Skip to main content

साठा उत्तरांची कहाणी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 17/04/2018 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक टिनपाट महानगर होतं तिथं एक आय्-डी होता हा आय्-डी कसा होता? विद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ. त्याचा दिवस कसा जायचा? सक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा लंच टायमात एका संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा काॅफी ब्रेकात दुसर्‍या संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा परतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा. एकदा काय झालं? जरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वैचारिक वैफल्य आलं बिचार्‍याला. या वैफल्यानं काय झालं? त्यास आंजावैराग्य आलं आंजावैराग्याची लक्षणे कोणती? तो टंकेना की पिंकेना समस्त स्क्रीनांकडे तो पाठ फ

आम्ही दोघीच्या निमित्ताने

लेखक पारा यांनी मंगळवार, 17/04/2018 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का? की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल? आम्ही दोघी तसं काहीच करत नाही. कुठल्याच व्यक्तिरेखेशी मी समरस होऊ शकलो नाही. प्रिया बापट आणि तिच्या बाबांमधला असंवाद मला कुठेच स्पर्श करून गेला नाही. त्या दोन्ही व्यक्तिरेखा कोरड्या आणि प्लास्टिकच्या वाटल्या मला. नाही म्हणायला मुक्ता बर्वेचा संयत अभिनय थोडा कुठे मनाला भिडतो, पण तिचा रोल तसा फार नाहीच. गावाकडच्या एका मुलीचं बेअरिंग ती पहिल्या सीनला जे पकडते ते अगदी शेवटपर्यंत.

हरवलेला डबा

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 17/04/2018 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेला डबा फार नाही ३० वर्षा पूर्वीची गोष्ट असेल. मला माझ्या वस्तू हरवायची खुप सवय होती. आणि तेंव्हा माझ्या कड़े हरवणया सारख्या वस्तूही खुप होत्या. कधी पेन्सीळ, कधी कंपास तर कधी फक्त वही. पण त्यातल्या त्यात माझी आवडीची हरवायची वस्तू होती ती म्हणजे माझा खाऊचा डब्बा. हा मी एक दिवसा आड़ हरवायचोच. सुरुवातीला वेन्धळ ट पणा ने डबा हरवणारा मी नंतर नंतर सवयीने डबा हरवायला लागलो. माझ्या सोयीसकर डबा हरवणयालाही एक कारण होत.

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू –३

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 17/04/2018 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : …. तीन दिवसांनी आग विझली तेव्हा धीरावतीचे भाऊ आत शिरले आणि त्यांनी वाडा पिंजून काढला. पण काळ्याठिक्कर पडलेल्या भिंतीमध्ये क्रियाकर्म करण्यासाठी एकही हाड सापडले नाही की धीरावतीच्या अंगावरच्या दोनशे तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी गुंजसुद्धा मिळाली नाही. मधल्या बंदिस्त देवघराचे दार अर्धवट जळलेल्या अवस्थेत उघडे होते. थोरल्याने तिथून आत नजर टाकली तेव्हा त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याची वाचाच बंद झाली ! … भाग ३ ...देवखोलीत खाली जमीनच नव्हती ! खोलवर नजर जाईल तिथपर्यंत साकळलेला अंधार ! खाली नजर टाकली तरी भोवऱ्यात फसावे तशी भावना होत होती. खोलवर मध्येच प्रकाशाचा ठिपका दिसे.

सगळीकडे सारखेच

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 17/04/2018 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला मैदानावर जमल्यावरच्या गप्पा ते यूपी बिहारवाले लै भुरटे विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे दिल्ली हरयाणावाले तर आगाव एकजात सगळे माजोरडे साले गुजराती मारवाडी तर काय लुटायलाच बसलेत सारे चांगले वाटतात बाहेरून पण हे मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे आसामी बंगाली पण त्यातलेच गोड बोलून गंडा बांधणारे दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो चहा बिडीकाडी करत बोलू लागलो धुळे जळगाव खानदेशवाले अमुक हे नागपूर विदर्भवाले तमुक सांगली सोलापूरवाले साले दुष्काळी आडमुठे अर्धवट नाशिक नगरी सातारा कोल्हापूरवाले पण त्यातलेच आणि कोकणी एक नंबर चिक्कू बीड उस्मानाबादी तर मजाच गड

परत पेटेल मेणबत्ती

लेखक खिलजि यांनी सोमवार, 16/04/2018 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
परत पेटेल मेणबत्ती येईल नवा कायदा वणवा आता मंदिरात पोहोचलाय पुन्हा हवीय रक्तरंजित क्रांती षंढ अजून करणार तरी काय कायद्याच्याच गळ्यात पळवाटेचे पाय पहिली झाडं तोडली जायची नंतर रोपांवर आली हि भें_द जमात आता कळ्यांची खुडणी चालू आहे बुद्धी गेलीय सर्वांची जणू कोमात मथळे भरून येतील अजून काही दिवस असतील रकानेच्या रकाने लढा चालेल दोन्ही बाजूस न्याय मिळेल कैक युगाने तोवर पुन्हा कळ्या खुरडल्या जातील पुन्हा मेणबत्त्या पेटतील पुन्हा येईल नवा कायदा येतील नवीन पळवाटा षंढ असेच बघत राहतील ते तसंच असेल चित्र ..
काव्यरस

Dead Man's Hand - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 16/04/2018 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
सिनीयर इन्स्पे. रोहित प्रधान आ SS वासून समोर बसलेल्या रोशनीकडे पाहत होता. सब् इन्स्पे कदम आणि हेड कॉन्स्टेबल नाईकांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. या संपूर्ण केसला अशी काही कलाटणी मिळेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. हे लॉकेट स्वप्नाचं आहे याचा अर्थ.... सापुतारा पोलीसांना वर्षभरापूर्वी सापडलेला तो स्केलेटन स्वप्नाचा आहे? माय गॉड! दोन महिन्यांपासून ज्या मुलीला पकडण्यासाठी आपण अखंड धावपळ करत होतो, तिचा वर्षाभरापूर्वीच खून झाला होता? ....

पुणे ते लेह (भाग १२ लेह - पॅंगॉन्ग)

लेखक अभिजीत अवलिया यांनी रविवार, 15/04/2018 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री हुंडर वरून परत आल्यावर होमस्टे मध्ये मुक्कामास असलेला एक कॉलेजवयीन मुलगा माझ्याकडे आला. त्याच्याच शब्दात सांगायचे तर ठाण्यात राहणारा बॉम्बेकर होता तो. मुंबई ते दिल्ली विमानाने, तिथून लगेच बस ने मनाली आणि तिथून खाजगी गाडीने विना मुक्काम लेह गाठले होते त्याने. जी लोक विमानाने लेहला येतात किंवा मनाली लेह एका दिवसात प्रवास करून लेह ला पोचतात त्यांनी लेह मध्ये पोचल्यावर २-३ दिवस आराम करून मग ऊंचावरचे प्रवास करणे अपेक्षित असते. ह्यामुळे आपले शरीर उंचीवरच्या विरळ हवेला सरावते. इकडे पोस्टिंगवर येणारे सैनिक ज्यांची शारीरिक क्षमता आपल्यापेक्षा चांगलीच असते त्यांना देखील हा नियम पाळावा लागतो.

उन्माद

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/04/2018 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अस्हिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात! जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलवतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात.