Skip to main content

न्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/04/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य सभा , बरखास्ती प्रस्ताव आणि काही वेगळे प्रश्न या महिन्यात भारताच्या सर्वोच्च न्यायाधिशां विरुद्ध बरखास्तीचा प्रस्ताव राज्यसभेतील जवळपास ६५ खासदारानि राज्यसभा अध्यक्ष (उपराष्ट्रपती) व्यंकय्या नायडू यांच्या कडे पाठवला तो राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळला आहे तूर्ततरी दिसते . एकंदर प्रकाराबद्दल मला काही जरासे वेगळे प्रश्न पडले . राज्यसभा हे भारतीय संसदेच वरीष्ठ सभागृह.

एकदा टारझन अंगात आला

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 24/04/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा टारझन अंगात आला काढून टाकले कपडे सर्व पायपुसण्याचा लंगोट केला अन जंगल प्रवास सुरु झाला कुणीही ओळखू नये म्हणून हेल्मेट घातले बाहेर येताक्षणी घराच्या भरपूर सारे कुत्रे मागे लागले वाट मिळेल तिकडे धावत सुटलो पारंब्या अन वेली शोधू लागलो नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून उड्या मारू लागलो आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता स्टेमिनापण संपत आला होता टारझन अंगातून कधीच निघून गेला होता लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट टारझन बनण्याच्या नादात पुरता झालो

टोमॅटो सूप .. जरा वेगळ्या पद्धतीने ..

लेखक प्रिया१ यांनी सोमवार, 23/04/2018 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नेहमी जे टोमॅटो सूप किंवा सार करतो त्यापेक्षा हे जरा वेगळ्या पद्धतीचे आहे ... छान लागते... शिवाय फार वेळही लागत नाही ... साहित्य: -------- ३ ते ४ मोठे लालबूंद टोमॅटो २ मोठे कांदे १ टीस्पून जिरे २-३ मिरच्या १.५ इंच आल्याचा तुकडा किंचित हळद (जास्ती घालू नये नाहीतर टोमॅटोचा लाल रंग लपून जाईल) मीठ चवीपुरते साखर चवीपुरती थोडेसे पाणी १.५ चमचा अमूल बटर किंवा तूप (दोन्हीही छान लागते) फ्रेश क्रीम आवडीप्रमाणे - साधारण २-३ चमचे (अमूल चा टेट्रा पॅक मिळतो ते क्रीम त्याच्या even texture मुळे सुपात छान मिसळून जाते) आवडत असल्यास कोथिंबीर कृती: ------- कांदे सोलून घ्यावेत.

बस्तर

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 23/04/2018 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
झगड्यानं एक दगड उचलला आणि मागून पळत येत भिरकावून दिला. दगड डोक्यात बसला. पण डायवर हूं की चू न करता तसाच मातीत डोकं रूतवून पडला. दुपारची काहिली झळाळत होती. पाण्यावाचून तहानलेल्या बाभळीच्या वनात तो आडमुठा ट्रक उभा होता. कमरेवर हात ठेऊन दाद्या म्हणाला, "मेला की काय आयघालीचा?" "ह्या... आसा कसा मरंल.. उठंय ये शिकड्या.." बुटाडान त्याचंं थोबाड ढकलत झगड्या खाली बसला. तसा रक्ताचा एक ओघळंच त्या डायवरची पगडी भिजवत खाली निथळला. भर दुपारी आग ओकत दोघे चालू लागले. एका डबक्यात बुटाला लागलेलं रक्त झगड्यानं पुसून घेतलं.

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ५

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 23/04/2018 12:18 या दिवशी प्रकाशित केले.

पूर्वसूत्र :
खालची सही थोडी स्टायलिश असली तरी नाव सहज वाचता येत होते.
‘बापरे, १८५८ च्या जून महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई शहीद झाली होती !’ मी थक्क झालो.
‘हो. ...आणि १ नोव्हेंबर १८५८ ला हिंदुस्तानात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येऊन ब्रिटीश गव्हर्न्मेंटची, राणी व्हिक्टोरियाची सत्ता स्थापित झाली !’ प्रद्युम्न शांतपणे म्हणाला.

