मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक शून्य ......

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कवड्या तुझी धाव आहे शुन्या कडून शुन्या कडे पंच्याऐंशी वाचनांनंतरही नि:शब्द जालाचे कडे ऐकून होतो मायाजाली दुर्लक्षील्या जातो जो नडे समजती अनुभवांती वेडे सरळास लाभती वाकडे प्रतीसाद आभास मायावी असतील काही सत्यही थोडे का अट्टाहास करशी भूलीचा जाणूनी पाखरू दूर जाया उडे

वाचने 2622 वाचनखूण प्रतिक्रिया 6

विसोबा खेचर 28/07/2008 - 08:44
वेगळीच कविता...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/07/2008 - 10:30
ऐकून होतो मायाजाली दुर्लक्षील्या जातो जो नडे समजती अनुभवांती वेडे सरळास लाभती वाकडे प्रतीसाद आभास मायावी असतील काही सत्यही थोडे का अट्टाहास करशी भूलीचा जाणूनी पाखरू दूर जाया उडे मनोहर साहेब, जालावरील काही गोष्टींचं फार मनावर घ्यायचं नाही. आपण लिहित राहावे आपल्यासाठी ( असे म्हणने सोपे आहे) वाचणारे वाचतील, प्रतिसाद देणारे देतील. तेव्हा आपल्या कवितेतला भाव आमच्यापर्यंत पोहचला आपण लिहित राहा !!! अवांतर : कुबड्या तुझी धाव आहे, शुन्या कडून शुन्या कडे असे वाचले :) ( ह्.घ्या. )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll 30/07/2008 - 02:09
कोणी येतो लिहीतो कविता लिही अनुभव कोणी तगडे लिहीतो कधी कोणी नवखा सुंदर काही बोल बोबडे लिही कोणी चारोळी कोणी पाककृतीही बरवी लिही कोणी विडंबनेही कवितेहून बरवी लिही कोणी शास्त्रार्थ कोणी ऋषितुल्याची कहाणी लिही कोणी संस्कृत कोणी गाण्याची कहाणी लिही कोणी नाट्याची समिक्षा आणि पंढरीची वारी प्रतिसादावीण नसे का कधी लिहीण्याची गंमत भारी (अचंबित) पुण्याचे पेशवे

सखाराम_गटणे™ 30/07/2008 - 08:01
लिहणार्याने लिहीत जावे, वाचणाराने वाचत जावे, ऐक दिवस दिवस, वाचता वाचता, लिहणाराचे हातच घ्यावेत. भौ, इतकं मनावर नाही घ्यायचे. सखाराम गटणे