सोने
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सोने
अघटित घडले त्या बाजारी जेव्हा पडले सोने
शेती फुलले , जमिनीमध्ये आहे दडले सोने!
जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने?
कळेल का मज असे कोणत्या मुशीत घडले सोने?
निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक-
आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने!
(नॉर्थ ड्कोटा येथे एका वृद्ध जोडप्याच्या मागील अंगणात खनिज तेल सापडले:) आणि ते कोट्याधीश झाले या बातमीवर आधारित)
चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने
अंधार्या रात्री एकाकी हळूच रडले सोने
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने
वाचने
2838
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
चकाकणारे
सोन्याची वेगवेगळी रूपे
In reply to सोन्याची वेगवेगळी रूपे by धनंजय
छान कविता
छान..
स्पर्श
स्पर्श
छान कविता!