Skip to main content

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शनिवार, 01/03/2025 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum… https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum… चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…

वाचने 66527
प्रतिक्रिया 548

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परराष्ट्रमंत्री जयशंकर किंवा पंतप्रधानांकडुन अजुन तरी प्रतिक्रिया आलेली नाही.(निदान मी वाचलेली तरी नाही. असेल तर येथे लिंक द्यावी.) दरम्यान फ्रान्सच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया दखल घेण्याजोगी- French President Emmanuel Macron posted: "There is an aggressor: Russia. There is a victim: Ukraine. We were right to help Ukraine and sanction Russia three years ago - and to keep doing so.

माईडे, यावर तुझ्या 'ह्यां'ची प्रतिक्रिया काय?

In reply to by श्रीगुरुजी

ह्यांची प्रतिक्रिया आपल्या परराष्ट्र खात्याची असते तशीच आहे गुरुजी. "आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेउन आहोत"

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गुड वन. पूर्वी 'इशारे' असायचे आता. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. -दिलीप बिरुटे

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, जगातील मोजके देश सोडले तर कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. ज्यांचे हितसंबंध युक्रेनमध्ये आहेत फक्त त्यांनीच प्रतिक्रिया दिली. त्यातील अनेकांनी स्पष्ट भूमिका न घेता नरो वा कुंजरो वा अशीच तटस्थ प्रतिक्रिया दिली. रशिया भारताचा मित्र आहे, अमेरिका भारताचा मित्र आहे व युक्रेन आणि भारताचे संबंध खूप जवळिकीचे नाहीत. अश्या परिस्थितीत भारताने तटस्थ राहणे किंवा मौन पाळणे हेच योग्य व बहुसंख्य देशांची हीच भूमिका आहे. जाता जाता . . . ट्रंप अध्यक्षपदाच्या आपल्या पहिल्या कारकीर्दीत एक आक्रमक नेता म्हणून प्रसिद्ध झाले होते. परंतु अध्यक्षपदाच्या आपल्या दुसऱ्या कारकीर्दीत ते आक्रमकतेबरोबर उन्माद व वेडसरपणाचे प्रदर्शन करीत आहेत. एका देशाच्या सर्वोच्च नेत्याचा जाहीर अपमान करणे हे त्याचेच लक्षण आहे. दुर्दैवाने त्यांचा उपाध्यक्ष जेडी व्हान्स हा तसूभरही मागे नाही. ट्रंपचा उन्माद दीर्घकालीन टिकणार नाही. दोन्ही पक्षांचे बहुसंख्य खासदार एकत्र येऊन ट्रंपचे उन्मादी निर्णय हाणून पाडतील व कदाचित ट्रंपविरूद्ध महाभियोग वगैरे आणून निक्सनप्रमाणे पायउतार होण्यास भाग पाडतील असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

व्हाईट हाऊसमधली ती कुप्रसिद्ध भेट म्हणजे अगदी तमाशाच होता. डब्ल्यूडब्ल्यूईचे व्हिन्स मॅकमोहन यांना बसवून थेट प्रेक्षकांसमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे डोके मुंडवले होते तेव्हाची आठवण झाली! एक अपमानास्पद झेलेन्स्कीची भेट स्क्रिप्टेड वाटली आणि मला खात्री आहे की यामुळे अनेक जागतिक नेत्यांच्या तोंडात वाईट चव आली. त्यानंतर अमेरिकेला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे काही मदत मागण्याची कोणाची छाती असेल? जागतिक स्तरावर आपली लाज काढण्याचा कार्यक्रम का आणि कशासाठी कोणी ओढवून घेईल?

