Skip to main content

डॉ. राजेश तलवार तुरुंगात सेवा देणार.....!

लेखक केशवराव यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जालावर वाचले कि, डॉ. रजेश तलवार दासना तुरुंगात दंय रुग्णांना सेवा देणार. ज्या माणसावर आपल्याच मुलीच्या खूनाचा आरोप आला होता , आणि आता सीबीआय त्याला 'काहि पुरावा नाही ' म्हणुन ५० दिवसांनी सोडून देते , तोच माणूस आता त्याच तुरुंगात कैद्यांना दंत सेवा देण्याची ईछ्चा प्रकट करतो. त्याला सलाम !

नटवर (लोकल गोष्टी-१)

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नटवर . लोकल मधला २ क्लासच्या डबा तुमच्या पैकी बर्‍याच जणांना परिचित असेल. सेकंड क्लास आणि तो ही लेडीज सेकंड क्लास म्हणजे ...गडबड- गोंधळ, भांडण बाचाबाची, सड्या-डागांची चौकशी व घर, नवरा, मुलं यांच्याशी जोडलेली गार्‍हाणी. त्यात मधून फिरणारे फेरी वाले आणि गोंधळामुळे बावचळून गेलेल्या लहान मुलांची चिरचिर, :D या सगळ्याला छेदणारी एक हास्याची लकेर हे त्याचं वरवर दिसणार रूप, पण या वातावरणात आपला प्रवेश झाला की मग आपल्याला त्यांतील आणखीनं पात्रे कळू लागतात. त्यांच्या भूमिका पाहताना सगळ्या गर्दी गोंगाटाचा विसर पडतो, निदान मला तरी!. ट्रेन मध्ये शिरल्यावर एक दोन मिनटांतच माझी भूमिका सुरू होते.

चौथी सीट

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
चौथी सीट . नकोच ती सीट चौथी, हट जाऊ दे.. दाराशी उभे राहूनी, वारा खाऊ दे! पाठीचा कणा वाकवूनी, तोल साधणे.. सरकेल का कुणी म्हणूनी, वळून पाहणे! पायात पाय गुंतवूनी, आक्रसून राहणे.. अवघडलेल्या हातांनी, आधार शोधणे! नकोच ती डब्यातली, घुसमट..
Taxonomy upgrade extras

(ही पाल तुरुतुरु__)

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु ) मराठीतील एक प्रसिध्द गाणे ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट सरली या चालीवर खालील रचना --------------------------------- ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु वरच्या खिडकीतुन आत सरली ! की उंचावरच्या कप्प्यात, अडगळीच्या जागेत पालीण सळसळली !! कोळ्यांशी मैत्री जमव ना ! जाळिशी फिल्डिंग लाव ना ! शेपुट वळ वळ कर ना! डासांवरती झडप घाल ना ! मनी खालुन जाता वरं वळुन पाहाता, पाल संकटात सापडली !! उगाच झाडू हाणून ! फवारा हिटचा मारुन ! शेपुट चाचपुन काठीन ! तो
Taxonomy upgrade extras

छचोर

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस इतका छचोर आहे साला! ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की फरक फक्त इतकाच - तो कोसळतो,मी ढासळतो दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं की माझं पाणी पाणी होतं आणि लाजून लाजून तुझंही मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला! पाऊस इतका छचोर आहे साला!
Taxonomy upgrade extras

बंड्याचा शि. सा.न.वि.वि.

लेखक कियोस्का यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बंड्या enjoy friends, ती. बाबा आणि सौ . आईस, बंड्याचा शि. सा.न.वि.वि. मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो. तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्‍लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते. पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल . आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत, तसेच इथे सायकलस्वारांना कोणताही नियम लागू नाही . पोलिसांची नजर चुकवून आणि शिट्टीचा इशारा ऐकून न ऐकल्यासारखे करून हे झक्‍कासपैकी पसार होतात. काय करणार ! सध्याचे लाइफच धावपळीचे झाले आहे .
Taxonomy upgrade extras

..

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
..

दुःख मनातले जाईल वाया

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 12/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी- इंदीवर) अंग तुझे चंदनासम मन तुझे दोलायम कुणी नका देवू दोष मला जर झालो मी हिचा दिवाना तुझी देहयष्टी भावलेली तुझे नयन काजळलेले सिंदुरबिंब तुझ्या माथ्यावरी लाल निखारे ओठावरती जरी कुणावरी पडॆ छाया दुःख मनातले जाईल वाया तू सुंदर तनाची सुंदर मनाची मुर्ती असे तुझी सुंदरतेची जरुरी आहे आज मला तुझी किती करू मी तुझी अपेक्षा ना होई सहन यापुढे प्रतीक्षा श्रीकृष्ण सामंत

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 11/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
...

किस बाबा किस!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 11/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
---------- बोंबला! :S साधारणपणे डझनभर विवाहसंस्थांचे उंबरे झिजवल्यानंतर, चहा-पोह्यांचे पन्नासेक कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आणि विवाहेच्छू युवतींच्या मनांच्या सागरांतल्या गर्तांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यांनंतर आज "हा हंत हंत' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. म्हणजे, एवढ्या दिवसांची, आठवड्यांची, वर्षांची मेहनत वायाच गेली म्हणायची! विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्‍वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा.