अजूनपर्यण्त ७०,००० रशियन सैनिक युक्रेनने ढगात पाठवले आहेत. युक्रेनचेही त्याहुन अधिक म्रुत्युमुखी पडले आहेत हे नक्की. पण हे असेच चालु ठेवले तर रशियाचेही नुकसान आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माईडे किती भोळी गं तू? ज्या

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/04/2025 - 21:47 नवीन
माईडे किती भोळी गं तू? ज्या देशाने दुसऱ्या महायुद्धात २.५ कोटी जनता नी ८७ लाख सैनिक गमावले त्या देशाला ७० हजार सैनिकांनी फरक पडणार आहे का? हे काय नुकसान म्हणायचे का? नाटो बाजूला येत असेल तर रशियाने शक्य ती ताकद लावून हा प्रयत्न हाणून पडायला हवा हे एक देश म्हणून रशियाचे कर्तव्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

महाराष्ट्राच्या इतिहासात

श्रीगुरुजी
Tue, 03/04/2025 - 13:47 नवीन
महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राला लाभलेला सर्वोत्तम गृहमंत्री म्हणजे देफ. त्यांचं नुसतं नाव काढलं तरी गुन्हेगार थरथर कापतात. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्र गुन्हेगारमुक्त झाला आहे. एक हजार गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकाही गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई होऊन देणार नाही व एकाही निरपराध्याला न्याय मिळून देणार नाही अशी त्यांनी राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेतली आहे व त्या शपथेचे ते काटेकोर पालन करतात.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/04/2025 - 14:09 नवीन
+१ युपी बिहारला लाजवेल अश्या प्रमाणावर महाराष्ट्रात गुन्हेगारी सुरु झालीय , परंतुएक गुन्हेगाराचा आका असतो जो सेटिंग लावून गुन्हेगाराला वाचवतो, त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नाहीये, खिन्न मर्डर तर नित्याचेच झालेत, गुन्हेगार तर "coming to yerwada" असं स्टेटस ठेऊन मुडदे पाडत आहेत, एकंदरीत महाराष्ट्र चुकीच्या हातात गेलाय एवढं मात्र निश्चित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बदल होतोय, पण हळूहळू

स्वधर्म
Tue, 03/04/2025 - 15:48 नवीन
एका तरी कट्टर भाजप समर्थकाला आता त्यांचे राज्यातील मुख्यमंत्री व भाजपचे वजनदार नेते हे जनतेच्या अहिताचे निर्णय घेत आहेत, हे लक्षात आले शेवटी! लवकरच महानेतेही असेच करतात (आठवा: ब्रीजभूषण सिंह), हे समजू लागेल ही आशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आता संबंधित महान व्यक्तीचं

रामचंद्र
Tue, 03/04/2025 - 15:59 नवीन
आता संबंधित महान व्यक्तीचं पक्षात घेऊन पुनर्वसन का नुसतंच पुनर्वसन होणार, एवढीच उत्सुकता आहे. अन्यायग्रस्त मृत व्यक्तीला खराखुरा न्याय मिळणार नाही याची खात्रीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

देशालाही उत्तम गृहमंत्री

आग्या१९९०
Tue, 03/04/2025 - 14:43 नवीन
देशालाही उत्तम गृहमंत्री लाभलाय. मणिपूर प्रकरण हे उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments

ज्या ज्या राज्यात डबल इंजिन

आग्या१९९०
Tue, 03/04/2025 - 14:46 नवीन
ज्या ज्या राज्यात डबल इंजिन सरकार आहे तिथे तर रामराज्यच अवतरले आहे.
  • Log in or register to post comments

यूक्रेन

दीपक११७७
Tue, 03/04/2025 - 16:30 नवीन
झेलेनस्की ने जर युद्धच्या आधीच अमेरिके सोबत खनिज उत्खनन करण्यासाठीचा करार केला असता तर त्याला देशा करिता हवे असलेले संरक्षण दहा-पंधरा वर्ष आपसुकच मिळाले असते सोबतच रॉयल्टी देखील आणि जीव आणि संपत्तीचा नाश टाळता आला असता.
  • Log in or register to post comments

युद्धामुळे युक्रेनची

आग्या१९९०
Tue, 03/04/2025 - 17:16 नवीन
युद्धामुळे युक्रेनची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, त्यामुळेच रशिया आणि अमेरिका घायकुतीला आले आहेत. युद्ध रशियाने सुरू केले आहे त्यानेच थांबवले पाहिजे. ट्रम्पने पुतीनवर दबाव आणायला हवा,परंतु भिकारडा खनिजांसाठी झेलेंस्कीला दमदाटी करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७

२०१४

दीपक११७७
Tue, 03/04/2025 - 17:53 नवीन
क्रिमिया घेतल्या नंतर २०१४ पासून युक्रेनच्या थिंक टँक ने यावर विचार करायला हवा होता ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