In reply to by शशिकांत ओक

मुळात झेलेनस्कीने मूर्खपणा केलाय हे तात्यांचे देखील मत आहे नि तात्यांनी लवकर युद्ध संपवा असे संकेत दिलेत, आता युद्ध रशियाच्याच अटींवर संपेल हे सगळ्यांच्याच लक्षात आलंय कारण जो काही हाग्यादम रशियाला द्यायचा तो आधीच नाटो देशांनी दिलाय, त्याचा रशियावर मोठा परिणाम झालेला नाहीये, भरपूर पैसे नी युद्ध सामुग्री युद्धात ओतून झालीय तरीही रशिया मागे हटला नाहीये. तिसरं महायुद्ध परवडणार नाहीये कारण रशिया मिटेल तर अख्खा युरोप नि अमेरिका अणुबॉम्ब टाकून मिटवून मगच मिटेल, त्यामुळे आता आहे तेव्हडा भूभाग ताब्यात ठेऊन उरलेला युक्रेन घेऊन गप बसने इतकेच काय ते झेलेनस्कीच्या हातात, तात्यांनी पुढाकार घेऊन पुतीनना समजावले तर कदाचीत पुतीन व्यापलेला भागही सोडून मागे जाऊ शकतात कारण पुतीन तात्यांच्या शब्दाबाहेर नाही, तात्यांचे वजन आहे आजही पुतीन ह्यांच्याकडे. तेव्हा तात्या जे काही सांगताहेत ते झेलेनस्कीने ऐकावे, उगाच भर पत्रकार परिषदेत तात्यांचा अपमान करू नये , तात्यांनी जग पाहिलेय उगाच तात्यांचे केस पांढरे झालेले नाहीत , अनुभवाचे बोल आहेत. - तात्यांचा पंखा अमरेंद्र बाहुबली!

In reply to by शशिकांत ओक

म्हणूनच आपल्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी 'माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझे चिन्ह चोरले' ही तक्रार घेऊन वॉशिंग्टनला जावे आणि ट्रम्पतात्यांना त्याविषयी काहीतरी करायची गळ घालावी असे फार वाटते :)

महाराष्ट्रात या एकमेव राज्यात थोडे अस्तित्व असलेला पक्ष पूर्ण संपून कबरीत जाऊन कयामतच्या दिवसाची वाट पाहतोय आणि निघाले केरळमध्ये जेथे काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काळजी नसावी ! जो पर्यंत पृथ्वीवर शेवटचा मराठी माणूस आहे तो पर्यंत शिवसेना पक्ष राहील, शिवसेना संपण्याच्या वल्गना करण्यात मागच्या 3 पिढ्या खपल्या पुढच्या 30हि खपल्या तरीही शिवसेना राहीलच! केरळ मध्ये सत्ता, पैसे, ईडी , निवडणूक आयोग, तोड्यापाण्या कारण्याची सर्व साधने एवढे सगळे असूनही भाजपचे हाल काय आहेत ते पहा. केरळात भाजप नाhiकारण केरळ हे भारतातील सर्वात सुशिक्षित राज्य आहे, भाजपचा प्रभाव फक्त शेणपट्ट्यात

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वृक्षावर माजलेलं बांडगूळ उखडून फेकल्यानंतर जगणार कसं? आता चिवशेणा थेट कयामतच्या दिवशी कबरीतून उठेल आणि मग आपल्या पापपुण्याचा हिशेब अल्लाला द्यावा लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

बांडगुळ वृक्षापेक्षा मोठं झालं तरी बांडगुळ ते बांडगुळंच. ज्या वृक्षाच्या बांडगुळ वाढले तो वृक्षच कापायला निघालंय पण बांडगुळ हे विसरले कि वृक्ष बांडगुळाला वाढवू शकतो तसा मिटवूही शकतो. एक दिवस भ्रष्टाचारी जनता पार्टीला मिटायचे आहे. मिटल्यावर मग कयामतच्या दिवशीही उठणे शक्य नाही, कोणताही विश्वगुरू वाचवू शकणार नाही. तसेही खोटे जास्त काळ चालत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तरी बांडगुळ ते बांडगुळंच. अगदी बरोबर. मुस्लिम लीग, समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अश्या अनेक वृक्षांवर माजूनही शेवटी बांडगूळ ते बांडगूळच. तसेही खोटे जास्त काळ चालत नाही. आमेन. म्हणून तर जनतेने चिवशेणेला मूठमाती दिली.

