स्वनातीत व्यापारी विमानप्रवास... पुन्हा सुरू होणार !
स्वनातीत (आवाजापेक्षा जास्त म्हणजे सुपर-सॉनिक वेगाने ) उडणारी विमाने ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. मात्र, लढाऊ विमानांच्या बाबतीत स्वनातीत वेग ही सामान्य गोष्ट असली तरी व्यापारी तत्त्वावर केल्या गेलेल्या स्वनातीत विमानसेवेच्या (commercial supersonic air-travel) मार्गात सतत मोठमोठे अडथळे येत राहिले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनात तर स्वनातीत प्रवास केवळ एक स्वप्न म्हणूनच राहिला आहे.
१९६९ ते २००३ या कालखंडात व्यापारी तत्त्वावर चाललेली पहिली वहिली स्वनातीत काँकॉर्ड विमानसेवा बंद पडून आता १५ वर्षे लोटली आहेत. त्या सेवेला सुरुवातीपासूनच अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासले होते.
मिसळपाव