रशिया-युक्रेन

चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/04/2025 - 18:34 नवीन
अमेरिकेने १९९४ मध्ये करार करून युक्रेनला परकीय आक्रमणापासून संरक्षणाची हमी दिली होती. त्याचे काय झाले? तो करार असताना आणखी नव्याने करार करून संरक्षणाची हमी का मिळवायला हवी होती? २०१४ मध्ये रशियन वंशाच्या यानुकोविच या अध्यक्षाला युक्रेनच्या लोकांनी ऑरेंज रिव्होल्युशन करून पळवून लावले तेव्हा रशियाने युक्रेनचा क्रायमिया हा भाग गिळंकृत केला होता. तसा क्रायमिया एकेकाळी रशियाचाच भाग होता आणि १९५४ मध्ये निकिता ख्रुश्चोव्ह अध्यक्ष असताना तो युक्रेनला दिला गेला होता. काहीही असले तरी २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने क्रायमिया हा युक्रेनचाच भाग होता. मग तो भाग रशियाने गिळंकृत केला हा खरं तर युक्रेनच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता. मग १९९४ च्या कराराप्रमाणे अमेरिकेने युक्रेनचे संरक्षण करायला हवे होते ना? पण शांततेचे नोबेल जिंकलेले ओबामा बघत बसले आणि अमेरिकेने त्या बाबतीत काहीही केले नाही. अमेरिकेची दादागिरी इराक, अफगाणिस्तान, लिबिया, ग्रेनाडा वगैरे अमेरिकेच्या अरेला कारे करू न शकणार्‍या देशांविरोधातच असते. समोर पुतीन हा माथेफिरू बसलेला असल्याने क्रायमिया प्रकरणी हस्तक्षेप केला असता तर पुतीनने थेट तिसरे महायुध्दच चालू केले असते म्हणून अमेरिका गप्प बसली. तेव्हाच युक्रेनच्या नेत्यांना अमेरिकेवर विसंबून राहण्यात अर्थ नाही हे समजायला हवे होते. तरीही युक्रेनला नाटोमध्ये सामील व्हायचे होते आणि त्यासाठी झेलेन्स्की प्रयत्न करत होते. आपण रशियाला अंगावर घेऊ शकणार नाही हे समोर दिसत असताना आणि ज्या अमेरिकेवर अवलंबून राहून सगळे चालू होते त्या अमेरिकेने तर आपल्याला वार्‍यावर सोडले हे समोर दिसत असताना परत नाटोमध्ये सामील होणे आणि त्याच अमेरिकेच्या जवळ जाणे ही झेलेन्स्कींची चूक नव्हती का? १९९९ मध्ये पोलंड, झेक रिपब्लिक आणि हंगेरी नाटोमध्ये सामील झाले, २००४ मध्ये इस्टोनिया, बल्गेरीया, लाटव्हिया, लिथुआनिया, रोमानिया वगैरे देश नाटोमध्ये सामील झाले, २००९ मध्ये अल्बेनिया आणि क्रोएशिया सामील झाले त्या प्रत्येक वेळेस रशिया कुरकुरला होता कारण नाटोने पूर्वेकडे हातपाय पसरले होते ते रशियाला मान्य नव्हते. पण त्या वेळेस त्याविषयी काही कडक कारवाई करण्याच्या स्थितीत रशिया नव्हता. तसेच इस्टोनिया आणि लाटव्हियाचा अपवाद वगळता त्यापैकी इतर देशांची रशियाबरोबर सीमा नव्हती. युक्रेनची ती स्थिती नव्हती. आणि बाल्टीक देश नाटोमध्ये सामील झाले होते २००४ मध्ये जेव्हा रशिया नुसता कुरकुर करू शकत होता पण सैनिकी कारवाई करायला तितक्या प्रमाणात समर्थ नव्हता. पण झेलेन्स्की महाशय ते २०२१-२२ मध्ये करू पाहत होते- जेव्हा रशिया अधिक समर्थ होता. आणि त्यात युक्रेनची रशियाबरोबर सीमा होती. अशा परिस्थितीत आपण रशियाला अंगावर घेऊ शकणार नाही हे माहित असतानाही परत नाटोमध्ये जाणे ही चूक नव्हती का? एखाद्या सिंहाला दगड मारल्याप्रमाणे ते झाले. आणि तो सिंह अंगावर आल्यास ज्या अमेरिकेवर विसंबून राहिले होते त्या अमेरिकेनेच त्यांना दिलेल्या संरक्षणाच्या हमीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. असे असताना आपल्याला कितपत झेपत आहे ते न बघताच झेलेन्स्की महाशय सगळ्या गोष्टी करत होते? त्यात आणखी गुंतागुंत म्हणजे युक्रेनच्या पूर्व भागात रशियन वंशाच्या लोकांची बहुसंख्या होती. पूर्वेकडच्या बंडखोरांना रशिया मदत करत होता आणि त्या डोकेदुखीला युक्रेनला यशस्वीपणे तोंड देता येत होते का? तात्पर्य हे की कोणतीच गोष्ट अनुकूल होत नसताना आपण जे काही करत आहोत त्याचे परिणाम काय होतील त्याचा विचार न करता झेलेन्स्की नाटोमध्ये जाऊ बघत होते. २०२२ मध्ये रशियाने हल्लाच केल्यानंतर परत एकदा बायडन आजोबा ओबामांप्रमाणे पुतीनला घाबरले आणि नुसती शस्त्रे आणि इतर मदत युक्रेनला करत राहिले पण स्वतः युध्दात पडले नाहीत. १९९४ ची ती संरक्षणाची हमी परत एकदा कचर्‍याच्या टोपलीत गेली. आता तरी अधिक नुकसान टाळायला आता तरी झेलेन्स्की निमूटपणे आम्हाला नाटोत जायचे नाही असे म्हणून युध्द थांबवायचा प्रयत्न करतील की नाही? तर ते नाही. ३ वर्षे युध्द सुरूच आहे. ते कोणाच्या जोरावर? तर अमेरिकेने आणि युरोपने दिलेल्या मदतीवर. आम्ही दिलेल्या मदतीचे नक्की काय झाले हा प्रश्न बायडन आजोबांनी विचारला नसेल पण ट्रम्पतात्यांनी विचारला. झेलेन्स्की महाशयांना फ्लॉरीडात आलिशान बंगला घ्यायचा होता ना? पण ते मिडियात आल्याने बहुदा तो बेत त्यांनी टाळला. आपला देश युध्दात आणि संकटात सापडलेला असताना देशाचा अध्यक्ष परदेशात आलिशान बंगले घेतो? ते पैसे कुठून आले? की अमेरिकेने दिलेल्या मदतीतूनच त्यांना तो बंगला घ्यायचा होता? म्हणजेच अमेरिकेकडून मदत घ्यायची आणि त्यातील निदान काही भाग स्वतः मजा करायला वापरायचा बेत होता का? आणि त्या मदतीचा ओघ पुढेही सुरूच राहावा म्हणून युध्दही सुरू ठेवायचे आहे? तात्यांनी ज्या पध्दतीने झेलेन्स्कींना वागणूक दिली किंवा आपल्याच देशाच्या माजी अध्यक्षांना 'दॅट स्टुपिड प्रेसिडेंट' असे जाहीरपणे म्हटले हे चुकीचेच आहे- त्याचे समर्थन करता येणार नाही. पण अमेरिकेचे पैसे घेऊन युध्द सुरूच ठेवण्यात झेलेन्स्कींचे हितसंबंध गुंतले आहेत का असे तात्यांना वाटले असेल तर त्यात त्यांचे काही चुकले असे वाटत नाही. सोव्हिएट युनियनच्या काळात रशियाने पूर्व युरोपात दमनशाही चालवली होती त्यामुळे ते देश रशियाच्या बाजूचे असणे अशक्य. काहीही असले तरी नाटो आपल्या शेजारी येणे पुतीनकाकांनाही मान्य नव्हते. असे असेल? १९६२ मध्ये क्युबात रशियन अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे आल्यावर जॉन केनेडींनी रशियाला अणुयुध्द सुरू करू ही धमकी दिली होती. ते का? कारण आपल्या शेजारी रशियाची क्षेपणास्त्रे येणे अमेरिकेला मान्य नव्हते. तसे असेल तर आपल्या शेजारी नाटो येणे हे रशियाला मान्य नसेल तर त्यात रशियाचे काय चुकले? झेलेन्स्की महाशय मात्र फुकाच्या अमेरिकेच्या हमीवर अवलंबून राहिले आणि त्यात युक्रेनच्या सामान्य लोकांना मात्र हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. आणि त्यापुढे जाऊन युध्दाच्या नावावर इतर देशांकडून मदत उकळून स्वतः बंगले घेत झेलेन्स्कींना फिरत राहायचे आहे का? असल्यांना अजिबात मदत द्यायची नाही असे तात्यांना वाटले तर त्यात त्यांचे काही चुकले असे वाटत नाही. बाकी झेलेन्स्की बाणेदार वगैरे अनेकांना वाटतो, अलीकडे वाटायला लागला आहे. मला तरी तो सर्वात वाईट बाजूला पाताळयंत्री आणि सगळ्यात चांगल्या बाजूला भाबडा वाटतो. पाताळयंत्री या कारणाने की इतर देशांकडून युध्दाच्या नावावर मदत घ्यायची आणि त्या कारणाने युध्द चालूच ठेवायचे असे त्याला वाटत असेल तर. भाबडा या कारणाने की २०१४ मध्ये अमेरिकेने काहीही कारवाई रशियाविरोधात केली नाही तरी अमेरिका आपल्या मदतीला येईल आणि सैन्य पाठवेल ही अपेक्षा ठेऊन असेल तर. आता तात्या युक्रेनला मदत देणार नाहीत आणि ते घोंगडे युरोपियन देशांच्या गळ्यात घालतील. तसेही नाटोच्या नावावर अमेरिका इतकी दशके युरोपसाठी खर्च करत आलीच आहे. आता झेलेन्स्कींचा पुळका असेल तर करू दे युरोपिअन देशांना मदत. होऊ दे खर्च. तसेही युरोपिअन देशांमध्ये भळभळती हृदये असलेले पुष्कळ नेते आहेत. तात्या राहतील नामानिराळे. या सगळ्या भानगडीत युक्रेनच्या सामान्य लोकांना मात्र त्रास होत आहे त्याचे वाईट वाटते. राहता राहिला प्रश्न भारताचा. बायडन अध्यक्ष असताना अमेरिकेची अपेक्षा होती की भारताने त्या प्रकरणी पाश्चिमात्य देशांची बाजू घ्यावी आणि रशियाची साथ सोडावी. अरे वा रे वा. इतकी वर्षे अमेरिकेची पाकिस्तानशी चुंबाचुंबी चालूच होती ना? तेव्हा आपण काय कमी वेळा अमेरिकेकडे तक्रार केली होती का? गेल्या काही वर्षात अमेरिकेचे भारताशी संबंध सुधारले तरी पाकिस्तानला सोडायला अमेरिका तयार नाही. तसे असेल तर आम्ही पण आमचा जुना मित्र रशियाला का सोडावे? शीतयुध्द काळात रशियाने आपल्यासाठी सुरक्षा परीषदेत सहा वेळा व्हेटो वापरला होता. अशा मित्राला आम्ही का सोडावे? आणि ते पण कोणासाठी? युक्रेनसाठी? युक्रेनने आमच्याबरोबर कसा व्यवहार ठेवला होता? १९९८ च्या अणुचाचण्यांच्या वेळेस आपला निषेध करणार्‍यांमध्ये युक्रेनही होता. ३७० कलम प्रकरणी पण युक्रेनने पाकिस्तानचीच भाषा बोलली होती ना? मग अशा देशासाठी आम्ही आमच्या मोठ्या मित्रदेशाला का सोडायचे? अर्थातच युध्दाचे आणि रशियाने केलेल्या हल्ल्याचे उघड समर्थन करणे आपल्याला शक्यच नाही. मग वरवर बोलताना आम्ही शांततेच्या बाजूचे आहोत अशी गुळमुळीत भाषा वापरून आतमधून आपल्याला पाहिजे ते करणेच योग्य होते. आणि ते आपण केले आहे.
  • Log in or register to post comments

वाह चंद्र…सर! इतक्या वेळ जे

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/04/2025 - 20:37 नवीन
वाह चंद्र…सर! इतक्या वेळ जे मी सांगत होतो ते शास्त्रशुद्ध नी अभ्यासपूर्ण रीतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद! झेलेनस्की मूर्ख आहे हे मी आधीपासूनच सांगत आलोय, अगदी २०२२ ला फेब्रुवारीत रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेवर जमले तेव्हाही, पुतिन काकानी तेव्हाही युक्रेनला एक संधी दिली होती, चांगले आठवडाभर रशियन सैन्य युक्रेनच्या बॉर्डरवर उभे होते पण मुर्ख झेलेनस्कीने माती खाल्ली नि आम्हाला नाटोमध्ये सामील व्हायचे नाही असे सांगितले नाही, शेवटी रशियन सैन्य युक्रेनमध्ये पुतीन काकानी घुसवलेच! आता ह्या मूर्ख झेलेनास्कीकडे ना अणुबॉम्ब ना आधुनिक लढवय्ये सैन्य, अमेरिका नि युरोपच्या भिकेने कितीक काळ लढणार होता? आणी कोणाविरुद्ध? ज्या देशाला अमेरिकासारखा तेल लावलेला पैलवान भितो त्या देशविरुद्ध? हे इतक्या मोठ्यापदावर बसलेल्या झेलेनस्कीला कळायला नको होते का? बर युद्ध सुरू झाले कुनी कुत्र आपल्यासाठी धावून आले नाही हे दिसत असूनदेखील युद्ध थांबवण्यासाठी काहीही न करता अजून ३ वर्षे युद्ध चालू ठेवायचे? अहो पुतीनकाका दयाळू आहेत म्हणून २० टक्केच युक्रेन भाजून काढलाय, काकानी ठरवले तर अख्खा युक्रेन गव्हाच्या नी सूर्यफूलांच्या शेतासह दोन दिवसात भाजून काढेल! पण पुतिनकाकांच्या दृष्टीने लांबलेल युद्ध त्यांच्या वयक्तिक नी देशहित ह्या दोघांसाठी चांगले आहे. मूर्ख झेलेनस्की आणखी किती वाटोळे करतो युक्रेनचे ते पाहायला हवे. ह्याला युक्रेनच्याच लोकांनी उडवून द्यायला हवे नी चांगला देशहितासाठी निर्णय घेणार पंतप्रधान आणायला हवा! रच्याकने तात्या संतापी, बिनडोक दिसत असले तरी आहेत अत्यंत हुशार! गेल्या ३ वर्षात युक्रेनच्या लोकांच्या भल्यासाठी पहिल्यांदा कुणी काही करत असेल तर ते म्हणजे तात्या! इतर देशांच्या काय बापाचे जातेय युक्रेनी लोक मरो की जगो? साधे आपले पॅरिस खराब होऊ नये म्हणून सरळ नाझींपुढे लोटांगण घालणारे फ्रेंच असो की अमेरिकेच्या जीवावर युद्ध जिंकून फुशारक्या मारणारे ब्रिटन असो कुणालाही काही पडलेली नाही युक्रेनच्या जनतेची! तात्या बघा विश्वाची घडी कशी नीट लावतात ते! युरोपीय देशात जास्तच खुमखुमी असेल तर पुरवावा पैसा युक्रेनला अधिक खुमखुमी असेल तर स्वतचे सैन्य उतरवावे! अख्खा युरोप पुतिन काकांच्या घोड्याच्या टाचेखाली नाही आला तरतर अमरेंद्र बाहुबली नाव लावणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

चसुकु आणि अबा दोघांचे प्रतिसाद आवडले.