भाग – ५

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 23/04/2018 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
" चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो " काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या बहिणीने फरमाइश केली की दाद्या यावेळी मात्र 'चलो एक बार फिरसे वर..'लिही. खरेतर तोवर मी गुमराह (१९६३ सालचा ) पाहिलेलाही नव्हता. एकतर अशोककुमार आणि मालासिन्हा तसेही मला फारसे आवडत नाहीत आणि एकट्या सुनीलदत्तसाठी बघावे तर त्याच्याबद्दलही तेवढा जिव्हाळा कधीच नव्हता. पण एखाद्या गाण्यावर लिहायचे, त्याचे रसग्रहण करायचे म्हणजे नुसते शब्दांचे अर्थ नसतात हो. पण दक्षुबेनची फरमाईश म्हणजे तिथे नाही म्हणणे शक्यच नाही. एकच तर बहीण आहे, तिची फरमाईश पुर्ण करणे भागच आहे.

माझं आजोळ बेळगाव

लेखक स्वप्निल रेडकर यांनी रविवार, 22/04/2018 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल मध्ये परीक्षा संपता संपताच वेध लागायचे ते बेळगावला पळायचे.. नक्की आठवत नाही पण साधारण ७/८ तारिखला परीक्षा आटोपत आलेल्या असायच्या आणि पेपर सोपा गेल्याच्या आनंदापेक्षा मामाच्या गावाला जायचंय हाच आनंद मनात साठायला लागायचा .तयारी सुरु व्हायची. एसटी लागण्याची भीती हे एकच कारण मनात धाकधूक निर्माण करायचं. वेंगुर्ला ते बेळगाव साधारण तीन साडे तीन तासाचा प्रवास करायला फक्त बेळगावच्या ओढीपोटी तयार असायचो .नाहीतर एसटी नुसती बघितली तरी एक विचित्र गोळा पोटात तयार व्हायचा. दुपारी जेऊन एप्रिल मधल्या भर दुपारी वेंगुर्ला बेळगाव एसटी पकडायचो बस स्टॅन्डवर जाऊन .

ईबुक/ईपुस्तक म्हणजे काय? ईपुस्तकाचे वाचक आणि लेखकांना फायदे - ब्रोनॅटो

लेखक कौशिक लेले यांनी रविवार, 22/04/2018 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या तंत्रज्ञानाची माहिती मराठी माणसाला मराठीतून उपलब्ध करून देण्याचा माझा आणखी एक छोटा प्रयत्न. https://scontent.fbom1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/31100442_10155729232395910_8765591096479711232_n.jpg?_nc_cat=0&oh=79e1ab6ce62c31952dd62ae4313093ed&oe=5B53901D उद्या २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन. या निमित्ताने मराठी ईपुस्तक प्रकाशक शैलेश खडतरे यांच्याशी मी (कौशिक लेले) संवाद साधला.

कमी बजेट मध्ये कुठली गाडी घ्यावी ??

लेखक राहुल करंजे यांनी रविवार, 22/04/2018 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.. मला कुटुंबासाठी म्हणजे चार व्यक्तींसाठी कार घ्यायची आहे , माझे रोजचे फिरणे नाही पण मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते , कोल्हापूर हे आवडते ठिकाण म्हणून , पण मला सीएनजी कार घ्यावी की नको त्याचे फायदे तोटे तसेच कुठली गाडी घ्यावी कमी बजेट मध्ये ??? याचे मार्गदर्शन झाले तर मला खूप मदत होईल...

दिवसातून छप्पन वेळा

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 22/04/2018 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातून छप्पन वेळा माझा चेहेरा बदलत असतो अस्थिर अचपळ पारा माझ्या नसानसात दौडत असतो दोन देतो दोन घेतो चेहेरा तेव्हा निब्बर होतो अचाट ऐकतो अफाट बघतो तेव्हा चेहेरा कोकरू होतो कोsहं प्रश्न छळतो तेव्हा मुमुक्षूचा होतो भास टपरी चहा भुरकताना मीच टपोरी टाईमपास जुनी गाणी, जुने छंद, वार्‍यासंगे विस्मृत गंध, दर्वळतात भोवती जेव्हा चेहेरा कवळा होतो तेव्हा तोच लोलक, तिरीप नवी जुना पडदा, हुरहूर नवी अनंतरंगी अद्भुत खेळ बघायचा तर हीच वेळ
काव्यरस