आठवणीतील किडे
आपल्या आयुष्यात अनेक कीटक (किडे) -मुंग्या पक्षी प्राणी आलेले असतात. कीटकाची दुनियाच वेगळी आहे. कीटकाचा पर्यावरण म्हणून उपयोग आहे. अनेक आवडते, नावडते कीटक आपल्याला अधुन-मधून दिसत असतात. पावसाळा आला की कीटक दिसायला लागतात. आपला अनेकदा या कीटकाशी चांगला परिचय असतो. आपणास या सर्वांची आठवणही येत असते कारण आपला या कीटकाशी जुना स्नेह असतो.
आपला हा धागा त्याच किड्यासंबंधी आहे.
लहानपणी आपण यातल्या अनेक किड्यांशी मैत्री केलेली आहे. आपण तासंतास त्यांच्याबरोबर घालवला आहे, अशा आपल्या आठवणींचा हा धा्गा. आम्ही लहानपणी भिंग म्हणून या किड्यांशी खेळायचो. बोरीच्या झाडांवर, काटेरी झाडांवर हे भिंग सापडायचे. भुंग्यांसारख्या याचा आवाज यायचा. मानेजवळ दोरा बांधायचा. आणि तो उडायला लागला की त्याच्यामागे फ़िरायचे. आपण लहानपणी फार क्रूरपणे यांच्याशी वागलो असे वाट्ते. काचेच्या डब्यात बोरीचा पाला आणि हे कीटक किडे सांभाळले अर्थात ते जगायचे नाहीत. पण पुन्हा नव्याने, मित्रांबरोबर अनेक बोरी-बाभळींवर याला शोधत गेला. आम्ही भिंग म्हणायचो तर याला काही ठिकाणी पाचपिंगेही म्हणतात.
घुगी, उंट तर काही ठिकाणी याचं नाव घुंगरपाळ. मातीत गोल आळे केलेले. एक-दोन इंच असलेले याचं गोल घर असायचं. सापळाच लावलेला असतो. भुसभुशीत मातीत त्या गोल घरात मुंग्या बारीक किडे पडले-घसरले की घराच्या टोकाशी खाली असलेला हा किडा आपलं भक्ष्य मातीत ओढून घेऊन जायचा. किडा दिसायला बेकार असला, तर त्याचं पोट-पाठ अगदी नरम असे. आता जालावर शोधत होतो, त्याला पाहून आपण काहीही करत होतो असं फिलिंग आलं. बाकी, याचं घर कितीतरी वेळा उकरून छोट्याश्या काचेच्या डबीत हे किडे सांभाळले आहेत. यांची गोल गोल घरांची एक वस्तीच असायची भारी दिसायचे ते सगळे. रात्री मोडलेली घरे पुन्हा सकाळी अगदी व्यवस्थित दिसायची नवा डाव नवा खेळ अशा स्वरुपात.
रोलर किडे, शेणाचे बारीक गोळे करून उलट सुलट होत हे किडे ढकलत चाललेले दिसायचे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे किडे खरे तर उपयोगाचे असावेत. पण एक किडा काही वेळ उलटा होऊन गोल गोल तो शेणाचा गोळा ढकलतो तर दुसऱ्या बाजूचा सरळ गोळ्याला ढकलत चालताना दिसतो. पहिला काही वेळ थकला किंवा त्यांची जी काही भाषा असेल त्या प्रमाणे खांदेपालट व्हावी तसे ते आपापल्या जागा बदलून पुन्हा तो बारका गोळा ढकलून घेऊन जाताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कुठून कुठे सुरू असतो काही माहिती नाही. पण, हा खेळ आम्ही पोरं तासंतास बघत असायचो.
रेशीम किडे, पैसा, घुल्या, अशी कितीतरी किडे- कीटक आपणास आठवत असतील. आपल्या काही आठवणी असतील. सोबत काही विशेष माहिती असेल तर, छायाचित्र आणि माहिती याचं स्वागत आहे. असं म्हणतात की सर्व जग नष्ट झालं तरी हे कीटक राहतील. आपल्या आजूबाजूला असा अनेक सृष्टीतला हा पसारा आपल्यासमोर पडलेला असतो. आपल्या सहवासातील अशा कीटकाच्या गोष्टीसाठीचा हा धागा. आपलं सर्वांचं स्वागत आहे. (छायाचित्र जालावरून साभार)
In reply to ब्लिस्टर नावाचा किडा होता,तो by आग्या१९९०
In reply to ब्लिस्टर नावाचा किडा होता,तो by आग्या१९९०
२) असा पुंजका बऱ्याचदा दिसला आहे.
३) घरं.
४) सुरवंट !
५) ???
मातीत ज्वालामुखीचे तोंड असल्यासारखे घर बांधणारा किडा असतो त्याची एक गंमत असते. सुताचा छोटासा गोळा आत टाकला तर तो पुन्हा बाहेर फेकून देतो.
In reply to माझ्या कॅमेऱ्यातले काही किडे. by कॉमी
In reply to माझ्या कॅमेऱ्यातले काही किडे. by कॉमी
In reply to माझ्या कॅमेऱ्यातले काही किडे. by कॉमी
In reply to हिरवे बरे आलेत. by कंजूस
---
एकदा महाबळेश्वरला मधुमक्षिका पालन केंद्रात गेलो असताना त्यांचे पोळे हातात धरले होते, भारी वाटले.
In reply to 'किडे' आवडले. by प्रचेतस
-दिलीप बिरुटे
In reply to मस्त....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to 'किडे' आवडले. by प्रचेतस
![]() |
छायाचित्र सरांच्या सौजन्याने |
मृगाचे लाल किडे पूर्वी हमखास दिसत. मृगाचा पहिला पाऊस पडला की हे लाल मखमली पाठीचे किटक जमिनीतून बाहेर येत आणि तुरुतुरु चालू लागत.
अहं...! तो लाल मखमली किटक म्हणजे त्याला काही ठिकाणी रोहिणी असेही म्हणतात म्हणे. पण, मिरुग, मृगाचा, म्हणजे हा किटक, जो पाऊस येईल अशी कल्पना देतो. आमचे कवी मित्र, शिक्षक आणि शेतकरी असलेले श्री.लक्ष्मण खेडकर सरांनी फोटो पाठवला आणि धाग्याची आठवण झाली. -दिलीप बिरुटे
In reply to हाॅलिवूडच्या काही अप्रतिम by गणपा
In reply to बाकी मोबाईल किडे, ओएस by प्रचेतस
मोबाईल किडे, ओएस किड्यांवरदेखील देखील लिहिलं असतंत तर अजून भारी झालं असतंहे काय प्रकरण आहे ? असे किडे असतात की ते मात्र एक रूपक आहे ?
In reply to मोबाइल रूट करणे? by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Photography is the story I fail to put into words.”:- Destin SparksIn reply to सर रॉक्स!! by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
भिंग,पाचपिंगे आणि तुमच्याकडील काचकिडे बहुदा एकच असावे. लालमुंग्या, काळ्या मुंग्या,मुंगळे, पंखावाले मुंगळे यांची एक
दुनिया आहेच. काजवेही आपल्या सर्वांच्या पिढ्यांच्या वाट्याला आलेले. फ़क्त आपण उल्लेखलेल्या जळवांचा सहवास अजिबात नको. आपापल्या विभागानुसार त्याची प्रचलित वेगवेगळी नावं. आमच्याकडे जळू म्हणून एकदम फ़ेमस. नदीतून जातांना, मासे पकडणा-यांच्या वाटेला यांचा सहवास अनेकदा लाभलेला पाहिलेला आहे. एकदा की ती शरीराला चिकटली मग काढणे मुश्कील होऊन बसते. शरीरातील रक्त ओढत असते. शरीरातील दुषित रक्त काढण्यासाठी 'हिरुडा’ जातींच्या जळवांचा वापर केला जातो म्हणे, अर्थात ही सांगोवांगी माहिती. पण, हे जळवांचं प्रकरणही भयंकरच आहे. (छायाचित्र जालावरुन)
-दिलीप बिरुटे
In reply to मस्त लेख आहे मास्स्तर. by विजुभाऊ
डान्सर उर्फ तुडतुडा म्हणून हा किडा प्रसिद्ध आहे. हिरवाकच्च रंग असतो.
गवतात आपल्या रंगामुळे गवताशी त्याचा रंग मॅच होऊन जातो. चुकून-माकुन कधी कधी आपल्या गवतांच्या लॉनवरही पोहचतो. हा किडा सतत आपलं अंग हलवत राहतो म्हणून त्याचं नाव डान्सर. त्या किड्याची मागे-पुढे अशी असं सारखी हलचल -तुडतुड सुरु असते. फार काळ स्थिर राहात नाही. प्रार्थना किडा म्हणूनही याला ओळखला जातो. गवतात रहिवास असल्यामुळे कधी कधी गाय-बैल अथवा कोणा प्राण्यांच्या पोटात हा किडा गेल्यास जणावरांचे पोट फुगते. प्रसंगी प्राण्यांच्या जीवावरही बेतल्या जाते म्हणे. तपशीलवार माहिती नाही. पण डान्सर म्हणून ओळख आहे. योगायोगाने काल भेट झाली. छायाचित्र आपलंच.
-दिलीप बिरुटे
In reply to नाकतोडा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to रुमाल दिसलाच नाही...:) :) :) by किल्लेदार

गेल्या आठवड्यात हा किडा पाहायला मिळाला. त्याच्या पाठीवर मानवी चेहर्यासारखा आकार दिसतोय.In reply to गेल्या आठवड्यात हा किडा by किसन शिंदे

In reply to बहुत साल पहले by तुषार काळभोर
In reply to गेल्या आठवड्यात हा किडा by किसन शिंदे




मृगकिडा ' लाल मखमल ' आणि