चित्रगुप्त
Tue, 03/04/2025 - 21:09 नवीन
चसुकु आणि अबा दोघांचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments

ऑस्कर सोहळ्यात रॉबर्ट डी निरो

आग्या१९९०
Tue, 03/04/2025 - 21:28 नवीन
ऑस्कर सोहळ्यात रॉबर्ट डी निरो ने ट्रम्पला F म्हटल्यावर सभागृहाने जोरदार समर्थन दिले. ट्रम्पाची गच्छंती अटळ आहे.
  • Log in or register to post comments

ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे

श्रीगुरुजी
Tue, 03/04/2025 - 22:00 नवीन
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे माथेफिरू सत्तेत नको असे माझे मत झाले आहे. युक्रेनचा नाश होत आहेच पण रशियाला सुद्धा मोठी किंमत द्यावी लागली आहे. झेलेन्स्कीला कसा हासडला असे ट्रंप-व्हान्स जोडीला वाटत असेल, पण उद्या रशियाने युक्रेन बळकावला तर तेथील सर्व खनिजसंपत्ती पुटिनच्या नियंत्रणात येईल व ट्रंपला हात चोळत बसावे लागेल. रशियाच्या यशामुळे जिनपिंग सुद्धा तैवान हस्तगत करेल. ब़ागलाची शेख हसीना खूप काही चांगली नव्हती. पण ती गेली तर तिच्या जागी येणारे जास्त भयंकर असतील हे भारताला जाणवत होते व म्हणून तर भारत सातत्याने तिला पाठिंबा देत होता. पण दुर्दैवाने तिला घालविले गेले व आता तेथे कट्टर भारतविरोधी सरकार आल्याने आपली डोकेदुखी वाढली आहे. ट्रंपला झेलेन्स्की आवडत नसला तरी तो नसल्यास अमेरिकेचेच प्रचंड नुकसान होणार आहे.
  • Log in or register to post comments

ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/04/2025 - 22:28 नवीन
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे माथेफिरू…. ह्यात आणखी एका माथेफिरूचे नाव समाविष्ट करायला हवे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

झेलेन्स्कीची तिरकी चाल

आग्या१९९०
Tue, 03/04/2025 - 22:21 नवीन
झेलेन्स्कीची तिरकी चाल ट्रम्पला अनपेक्षित होती. गेला दरोड्यातील हिस्सा मागायला परंतु देशातील जनमत विरुद्ध गेल्याने अडचणीत आला. थकलेल्या पुतीनला आता बराच घाम गाळावा लागणार.
  • Log in or register to post comments

ट्रम्प तात्याला तंटे मिटवायचे

आग्या१९९०
Tue, 03/04/2025 - 22:58 नवीन
ट्रम्प तात्याला तंटे मिटवायचे कंत्राटे मिळू लागली. https://youtu.be/ID9nZHPaQVk?feature=shared
  • Log in or register to post comments

अमेरिकेच्या मदतीविना

श्रीगुरुजी
Wed, 03/05/2025 - 09:25 नवीन
अमेरिकेच्या मदतीविना युरोपच्या पाठिंब्यावर युक्रेनने युद्धात टिकाव धरला तर नाचक्की अमेरिकेची होईल व युक्रेनमधील खनिजे अमेरिकेला मिळणार नाहीत. जर रशिया युद्धात जिंकला तर युक्रेनवर रशियाचे नियंत्रण येईल व खनिजे रशियाला मिळतील आणि जागतिक राजकारणात रशिया वरचढ होईल. युक्रेनला मदत न करणे हे अमेरिकेसाठी हानीकारक आहे. झेलेन्स्कीचा सार्वजनिक पाणउतारा करण्याच्या आनंदात मग्न असलेले ट्रंप व व्हान्स ही हानी समजण्याएवढे प्रगल्भ वाटत नाहीत.
  • Log in or register to post comments

ट्रम्प तात्याना युद्ध बंद

रात्रीचे चांदणे
Wed, 03/05/2025 - 09:44 नवीन
ट्रम्प तात्याना युद्ध बंद करून युक्रेन ची मिनरल्स मिळवायची असतील. पण झेलेन्स्की त्याला तयार नसणार. कारण युद्ध बंदी म्हणजे आत्ता पर्यंत हरलेला सगळा भूभाग रशियाचा. पण युक्रेन दुसऱ्यांच्या जीवावर आणखी किती दिवस युद्ध लढत राहणार? अमेरिकेची मदत फक्त हत्यारे आणि पैशांच्या स्वरूपात नसणार. महत्वाचे माहिती, रशियन सैनिकांची लोकेशन्स आणखीन काही गुप्त गोष्टीही अमेरिका युक्रेन्स ला पुरवत असणार. समजा युरोप ने मदत करूनही युक्रेन आपला भाग हरत असेल तर युद्धबंदीच करणे योग्य आहे.
  • Log in or register to post comments