In reply to by श्रीगुरुजी

जळत रहा असेच. शिवसेना नेहमीच मराठी माणूस, हिंदुत्व नि मुंबई ला वाचवत राहील !

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चिवशेणा बिहारींनी स्थापन केलेला महाराष्ट्रद्रोही व मुस्लिमधार्जिणा पक्ष आहे. हिंदू, मराठी माणसे व मुंबईला अश्या उपऱ्यांची अजिबात आवश्यकता नव्हती, नाही व नसेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जो पर्यंत पृथ्वीवर शेवटचा मराठी माणूस आहे तो पर्यंत शिवसेना पक्ष राहील
विषयच संपला. जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं आहे. शिवसेना हा विषय केव्हाच संपलाय. शिवसेनेचे जे थोडेफार समर्थक होते त्या सर्वांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय.

In reply to by श्रीगुरुजी

"आज केरळ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या त्रिचुर येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले." १९९५/९६ साली मनोहर जोशी ह्यांनी लंडनमध्ये शिवसेना साखेचे उद्घाटन केले होते त्याची आठवण झाली. केरळमध्ये भुवन चंद्रन नावाचे एक शाखा चालवतात असे दिसते आहे. फोटोंवरुन उद्धव केरळमध्ये अनेकवेळा जातात असेही दिसते आहे. uddhav

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, तसे राहुल गांधी अनेकदा थायलंडला जातात. पण म्हणून ते थायलंडमध्ये काँग्रेसची शाखा काढायला जात नाहीत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तसा गेल्या सातआठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही केरळात अस्तित्वात आहे. भाजपचाही प्रथमच एक खासदार तिथून निवडून आला आहे. आणि भाजपची जरी ही सुरुवात असली तरी संघ तिथे इतक्या वर्षांपासून विरोधी सरकार असूनही पाय रोवून आहे.

महाराष्ट्राच्या बुडाला आग लागली आहे .. यू पी बिहार सारखे गुन्हे घडत आसताना दुसर्‍यांच्या नाकातला शेंबूड बघण्याची नेते आणि भक्त यांची धडपड मजेशीर आहे

भाजप महिला नेत्या आणि महिला कार्यकर्ते कोणत्या विश्वासाने पक्षाला समर्थन देत आहेत हेच कळत नाही. बलात्कारी कैद्यांची सुटका, त्याच्या आरत्या ओवाळून स्वागत, मणिपूरसारख्या घटनांकडे केंद्राचे जाणूनबुजून कानाडोळा करणे इ. आता महाराष्ट्रात केंद्र सरकारमधील एका महिला नेत्याच्या मुलीला छेडछाड केली जाते तरी त्याची दखल घेतली जात नाही. हा पक्ष महिलांना गृहीत धरतो आहे, नव्हे त्याच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी गृहीत धरत आहे. आता स्वाभिमान की एकनिष्ठता ह्यापैकी एकाची त्यांना निवड करण्याची वेळ आली आहे.

In reply to by आग्या१९९०

+१ पूर्वी अश्या घटना up त घडल्याच्या बातम्या यायच्या आता महाराष्ट्रातून अश्या बातम्या येताहेत, महाराष्ट्राचा युपी करून गुजरातला महाराष्ट्राच्या पुढे न्यायचे भाजपचे स्वप्न दिसतेय .

