मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ काय?

Rupesh · · कौल

वाचने 1118 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

II राजे II 05/07/2008 - 10:44
जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ हा प्रश्न व पर्याय दोन्ही पण चुकीचे आहेत असे वाटतं.... आपल्या पैकी कीतीजण ह्या बद्द्ल विचार करत असतील..... मी तर नाही ! हा काही स्टेप्स आहेत ज्या मी ठरवल्या आहेत... त्यातील प्रत्येक पायरी जेव्हा मी चढतो तेव्हा परत नवीन पायरी चढ्ण्याची तयारी करतो... हाच जिवनाचा माझा मुलमंत्र आहे... बाकि तुमचे विचार वाचणे आवडेल ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

अवलिया 05/07/2008 - 16:42
उपभोग घेवुन मुक्ति का नाही? (भोगी व योगी) नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
मी 'उपभोग घेणे' ला मत दिले आहे. परंतु नुसते 'उपभोग घेणे' असे नव्हे, तर आयुष्याचे सगळे भोग भोगत उपभोग घेणे हे मला अधिक संयुक्तिक वाटते! असो... नानांचं उत्तर पटलं! आपला, (भोगी आणि योगी) तात्या.
तशी मला ही तिहेरी मतचाचणी पटलेली नाही. वर सर्वांनी याबद्दल स्पष्ट सांगितलेच आहे. तरी जगत राहाणेचा अर्थ मी "मन लावून जगत राहाणे" असा घेतला आहे. " अर्थातच मनापासून जगण्याची शक्ती, अनुभव घेण्यासाठी संवेदना, या सर्व गोष्टी जन्माला आलो म्हणूनच माझ्यापाशी आलेल्या आहेत. "आलिया भोगासी [जणू काही जन्माला आलो ही मोठी कटकट आहे] म्हणून जीवन कंठणे" हा अर्थ मला मान्य नाही. आनंदमय अनुभव समोर असताना जीवनात त्याला मनापासून जागा करणे म्हणजेच भोग घेणे. विरक्त विचार जीवनात येताना त्यांना मनापासून विचारात घेणे, हेही "मनापासून जगणे".

एक 06/07/2008 - 21:54
निदान इंजिनियरिंग मधे जो पर्यंत ती माझ्या वर्गात होती तो पर्यंत तरी.. ;) जोक्स अपार्ट खरं ध्येयही हेच आहे.. -(फ्री युवर माईंडवाला) एक.
जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ काय? असं विचारून त्या खाली जी उद्दिष्ठ आपण दिली आहेत त्याच्या बाहेर जाऊन जर माझ्या मनाला वाटतं ते उद्दिष्ठ देण्यास आपण परवानगी दिलीत,मुभा दिलीत, तर मी म्हणेन, "जीवनात अंतिम उद्दिष्ठ असावं यशस्वी होणं" म्हणजे काय? तर हंसत राहणं खूप प्रेम करणं विद्वानाकडून आदर प्राप्त करणं लहानांकडून प्रेम संपादन करणं प्रामाणिक माणसाकडून शाबासकी घेणं. खोट्या मैत्रीतून झालेला गैरविश्वास सहन करणं सौंदऱ्याची स्तुती करणं. इतरा मधलं चांगलं तेव्हडंच पहाणं. "मीपणा" सोडून देणं उत्साही राहून हंसणं,गाणं , खिदळणं आणि शेवटी आपल्यामुळे जगातला एक प्राणी सुखाने श्वास घेऊ शकला याची जाणीव होणं म्हणजेच माझ्या मते यशस्वी होणं आणि यशस्वी होण्याचं उद्दिष्ठ साध्य करणं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विकास 07/07/2008 - 02:23
मला एकदम भा.ब. बोरकरांच्या कवितेतील सुरवातीच्या ओळी आठवल्या: तो स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा ती तृप्ती नको, ती मुक्ती नको, मज येथील हर्ष नी शोक हवा...
आलोय जन्माला म्हणून जग् त राहणे याला दुसरा पर्याय आहे का कोणाकडे?जो पर्यंत मृत्यु येत नाही तो पर्यंत जगण्याशिवाय दुसरं काय करणार ? ऊपभोग घेणे याचा अर्थ मी आयुष्याचा पुरेपुर आनंद घेणे असा घेतला आहे .. मुक्ति मिळवणे मृत्यु हेच अंतीम सत्य असल्याने मुक्ति मिळवणे हे टारगेट (अंतिम उद्दिष्ठ) असावे.. मायेचा खेळ ज्याने ओळखला व ज्याला सर्व गोष्टींतला मोह सोडला आला त्याला मुक्ति मिळवणे अवघड नाही. मदनबाण..... The Soul is Eternal, Steady and Ever Existing. Weapons cannot destroy him nor can fire burn him; Water cannot wet him nor can air dry him up. The Soul is Immortal. -------- Lord Krishna From The Bhagwadgita
मनात खरोख्ररीची माणुसकी ठेवून माणसासारखे वागणे ,निदान जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करणे हेच माझ्यामते जीवनाचे उद्दिष्ट असावे.मुक्ति वगैरे नंतर.माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे.

दनिलेश 28/07/2008 - 06:23
तुम्ही कितिही उद्दिष्ठ ठरवा, कितिही प्रयत्न करा......... पण शेवटी काय? ............. " होनी तो होकेही रहेगी" .......... so do whatever u want........ do by ur heart and Njoy ur creations...........