मस्साजोग.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/05/2025 - 09:54 नवीन
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्र काल समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. आरोपपत्रात संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला कसे कसे कृत्य केलं त्याची तपशीलवार माहिती येत आहे. विकृत मानसिकता असलेल्यांनी केलेली निर्घून हत्या केली असं त्याचं वर्णन करता येईल. हत्या करतांना, मारहाण करतांना व्हीडीयो करणे, छायाचित्रे काढणे, गृपवर व्हायरल करणे ही इतरांवर दहशत बसावी यासाठीचं हे कृत्य आहे. सरपंच अर्धमेले असतांना आरोपींनी सरपंचाच्या तोंडावर लघवी करणे आणि पाठ काळीनिळी होईपर्यंत म्हणजे मरेपर्यंत मारणे ही गुंडगीरी आणि दहशत मोडून काढणे राजकीय लोकांना स्वतःच्या हितासाठी शक्य नाही असे कायम दिसते. राजकीय फायद्यांसाठी, पैशांसाठी असे गुंड नेत्यांसोबत असतात त्यांना पोसावे लागते तेव्हा निवडणूकीत नित्यनियमाने निवडून येता येते. महाराष्ट्रात वरील घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. कोणत्यातरी एका धर्माच्या माणसाने कोणत्यातरी दुस-या धर्माच्या माणसाची हत्त्या केली असती तर, कदाचित कट्टरवाद्यांनी देश डोक्यावर घेतला असता. सकाळ संध्याकाळ माध्यमांनी विषय मेंदुत ओतायचे काम केले असते, पण या विषयात तसा कोणताही स्कोप नसल्यामुळे अशा गोष्टी होतच असतात अशा पद्धतीने हे जनतेसमोर येत आहे. पोलीस तपास, सरकार म्हणून होणारी कार्यवाही, हा खेळ आपण अनेक महिन्यांपासून पाहात आहोत. आरोपींना पाठीराख्यांना वाचवायचे सर्वतोपरीने प्रयत्न सुरु आहेत. सामान्य माणसांनी व्यवस्थेतील अन्यायाच्या विरोधात उभं राहू नये अशी एक दहशत देशभर उभी राहात आहे. आधुनिक, पुरोगामी महाराष्ट्रात, सरकार कोणत्याही पक्षाचं असू दे, आता दडपशाहीचं गुंडगिरीचं राज्य फोफावत चाललं आहे, येत्या काळाता सामान्य माणसाचं जगणं अधिक खडतरच होत राहील असे वाटायला लागले आहे. मस्साजोगची घटना अस्वस्थ करणारी आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सहमत आहे. असे फोटो व्हायरल

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/05/2025 - 10:54 नवीन
सहमत आहे. असे फोटो व्हायरल झालेत असं कळाले! ट्विटरवर सापडले, आतड्या पिळवटून टाकतील असे ते फोटो होते, अत्यंत क्रूर प्रकारे नि विकृत पद्धतीने संतोष देशमुख ह्यांचा खून करण्यात आलाय! अतिशय वाईट वाटले पाहून, महाराष्ट्र आहे की बिहार असा प्रश्न पडावा! विशेष म्हणजे संतोष देशमुख हे भाजपचे बुथप्रमुख होते, जर सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता अश्या क्रूर पद्धतीने मरत असेल नि गुन्हेगारांना वाचवण्याचे प्रयत्न होत असतील तर सामान्य माणसाची काय हालत असेल हे कळते , दुसरीकडे केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते नि बॉडीगार्ड असलेल्या पोलिसाला "जाऊन तक्रार कर" अशी गुर्मी दाखवली जाते, 2 दिवस कुणालाही अटक वगैरं होत नाही कारण कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाचे असतात, महाराष्ट्रात दहशतीचे वातावरण आहे. रस्त्यावर फिरताना वगैरे अरे ला कारे करायला आजिबात जाऊ नका कारण गुन्हेगार प्रचंड मोकाट नी सुसाट सुटले आहेत, जिथे सरपंच मेल्यावर काही होत नाही तिथे तुम्ही आम्ही तर..... असो! महाराष्ट्र वाईट हातात गेल्याची ही फक्त सुरुवात आहे, पुढे अजून काय काय पाहावं लागणार देव जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/05/2025 - 11:24 नवीन
महाराष्ट्रात दहशतीचे वातावरण आहे. रस्त्यावर फिरताना वगैरे अरे ला कारे करायला आजिबात जाऊ नका कारण गुन्हेगार प्रचंड मोकाट नी सुसाट सुटले आहेत
+१ कायद्याने काहीही होत नाही, अशी नकारात्मक भावना आहे. गुन्हेगारी कृत्य केलं म्हणजे काही फासावर जात नाही, इतका आत्मविश्वास गुंडांमधे भरला आहे, अटक वगैरे झाली तर, आपला भाई आपल्याला सोडवून आणेल कोर्ट कचे-यात पुराव्याअभावी सुटका होते हे पक्क माहिती झालं आहे, त्यामुळे गुंडगिरी फोफावली आहे. रस्त्यावर गाडीला कट लागला, थोडंफार लागलं तर, दूर्लक्ष करा. गाडीचं नुकसान झालं तर भरुन निघेल. जीवाचं नुकसान झालं तर भरुन निघणार नाही. रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या चर्चा, वाट्सॅप सारखी चर्चास्थळे. लोकांशी मैत्री असते तोवर गोडगोड असतं. हळुहळु मतमतांतरे व्हायला लागतात. आपला मुळ स्वभाव कधीतरी बाहेर पडतो आणि तुतु मैमै सुरु होते. अशा माध्यमांमधूनही लोक डूख धरुन बसतात. राग धरुन बसतात. वैचारिक हिशेब गुद्दागुद्दीने पूर्ण करायची खुमखुमी येते. तेव्हा रस्त्यावर असो की, माध्यमांवर असो, अजिबात जिथे आपलं जमणार नाही, असे वाटले की गप्प बसलेलं बरं, किंवा काढता पाय घेतला तरी काही कमीपणा नसतो. भली भली माणसं, भली वाटणारी माणसं भयंकर वागून जातात. तेव्हा, सध्याचा काळ संयमाचाच आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