गादी रुळावर आणतो जरा. व्हाईट हाउस मधे झालेल्या ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की चर्चेच्या फियास्को नंतर आता युरोपियन देश आपली आपली सैन्य पथके युक्रेन ला लढायला पाठवणार आहेत. आतापावेतो हे युध्द रशिया व युक्रेन या दोन देशांमधेच आहे. उत्तर कोरीयाचे सैनिक जरी लढाई करत असले तरी अजुन त्यावर कुणी आक्षेप घेतला नाही. आता मात्र ईतर देशांचे सैन्य जर रशिया वर चाल करुन गेले व रशिया ने उत्तरादाखल हल्ला केला तर नेटो देश त्यांचा अर्टीकल ५ लागु करु शकतात. ह्यात एका देशावर झालेला हल्ला हा सगळ्यांवर झालेला हल्ला मानला जातो व ईतर देश युध्दात उतरु शकतात. कदाचीत नेटो नियमावलीला बांधला असल्याने अमेरिका पण त्यात उतरु शकतो. ही तिसर्‍या जागतीक महायुध्दाची नांदी ठरेल. कदाचीत त्यामुळे पण अमेरिका मागे राहु ईच्छीते. नुकताच अफगानिस्तानातुन माघार घेउन नाक ठेचुन घेतले आहे. त्यामुळे आख्खे युरोप जरी युक्रेन च्या मागे असले तरी त्याचा युक्रेनला फायदा होनारच नाही. नेटो देशांमधे अमेरिका जवळ्पास ७०% भार उचलतो. त्यामुळे जर नेटो मधुन अमेरिका बाहेर आले तर ती संघटना बरखास्त होइल हे मात्र नक्की. बघु काय होते ते पुढे....

In reply to by सुक्या

ह्यात काही झाले तरीही वाट मात्र युक्रेनचीच लागणार , युरोपीय देशांना रशिया काय आहे हे चांगलेच माहित आहे, अमेरिकेच्या खांद्यावर बसून बेडकुळ्या दाखवत होते, अम्रेकीशिवाय मैदानांत उतरले तर रशिया अख्खा युरोप भाजून काढेल , मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी पंगा घ्यायला नको होता . पुतीनशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं पुतीनशी नीट त्याला सोन्याची वीट

"मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी पंगा घ्यायला नको होता ." तुमच्या देशावर कोणी आक्रमण केले तर तुम्ही पंगा नाही घायचा? रशिया बलाढ्य आहे, पुतिन क्रूर आहे हे मान्य पण युक्रेनकडे काय आहे? The natural gas transmission system of Ukraine is a complex of pipelines for import and transit of gas in Ukraine. It is one of the largest gas transmission systems in the world https://en.wikipedia.org/wiki/Natural_gas_transmission_system_of_Ukraine Ukraine is an important transit country for oil and natural gas from Russia to Europe

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुमच्या देशावर कोणी आक्रमण केले तर तुम्ही पंगा नाही घायचा? रशियाची माफक मागणी इतकीच होती कि युक्रेनने नाटो मध्ये जाऊ नये, कांरण नाटोच्या सीमा थेट रशियाला भिडल्या असत्या! आणी ती मागणी न्याय्य देखील होती, कुठलाही देश आपली सुरक्षा प्रथम पाहणार, रशियाने तेच केले! cubaला सोविएतने अणुबॉम्ब ठेवल्यावर अमेरिकेने किती थयथय केली होती? आपल्यावर रशियाने हल्ला केला तर युरोपीय देश नि अमेरिका लगेच धावून येतील अशी मूर्ख झेलेनस्कीची अटकळ होती पण कुणी कुत्रही त्याला विचारायला आलं नाही, युद्धसामुग्री तेवढी दिली पण मारायला युक्रेनचे लोक नि सैन्यच होते, आता तात्यानी देखील हात वर केलेत, बस म्हणा बोंबलत मूर्ख झेल्या लेका!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

"मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी पंगा घ्यायला नको होता ." मूर्ख कोण हे सांगता येणार नाही, परंतु तीन वर्ष युक्रेनने पुतीनला युद्धात प्रतिकार केला तो एकट्या अमेरिकेच्या जीवावर नाही हे ट्रम्पला फ्रान्स आणि ब्रिटनने सुनावल्यानंतर ट्रम्प गडबडला आहे. संपूर्ण युरोप अमेरिकेच्या विरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुद्द अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक ट्रम्पच्या वेडेपणाला विरोध करू लागले आहे . ट्रम्प विरोधात महाभियोगाची शक्यता वाढली आहे.

In reply to by आग्या१९९०

तात्यांवर महाभियोग चालला तरीही युक्रेनी जनतेवर जे रशियन अत्याचार चालू आहेत ते थांबणार आहेत का? उद्या तात्या गेले नि दुसरा आलं तो जास्तीत जास्त काय करेल? युक्रेनला भरपूर शस्त्र लढण्यासाठी देईल नि अजून सैनिक नि नागरिक मरतील ! हा काय उपाय झाला का? युक्रेन ची लोक पळतील नि मरतील फक्त ! झेलेनस्कीच्या पुढच्या 50 पिढ्या खपल्या तरीही युक्रेन रशियाविरुद्ध युद्ध जिंकणे अशक्य आहे, अहो जिथे हिटलरचे शिस्तबद्ध नाझी 87 लाख रशियन मारूनही रशिया जिंकू शकले नाहीत तिथे हे दरिद्री युक्रेनी जिंकणार आहेत का? तात्या सांगत आहेत कि युद्ध थांबवा, युद्ध थांबणे हे युक्रेनच्याच भल्याच आहे, नि तात्या युक्रेनच्या भल्याचाच विचार करत आहेत. अमेरिका नी युरोपच्या इतर देशांच्या बापाचं काय जातंय युद्ध सुरु ठेवा म्हणून सांगायला? मरत तर युक्रेनी आहेत ना? आला का कुणी मायका लाल ब्रिटिश, फ्रेंच जर्मन किंवा पॉलिश युक्रेनीच्या खांद्याला खांदा लावून लढायला? तात्या सांगताहेत त्यातच युक्रेनच नि जगाचं भलं आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन सहज गिळता येईल असे वाटल्याने हल्ला केला होता. त्याचाही डोळा तेथील दुर्मिळ खनिजांवर होता. युद्ध करून ती खनिजे मिळवणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाल्याने युद्ध थांबवून ट्रम्प आणि पुतीन खनिजे वाटून खाण्याची स्वप्ने पहात आहेत. मेलेले कोंबडं आगीला भित नाही , त्यामुळे झेलेंस्की नमते घेत नाही. नमते घेतले तर दोन मोठे हुकूमशहा जगाला वेठीस धरणार हे ठाऊक असल्याने युरोप ट्रम्प विरोधात गेला आहे. ट्रम्पला नमते घ्यावेच लागणार आहे.

In reply to by आग्या१९९०

युक्रेन सहज गिळता येईल असे वाटल्याने हल्ला केला होता. हा भ्रम जाणून बुजून पसरवण्यात आला आहे, मुळात युक्रेन जिंकणे हा पुतिनच्या डाव्या हाताचा मळ! पण जा युक्रेन जिंकले तर युक्रेनची संपूर्ण जबाबदारी रशियावर येईल नि संपूर्ण जग रशिया विरोधात जाईल हे वेगळे! युद्ध चालू असताना अत्याचार केले तर कुणीही बोंबा मारत नाःई पण प्रदेश जिंकून मग अत्याचार केले तर अख्ख जग बोंबलेल. मुळात युद्ध चालू ठेवण्यातच रशियाचे भले आहे , युद्ध चालूच राहिले तर युक्रेन कधीही शांत राहणार नाही सतत युद्धग्रस्त राहील, नि शेजारच्या इतर देशांना योग्य तो संदेश जाईल, पुतीन एकाच वेळी युक्रेनच्या लोकसंख्येइतके सैन्य मैदानात उतरवू शकतो पण असं करणे रशियाच्या नुकसानीचेच आहे.

In reply to by आग्या१९९०

राहीला प्रश्न झेलेनस्कीचा तर तो एक मोठा मूर्ख आहे, पाण्यात राहून माशाशी वैर घेऊ नये! हे त्या मूर्खाला कळू नये? आपण कोण? आपले भौगोलिक स्थान काय? आपले शेजारी कोण? काय केले म्हणजे काय होऊ शकते? ह्याची जाणीव नसल्यानेच त्या मूर्खाने युक्रेनला युद्धात ढकलले नी त्याच्यामुळी लाखो युक्रेनी सैनिक नी नागरिक परगंदा झाले किंवा गचकले!

In reply to by आग्या१९९०

आपण रशियाला हरवु शकत नाही हे झिलिन्स्कीना सुरुवातीपासुनच ठाउक आहे पण पुतिनचे सगळे ऐकले तर मैत्रीचे ढोंग करुन पुतिन झिलिस्कीला विष घालुन मारायलाही कमी करणार नाही. पुतिनने ते प्रयोग ह्याआधीही केले आहेत. सध्यातरी ट्रम्पचा मूर्खपणा आणी पुतिनचा नालायक्पणा झिलिन्स्कीच्या चर्चेने जगासमोर पुढे आला एवढेच आता म्हणता येते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सध्यातरी ट्रम्पचा मूर्खपणा आणी पुतिनचा नालायक्पणा झिलिन्स्कीच्या चर्चेने जगासमोर पुढे आला एवढेच आता म्हणता येते. अपरिपक्वतेमुळे दोघेही फसले आहेत.

अबांचे प्रतिसाद रोचक वाटत आहेत, आणि अवैध मार्गाने अमेरित घुसणार्‍या भारतियांना ट्रंप तात्या आता पनामात रवाना करत आहेत, हे लईच आवडले.

ट्रंप आत्मघातकी मार्गावर आहे. एका सार्वभौम राष्ट्रप्रमुखाला बोलवून जाहीर पाणउतारा करणे हे अत्यंत मूर्खपणाचै वागणे आहे. त्यामुळे युरोपियन देश व सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडलेले इतर देश यांची एकजूट होऊ शकते. अमेरिकी जनतेला व बहुसंख्य खासदारांना हे फारसे आवडेल असे वाटत नाही. ट्रंप बहुसंख्य अतार्किक निर्णय तेथील न्यायालय व खासदार हाणून पाडल्यास नवल वाटणार नाही. आधी लिहिल्याप्रमाणे कदाचित महाभियोग आणून ट्र्पला हटविले जाऊ शकते. पण तसे झाल्यास व्हान्स अध्यक्ष होईल व तो ट्रंपपेक्षाही उथळ वाटतोय. झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व आदर वाटतोय. एका प्रचंड बलाढ्य महासत्तेला ३ वर्षे लढत दिली. डेव्हिड व गोलियाथची लढाई आहे ही.

In reply to by श्रीगुरुजी

झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व आदर वाटतोय. एका प्रचंड बलाढ्य महासत्तेला ३ वर्षे लढत दिली. डेव्हिड व गोलियाथची लढाई आहे ही. काहीही! मुळात नाटो मध्ये जाऊन युक्रेनी जनतेचा असा कोणता फायदा होणार होता? एकवेळ युरोपियन युनियन मध्ये घुसायचा प्रयत्न केला असता तर झेलेनस्कीचा लढा दाखल घेण्याजोगा होता, मात्र नाटोसाठी युद्ध करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा! baaki तात्यांनी असं भर पत्रकार परिषदेत भांडण करायला नको होते मान्य

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा तुम्ही फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या. युक्रेनला नाटो मध्ये जावे असे का वाटते? नाटो चे कार्ड दिसायला छान आहे हे कारण आहे की आणि काही?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असे म्हणून कसे भागेल? तुम्ही गुणोत्तराचा अर्धा भाग बघून उत्तर सुटले म्हणताहात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा, किमान अंगकाठी आणि तोंडावळा या बाबतीत तुमच्यात आणि त्या झेलेन्स्कीत भलतंच साम्य आहे हे तुमच्या लक्षात आलंय का?

पहिली विकेट गेली. हा फलंदाज बाद होऊ नये यासाठी दोन्ही बाजूचे खेळाडू, पंच, रेफ्री, दोन्ही बाजूचे कर्णधार वगैरेंनी आटोकाट प्रयत्न करूनही शेवटी विकेट गेलीच.

In reply to by श्रीगुरुजी

जरब बसेल अशी कारवाई 'आश्रयदात्यां'वर होण्याची शक्यता शून्य आहे. लोकक्षोभाचा स्फोट होण्याची वेळ येईपर्यंत प्रकरण लांबवायचं आणि मग थातुरमातुर कारवाई केल्यासारखं करून प्रकरण दडपून टाकायचं यात विद्यमान राज्यकर्ते तरबेज आहेत. मात्र या निमित्ताने या विषवल्लीची सर्वच पाळेमुळे खणून काढली गेली तर उत्तमच.

युक्रेनची 'नेटो' सभासद होण्याची ईच्छा १९९४ पासुनची आहे. सगळी माहिती https://en.wikipedia.org/wiki/Revolution_of_Dignity आहे. २०१४ पासुन, रशियाने युद्ध चालु केल्यापासुन युक्रेन धुमसतो आहे.तत्कालिन अध्यक्ष यनुकोव्हिक हे युक्रेनने रशियाच्या गटात सामिल व्हावे पण युरोपियन युनियनबरोबर मुक्त व्यापार न करण्याच्या मताचे होते. त्याविरोधात जोरदार आंदोलने झाली आणि त्यांना पायउतार व्हावे लागले. युक्रेनच्या नागरिकांमध्ये रशियाबद्दल कमालीची चीड होती आणी आहे. राजकीय हस्त़क्षेप, दमनतंत्र आणि दुसर्या देशातील पुढार्याना पैसे खायला घालुन व्यवस्था खिळ्खिळी करणे हे रशियाचे उद्योग आहेत. "झिलिन्स्की मूर्ख लेकाचा, काहीच कळत नाही त्याला' असे म्हणणे म्हणजे आपला राजकीय बुद्द्ध्यांक ट्रम्पएवढाच आहे असे मान्य करण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, युद्ध सुरू करण्याआधी मुत्सेड्डेगिरी वगैरे काही पायऱ्या असतात, कुठलाही देश शेवटच्या पायरीतच युद्ध सुरू करतो, युक्रेन रशियाच्या गोटात जावो अथवा अमेरिकेच्या अथवा तटस्थ राहो, सर्वात महत्त्वाचे आहे युक्रेनच्या लोकांची सुरक्षितता. रशिया हा काही पुचाट देश नाही, आपल्या शेजाऱ्याशी भांडण करताना आपल्या मागे कुणीतरी ताकदवान देश उभा आहे का हे तरी त्या मूर्ख झेलेनस्कीला कळायला नको? दिला देश ढकलून रशियापुढे! आता रशिया साधं चोपणार आहे का? आजूबाजूचे बेलारूस वगैरे देश मूर्ख आहेत का? रशियन पंखाखाली गेलेले? आणी इतके करून मिळवले काय झेलेनस्कीने तर 20 टक्के भूभाग गेला नी लाखो लोक स्थलांतरित झाले हजारो मेले, ह्यामुळे झेलेनस्की "मूर्ख लेकाचाच " आहे. तात्या जे सांगताहेत तेच युक्रेनच्या हिताचे आहे, युद्ध थांबवणे, तात्या सगळ्यांसमोर राग राग करतात पण आतून मनाने फार चांगले आहेत, सिनेट सदस्यांनी हे समजून घ्यावे व तात्यांविरुद्ध उगाच काहीतरी महाभियोग वगैरे आणू नये. आणी आपण तात्यांच्या बुध्यांक हि काढू नये, तात्यांनी उगाच का दोनवेळा निवडणूक जिंकली? कमळाबाई हॅरिसला जुमानले नाही की हिलरी मावशीला शरन गेले नाही, ते हि प्रामाणिकपणे लढून आपल्यासारखे नाही ईडी सीबीआय विरोधकांवर सोडले, की पक्षात या घोटाळे माफ करतो धोरण राबवले, ना चार दोन गद्दार हाताशी धरून पक्ष फोडले ना निवडणूक आयोगाचा गैरवप करून ईव्हीएम हाताळून राज्य जिंकले, तात्यांनी जे काही केले त प्रामाणिकपणे नी समोर! त्यामुळे तात्यांचा बुध्यांक वगैरे काढू नका. तात्या इस लब!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अजूनपर्यण्त ७०,००० रशियन सैनिक युक्रेनने ढगात पाठवले आहेत. युक्रेनचेही त्याहुन अधिक म्रुत्युमुखी पडले आहेत हे नक्की. पण हे असेच चालु ठेवले तर रशियाचेही नुकसान आहेच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे किती भोळी गं तू? ज्या देशाने दुसऱ्या महायुद्धात २.५ कोटी जनता नी ८७ लाख सैनिक गमावले त्या देशाला ७० हजार सैनिकांनी फरक पडणार आहे का? हे काय नुकसान म्हणायचे का? नाटो बाजूला येत असेल तर रशियाने शक्य ती ताकद लावून हा प्रयत्न हाणून पडायला हवा हे एक देश म्हणून रशियाचे कर्तव्य आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राला लाभलेला सर्वोत्तम गृहमंत्री म्हणजे देफ. त्यांचं नुसतं नाव काढलं तरी गुन्हेगार थरथर कापतात. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्र गुन्हेगारमुक्त झाला आहे. एक हजार गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकाही गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई होऊन देणार नाही व एकाही निरपराध्याला न्याय मिळून देणार नाही अशी त्यांनी राज्यघटनेवर हात ठेवून शपथ घेतली आहे व त्या शपथेचे ते काटेकोर पालन करतात.

In reply to by श्रीगुरुजी

+१ युपी बिहारला लाजवेल अश्या प्रमाणावर महाराष्ट्रात गुन्हेगारी सुरु झालीय , परंतुएक गुन्हेगाराचा आका असतो जो सेटिंग लावून गुन्हेगाराला वाचवतो, त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नाहीये, खिन्न मर्डर तर नित्याचेच झालेत, गुन्हेगार तर "coming to yerwada" असं स्टेटस ठेऊन मुडदे पाडत आहेत, एकंदरीत महाराष्ट्र चुकीच्या हातात गेलाय एवढं मात्र निश्चित!

In reply to by श्रीगुरुजी

एका तरी कट्टर भाजप समर्थकाला आता त्यांचे राज्यातील मुख्यमंत्री व भाजपचे वजनदार नेते हे जनतेच्या अहिताचे निर्णय घेत आहेत, हे लक्षात आले शेवटी! लवकरच महानेतेही असेच करतात (आठवा: ब्रीजभूषण सिंह), हे समजू लागेल ही आशा.

In reply to by श्रीगुरुजी

आता संबंधित महान व्यक्तीचं पक्षात घेऊन पुनर्वसन का नुसतंच पुनर्वसन होणार, एवढीच उत्सुकता आहे. अन्यायग्रस्त मृत व्यक्तीला खराखुरा न्याय मिळणार नाही याची खात्रीच आहे.

झेलेनस्की ने जर युद्धच्या आधीच अमेरिके सोबत खनिज उत्खनन करण्यासाठीचा करार केला असता तर त्याला देशा करिता हवे असलेले संरक्षण दहा-पंधरा वर्ष आपसुकच मिळाले असते सोबतच रॉयल्टी देखील आणि जीव आणि संपत्तीचा नाश टाळता आला असता.

In reply to by दीपक११७७

युद्धामुळे युक्रेनची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, त्यामुळेच रशिया आणि अमेरिका घायकुतीला आले आहेत. युद्ध रशियाने सुरू केले आहे त्यानेच थांबवले पाहिजे. ट्रम्पने पुतीनवर दबाव आणायला हवा,परंतु भिकारडा खनिजांसाठी झेलेंस्कीला दमदाटी करतोय.

In reply to by आग्या१९९०

क्रिमिया घेतल्या नंतर २०१४ पासून युक्रेनच्या थिंक टँक ने यावर विचार करायला हवा होता ।