Skip to main content

मिसळपाव आज पुणे मिरर मधे...

Published on 28/07/2008 - 09:18 प्रकाशित मुखपृष्ठ
आज मिसळपाव बद्दल टाईम्स ऑफ इन्डीयाच्या पुणे मिरर या वर्तमानपत्रात बातमी आली आहे. मिसळपावकरांनी बंगलुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जी तात्काळचर्चा केली आणि त्याला बंगलुरूवासी मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यात माहिती दिलेली आहे. मिसळपावचा एक फोटो (स्नॅपशॉट) देऊन ५ नं पानावर ही बातमी आहे. पुणे मिररचे स्वतंत्र संकेतस्थळ नसल्यामुळे बातमीचा मथळा देत आहे. Potpourri of information Misalpav.com is one the websites which has been pivotal in relaying news from the blast-torn cities of Bangalore and Ahmedabad.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 15565

उन्हाळा-१

Published on 28/07/2008 - 07:58 प्रकाशित मुखपृष्ठ
होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल, धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे.
लेखनविषय:

याद्या 3245

एक शून्य ......

Published on 28/07/2008 - 07:24 प्रकाशित मुखपृष्ठ
कवड्या तुझी धाव आहे शुन्या कडून शुन्या कडे पंच्याऐंशी वाचनांनंतरही नि:शब्द जालाचे कडे ऐकून होतो मायाजाली दुर्लक्षील्या जातो जो नडे समजती अनुभवांती वेडे सरळास लाभती वाकडे प्रतीसाद आभास मायावी असतील काही सत्यही थोडे का अट्टाहास करशी भूलीचा जाणूनी पाखरू दूर जाया उडे
लेखनविषय:

याद्या 2622

आगे बढो

Published on 27/07/2008 - 21:54 प्रकाशित मुखपृष्ठ
"खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का "आगे बढो" म्ह्टलं तर किती बरं होईल. " हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण जातात.काहींचे अपघातात तर काहींचे मारामारीत,कांही मरतात आतंगवाद्दयाकडून वगैरे. हे शहरात जास्त होत असतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1337

बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली...

Published on 27/07/2008 - 20:31 प्रकाशित मुखपृष्ठ
बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली (आमची प्रेरणा: उषःकाल होता होता काळरात्र झाली !
लेखनविषय:

याद्या 7598
Taxonomy upgrade extras

गणेशोत्सव

Published on 27/07/2008 - 19:18 प्रकाशित मुखपृष्ठ
टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं? गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात. अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4319