प्रश्न एवढाच आहे की

स्वधर्म
Wed, 03/05/2025 - 16:40 नवीन
असं सतत गप्प बसंलं, तर अन्याय करणार्याला वाटेल की माझी गुंडगिरी अशीच चालू राहील आणि हेच बरोबर वागणं आहे. शक्य असेल तिथे विरोध निदान आपण बोलून तरी दर्शवला पाहिजे की अजिबातच नको. असो, पण महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था आता रसातळाला गेली आहे, आणि त्याची जबाबदारी गृहमंत्र्यावर आहे, हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी

रात्रीचे चांदणे
Wed, 03/05/2025 - 19:54 नवीन
घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी राजीनामा घेतलाय. फडणवीस आणि अजित पवार नेहमीच मुंडेना वाचवत आलेत. करुणा मुंढे प्रकरणातही त्यांना वाचवलं गेलंय.
  • Log in or register to post comments

फडणवीस आणि अजित पवार नेहमीच

श्रीगुरुजी
Wed, 03/05/2025 - 21:02 नवीन
फडणवीस आणि अजित पवार नेहमीच मुंडेना वाचवत आलेत. फक्त मुंडेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी राजीनामा घेतलाय.

कपिलमुनी
गुरुवार, 03/06/2025 - 14:47 नवीन
तोवर एव्ढ्या पॉवर फुल्ल मंडळींनी किति पुरावे मिटवले असतील ..
  • Log in or register to post comments

अगदी नाईलाज झाला तेव्हाच

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/06/2025 - 14:51 नवीन
अगदी नाईलाज झाला तेव्हाच राजीनामा घेतलाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

साटं-लोटं

दीपक११७७
गुरुवार, 03/06/2025 - 17:13 नवीन
साटं-लोटं राजकारणाचा फटका हा कायम जनतेलाच बसतो. महाराष्ट्रात साटं-लोटं राजकारणाची विषारी मूळ खूप खोलवार रूज़लेली आहेत असो . .
  • Log in or register to post comments

हत्ये नंतर जी SIT स्थापन झाली

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 03/06/2025 - 20:47 नवीन
हत्ये नंतर जी SIT स्थापन झाली होती त्यात वाल्मिकी कराडचेच दोन निकटवर्तीय होते. नंतर ओरड झाल्यानंतर बदलण्यात आले. बर, एव्हढ होऊनही कराडला पोलिसांनी स्वतः अटक केली नाहीतर तो स्वतः सरेंडर झाला. अजूनही एक आरोपी फरारच आहे. संतोष देशमुख मराठा होते आणि बीड मध्ये वंजारी विरुद्ध मराठा अशी विभागणी आहे म्हणून मराठा समाजाने प्रकरण ताणून धरलं. पीडित दुसऱ्या जातीचा असला असता तर एवढेही कष्ट पोलिसांनी घेतले नसते. भाजपच्या धसानी मुंडेना विरोध म्हणून विरोध केला, पोलिसांवर आरोप केले पण गृहमंत्री फडणवीस विरोधात मात्र एक शब्द नाही.
  • Log in or register to post comments

आधीची माहिती धक्कादायक आहे

रामचंद्र
गुरुवार, 03/06/2025 - 22:15 नवीन
आधीची माहिती धक्कादायक आहे आणि शेवटचे निरीक्षण रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

आता तरी

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/06/2025 - 23:20 नवीन
आता तरी बोला रे. काही तरी बोला रे.. निषेधाचे एखादे पत्रक तरी? पंतप्रधान , परराष्ट्रमंत्री ,उद्योग आणी पुरवठा मंत्री(हे पियुष गोयल सध्या अमेरिकेत आहेत ना?), काहीतरी बोला. अमेरिकन संसदेत ट्रम्प भारतासकट ईतर देशांची नावे घेत आहेत. त्यातील चीनने तर सरळ "कोणते युद्ध पाहिजे ते सांगा, आम्ही तयार आहोत" असे सांगितले. कॅनडा देश आकाराने मोटा पण ईतर अनेक बाबतीत अमेरिकेपुढे खूप छोटा पण ट्रुडोनी सांगितले की "अमेरिकेतील काही भागात विद्युत पुरवठा खंडीत करू. अमेरिकेला कॅनडाची अर्थव्यवस्था नष्ट कराय्ची आहे" डेन्मार्कचे ग्रीनलँड आम्हाला पाहिजे आहे असे ट्रम्प म्हणाले- आणी डेन्मार्कमधील एका खासदाराने संसदेत सरळ ' f _ __ऑफ ट्रम्प" म्हणुन ट्रम्पची लायकी काढली. https://www.bbc.com/news/articles/c4gmd3g2nzqo https://www.bbc.com/news/articles/c89ye749nxvo https://www.youtube.com/watch?v=ImtRaTjAF9Y आपले, म्हणजे भारताचे घोडे कुठे अडतय? की "अमेरिका मोठा देश आहे. मान खाली घालुन पडेल ते पदरात घ्या" ही जुनी भूमिका? हे निषेध नोंदवणारे देशही आपल्यासारखेच अमेरिकेवर काही प्रमाणात अवलंबून आहेत ना? मग आपल्याला काय भीती वाटतेय? उद्या ट्रम्प "मला कश्मिर पाहिजे' म्हणाला तरीही आपण गप्पच बसणार?
  • Log in or register to post comments

माईडे,

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/06/2025 - 23:45 नवीन
माईडे, चीन, डेन्मार्क वगैरेंची बडबड ऐकून "हिंमत असेल तर . . .", "मर्दाची अवलाद असाल तर . . .", "अंगात दम असेल तर . . .", "एका बापाची अवलाद असाल तर . . .", "मेलेल्या आईचे दूध प्यायले नसेल तर . . ." अशी बडबड करत फिरणाऱ्या काही विदूषकांचे स्मरण झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

म्हणजे आपण दुसऱ्या देशांच्या

रात्रीचे चांदणे
Fri, 03/07/2025 - 04:49 नवीन
म्हणजे आपण दुसऱ्या देशांच्या उत्पादनावर जर लावायचा आणि दुसऱ्या देशांनी भारत जास्त कर लावतो म्हणले की निषेध करायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

गेले २ वर्षे रत्न-हिर्यांच्या

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/06/2025 - 23:40 नवीन
गेले २ वर्षे रत्न-हिर्यांच्या व्यवसायात मंदी आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये ह्या व्यवसायातील ५० जणांनी आत्महत्या केल्या.भारतातुन आलेल्या दागिन्यांवर अमेरिका ७/८ % आयत शुल्क आकारते तर अमेरिकेतुन आलेल्या दागिन्यांवर भारत २०% आयात शुल्क लावतो. ट्रम्प जे करतात ते योग्यच आहे असे धरले तर अमेरिका भारतातील दागिन्यांवर २०% आयात शुल्क लावणार. मग ह्याचे भारतावर होणारे परिणाम? https://www.youtube.com/watch?v=agdGlxB8ifQ
  • Log in or register to post comments

मग ह्याचे भारतावर होणारे

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/06/2025 - 23:48 नवीन
मग ह्याचे भारतावर होणारे परिणाम परिणामी अमेरिकनांना रत्ने-हिरे महाग मिळतील. मिळू देत की. आपलं काय जातंय. गुजराती हुशार आहेत. ते वेगळ्या मार्गाने अमेरिकेत हिरे-रत्ने पोहोचवतीलच.
  • Log in or register to post comments

ते

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 03/07/2025 - 11:59 नवीन
" गुजराती हुशार आहेत. ते वेगळ्या मार्गाने अमेरिकेत हिरे-रत्ने पोहोचवतीलच." आणि अमेरिकन हुशार नाहीत? रत्ने/हिर्याची निर्यात चांगली असती तर एका वर्षात ६५ आत्महत्या झाल्या नसत्या. युक्रेन-रशिया युद्धाचा सुरतमधील कारागीरांवर कसा परिणाम झाला आहे ते खालील व्हिडियोत बघा. कारागिरांच्या संघटनेने गुजरात सरकारकडे अनेकदा मदत मागितली पण काही उपयोग झाला नाही. https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8 गेल्यावर्षी surat diamond bourse चे उद्घाटन झाले. आकाराने पेंटॅगॉनहुनही मोठे केंद्र आहे. पण ४२०० पैकी आजतोवर फक्त ३००/४०० ऑफिसेस चालु झाली आहेत. औरंगझेबाच्या थडग्यापेक्षा हा प्रश्न मह्त्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरं मग माईडे तुझे सर्वज्ञ हे

श्रीगुरुजी
Fri, 03/07/2025 - 13:03 नवीन
बरं मग माईडे तुझे सर्वज्ञ हे काय उपाय सांगताहेत? का ते नुसते आरामखुर्चीत डुलत डुलत फक्त समस्या सांगत राहणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हा हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 03/07/2025 - 13:25 नवीन
पियुष गोयल अमेरिकेच्या दौर्यावर गेले आहेत चर्चा करायला. पंतप्रधान 'वनतारा' मध्ये आहेत. हे दोघे काहीच बोलायला तयार नाहीत. त्यानंतरच मत/उपाय सांगता येइल. नाहीतर ईकडे मि.पा.वर उपाय सुचवणार आणी तिकडे जयशंकर्/गोयल जिन-व्हिस्की घेत 'कूटनीती' यशस्वी झाली म्हणून चीयर्स करणार. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

'ह्यां'ना सांग ते बोलण्याची

श्रीगुरुजी
Fri, 03/07/2025 - 13:28 नवीन
'ह्यां'ना सांग ते बोलण्याची वाट नका पाहू. उपाय सांगून टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा