शहाणपण शोधतो मी...

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
11 Jan 2026 - 8:22 pm

Intelligence is abundant in the world,
I'm searching wiseness... 

जगात,
बुद्धिमत्ता खूप झालीय, 
शहाणपण शोधतो मी |

मोठेपणा खूप झालाय, 
लहानपण शोधतो मी |

तर्क कुठे उगाळावा, 
सहाण पण शोधतो मी |
माणुसकी ची पाणपोई,
तहान पण शोधतो मी |

प्रत्येक उत्तर chat gpt ला,
विचारणाऱ्या पिढीच्या,
छद्मी AI पासून दूर नेणारे,
वाहन पण शोधतो मी |

शुष्क तार्किक संवादात,
मायेचा ओलावा कळेना,
जुन्या अडाणी प्रेमाचा,

जहाँ पण शोधतो मी |

बुद्धिमत्ता खूप झालीय, 
शहाणपण शोधतो मी |

कविता

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

12 Jan 2026 - 9:33 pm | कानडाऊ योगेशु

आवडली.