तेव्हा
वास्तवाच्या लाक्षागृही
पुन्हा पुन्हा मी जळलो
माझ्या स्वप्नांच्या अंताची
तेव्हा सुरुवात झाली
मग अश्रुंच्या पुरात
निराधार भोवंडलो
करूणेच्या सागराची
गाज तेव्हा निनादली
आभाळाच्या तुकड्यात
थोड्या पेरल्या चांदण्या
तेव्हा आकाशगंगेची
किनखाप झळाळली
शब्द शब्द मग केला
कवितेचा वज्रलेप
कवितेची वही तेव्हा
पाण्यावर तरंगली
काव्यरस
मिसळपाव
दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट बघत होतो. आमच्या डोंबिवली तल्या चन्दुमामाने मला एका लोकल लायब्ररीत नोकरी करतो का असं विचारलं. वाचायची आवड होतीच. म्हटलं भरपूर पुस्तकं वाचायला मिळतील. व्यवहारज्ञान आलेलं नव्हतं पण पैसे न मोजता हे करता येईल याचा कोण आनंद होता. महिना दीड महिना केली असेल नोकरी मी ती. पण ते असं पुस्तकांच्या संगतीत दिवसभर राहणं मला खूप आवडून गेलं होतं. ती लायब्ररी जणू माझं पहिलं प्रेमच होतं.